Tuesday, September 1, 2009
कर्जात बुडालेल्या महाराष्ट्राची कोटीच्या कोटी उड्डाणे !
डोक्यावर तब्बल एक लाख 76 हजार 730 रुपयांचे कर्ज असलेल्या महाराष्ट्र सरकारने गेल्या नऊ महिन्यांत विविध योजना व देय तरतुदींसाठी तब्बल 41 हजार 459 कोटी रुपये खर्चाच्या घोषणा केल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यातील प्रत्येक नागरीकाच्या डोक्यावर सध्या 66 हजार रुपयांचे कर्ज आहे.ष्ट्र शासनाचा आर्थिक ताळेबंद ज्यांना समजतो, त्यांना या घोषणांमधील "पोकळ वासा' सहज लक्षात येईल. राज्य शासनावर सध्या विविध सहा प्रकारची कर्जे आहेत. त्यात देशांतर्गत कर्ज 1 लाख 44 हजार 843, केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज किंवा अगाऊ रकमा (ओव्ह ड्राफ्ट) नऊ हजार 611 कोटी, कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी देणे 12 हजार 648 कोटी, तर कर्जावरील केवळ व्याज 14 हजार 723 कोटी आहे. अर्थसंकल्पबाह्य कर्जे तीन हजार 974 कोटी रुपये आहे. हा सर्व ताळेबंद 2009 - 2010 च्या अर्थसंकल्पात मांडला आहे. त्या तुलनेत आजची वस्तुस्थिती लक्षात घेतली तर सध्याचे कर्ज 1 लाख 90 हजार कोटी आहे. उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण किमान 29 टक्के आहे.ष्ट्र सरकारवरील कर्जाचा आकडा दरवर्षी फुगत चालला आहे. गेल्या अकरा वर्षांची आकडेवारी लक्षात घेतली तर हे लक्षात येईल. 1999-2000 मध्ये एकूण कर्ज 42 हजार 666 कोटी रुपये होते. 2000-01 मध्ये 61 हजार 081, 2001- 02 मध्ये 72 हजार 122, 2002- 03 मध्ये 82 हजार 549, 2003 - 04 मध्ये 97 हजार 674, 2004 - 05 मध्ये 1 लाख 9 हजार 166 , 2005 - 06 मध्ये 1 लाख 24 हजार 364, 2006 - 07 मध्ये 1 लाख 33 हजार 723, 2007 -08 मध्ये 1 लाख 42 हजार 383 आणि 2008 - 09 मध्ये 1 लाख 61 हजार 276 कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्र सरकारवर होते. इतर राज्यांच्या कर्जाचा विचार केल्यास कर्जदार राज्यांच्या यादीत महाराष्ट्र दुसरे ठरते. सध्या सर्वाधिक कर्ज उत्तर प्रदेश सरकारवर 1 लाख 88 हजार 197 कोटी रुपयांचे आहे. विविध कर्जमाफीएकीकडे राज्याच्या तिजोरीत रोख रकमेचा खडखडाट असताना राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारने मात्र विविध योजना किंवा देणी देण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या रकमांची घोषणा केल्या आहेत. विविध प्रकारच्या कर्जमाफीसाठी सात कोटी 541 रुपये घोषित केले आहे. यात शेतकऱ्यांना सरसकट 20 हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी 6,208 कोटी, आदिवासींना कर्जमाफीसाठी 200 कोटी, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळीच्या कर्जमाफीसाठी 1,108 कोटी, शेळी- मेंढी विकास महामंडळाच्या कर्जमाफीसाठी 9 कोटी, मोैलाना आझाद महामंडळाच्या कर्जमाफीसाठी 17 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.राज्य सरकारच्याअधीन असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सहावा वेतन आयोग मागणे सुरू केले आहे. सरकारनेही टप्प्याटप्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या आहे. यात सहावा वतन आयोग देण्यासाठी सरकारवर किमान 10 हजार 704 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. त्यात कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी 8,000 कोटी, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता देण्यासाठी 1 हजार 780 कोटी, वैद्यकीय अध्यापकांना वेतनवाढ देण्यासाठी 100 कोटी आणि पालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी 824 कोटी रुपयांची घोषणा केल्या आहेत.आघाडी सरकारने पाचवर्षांच्या काळात सत्तेवरून पाय उतार होत असताना अखेरच्या सहा महिन्यांत कोकण विकासासाठी 5 हजार 235 कोटी रुपयांचे आणि उत्तर महाराष्ट्र विकासासाठी 6 हजार 509 कोटी रुपयांचे असे दोन्ही मिळून 11 हजार 744 कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे.र् नियंत्रणासाठी 126 कोटी, रेशनवर पाच जीवनावश्यक वस्तू (पामतेल, साखर, तूरडाळ, गहू व तांदूळ) देण्यासाठी 122 कोटी, चारापाणी टंचाई निवारणासाठी 300 कोटींच्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय आकस्मिक निधीत 500 कोटीपर्यंत वाढही केली आहे.(महाराष्ट्र सरकारने गेल्या नऊ महिन्यांत केलेल्या घोषणा आणि महाराष्ट्राची गेल्या पाचवर्षांतील आर्थिक आकडेवारी स्पष्ट करणाऱ्या चौकटी आतील पानांत)
Wednesday, May 20, 2009
विक्रमवीर गावित आणि भाजपचे एकतर्फी वर्चस्व
खानदेशात लोकसभेच्या चार जागांपैकी जळगाव, रावेर व धुळे या तीन मतदारसंघांचे निकाल भाजप- शिवसेना युतीसाठी आणि नंदुरबार या एका मतदारसंघाचा निकाल कॉंग्रेससाठी अपेक्षित असा लागला आहे. या निकालाची दुसरी बाजू अशी, की जळगाव आणि रावेर या मतदारसंघांचा निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीसाठी अनुक्रमे धक्कादायक आणि काहीसा अपेक्षित असा लागला आहे. नंदुरबारमध्ये समाजवादी पक्षाच्या रूपाने उभे राहणारे आव्हान कॉंग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक पलटावून लावले आहे. खानदेशात चारपैकी तीन जागा जिंकणाऱ्या भाजपच्या यशात भाजपचे नेते नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या विक्रमी सभांचा सिंहाचा वाटा आहे.
नवव्यांदा माणिकराव गावित
नंदुरबार मतदारसंघात आघाडीतर्फे कॉंग्रेसचे विद्यमान खासदार तथा माजी मंत्री माणिकराव गावित हे नवव्यांदा विक्रम करीत विजयी झाले. त्यांना अत्यंत चुरशीच्या आणि आव्हानपूर्ण वातावरणात तब्बल 40 हजारांचे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या माध्यमातून शरद गावित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीसमोर आव्हान उभे केले होते. शरद गावित राज्यातील मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. त्यामुळे त्यांच्या माघारीचा व डॉ. गावित यांनी कॉंग्रेस प्रचारात सक्रिय होण्याचा मुद्दा वारंवार कॉंग्रेसतर्फे मांडला जात होता. शरद गावित यांनी मंत्री गावित यांचे जनसंपर्क प्रतिनिधी म्हणून जिल्हाभरात प्रभाव निर्माण केलेला असल्यामुळे त्यांची उमेदवारी माणिकराव गावित यांना अडचणीत आणणार, असे वाटत होते. मात्र, निकाल आणि मताधिक्याची टक्केवारी पाहता, माणिकराव गावित यांच्यावर प्रेम करणारा पारंपरिक मतदार आजही त्यांच्यामागे कायम असून, गावित- सुरूपसिंग नाईक आणि चंद्रकांत रघुवंशी या त्रिकुटाची जिल्ह्यावर पकड असल्याचे स्षट होते. येथे भाजप- शिवसेना युतीतर्फे रिंगणात असलेले सुहास नटावदकर यांचा चौथ्यांदा झालेला पराभव चटका लावून जातो. "राजकारण आपल्या घरचेच' असा समज करून असलेल्या मंत्री गावित आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षांना "लगाम' लावणारा हा निकाल आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत गावित- नाईक- रघुवंशी हे मंत्री गावित यांना घाम फोडल्यावाचून राहणार नाहीत.
धुळ्यात कॉंग्रेसकडूनच घात
धुळे मतदारसंघात युतीतर्फे भाजपचे शिक्षक आमदार प्रताप सोनवणे अवघ्या बारा हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांनी आघाडीकडून रिंगणात असलेले कॉंग्रेसचे सर्वार्थाने "पॉवरफुल्ल' आमदार अमरिश पटेल यांचा पराभव केला. अर्थात, या पराभवात कॉंग्रेसचे धुळ्यातील ज्येष्ठ नेते तथा आमदार रोहिदास पाटील व मालेगावातील ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रशांत हिरे यांची निष्क्रियता भोवली आहे. पाटील व हिरेद्वयी यांनी श्री. पटेल यांना उमेदवारी मिळाल्यापासून उघड विरोध केला होता. एवढेच नव्हे; तर ही मंडळी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या जाहीर सभांकडेही फिरकली नाहीत. त्यामुळे त्यांनी पक्षांतर्गत उघड बंडच केले होते. शिवाय, हे दोघेही मराठा समाजाचेच असल्यामुळे त्यांची निष्क्रियता श्री. सोनवणे यांच्या पथ्यावर पडली. कॉंग्रेसचे श्री. पटेल यांच्या जातीचा मुद्दा प्रथमच एवढ्या उघडपणे चर्चेत आला. भाजपचा पारंपरिक मतदार आणि पाटील- हिरे यांच्या दुसऱ्या पिढीचे थेट सहकार्य यातून अवघ्या 12 हजारांच्या मताधिक्याने का होईना श्री. सोनवणे विजयी झाले. मात्र, आता पाटील- हिरेद्वयी यांच्याबाबत पक्षांतर्गत काय निर्णय होणार? याविषयी उत्सुकता आहे. श्रीमती गांधी यांच्या सभा झालेल्या ठिकाणी पक्षाचा पराभव होता, ही बाब कॉंग्रेस पक्ष मोठ्या गांभीर्याने घेणार, हे निश्चित. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत रोहिदास पाटील हे खानदेश विकास प्रतिष्ठानच्या नावावर वेगळी खेळी खेळण्याची शक्यता आहे.
जळगावात जैन यांचा प्रभाव
जळगाव मतदारसंघाची जागा भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुन्हा परत मिळविली. युतीअंतर्गत भाजपमध्ये नवखे असलेले आणि निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले "एटी' उर्फ अशोक तापीराम पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळते खासदार वसंतराव मोरे यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला. ए. टी. पाटील यांच्या विजयात शिवसेनेत नुकतेच स्थिरावलेले सुरेशदादा जैन यांच्या प्रभावाचा मोठा हिस्सा आहे. श्री. जैन यांचे जळगाव शहर- जळगाव ग्रामीण भागासह इतर तालुक्यांत मोठ्या संख्येत समर्थक आहेत. श्री. मोरे 18 महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करून विजयी झाले होते, तेव्हा जळगावचा हा भाग जुन्या एरंडोल मतदारसंघास जोडलेला नव्हता. ए. टी. पाटील व श्री. मोरे हे पारोळा या एकाच गावातील व तालुक्यातील असूनही तेथे ए. टी. पाटील यांचेच हितचिंतक जास्त असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे श्री. मोरे यांच्यासाठी व रावेर मतदारसंघात प्रचारासाठी तीन वेळा दौऱ्यावर आले. त्यांनी पहिल्यांदा आक्रमकपणे विचार मांडले. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर परखडपणे टीका केली. कॉंग्रेसच्या नाराज पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. कारण, जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्यामुळे पहिल्या टप्प्यात कॉंग्रेसची मनधरणी करण्यातच बराच वेळा गेला. कॉंग्रेस नेतेही शेवटपर्यंत रावेरच्या जागेसाठी हटून बसले होते. अखेर, दाखवायचे म्हणून कॉंग्रेसची मंडळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर आली. मात्र, जैन व एकनाथ खडसे यांच्या प्रचाराच्या झंझावातासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन, राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील व अरुण गुजराथी यांचे प्रयत्न कमकुवत ठरले. गेल्या अठरा महिन्यांत श्री. मोरे यांनी खासदार म्हण
ून निधी खर्चाचा बऱ्यापैकी पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नाही, हाही मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जिल्ह्यात जागावाटपात कॉंग्रेससाठी जागावाटपाचा ताळमेळ साधावा लागणार आहे.
जावळे यांना पुन्हा संधी
रावेर मतदारसंघातून युतीतर्फे भाजपचे मावळते खासदार हरिभाऊ जावळे 25 हजार मताधिक्याने विजयी झाले. येथे मराठा जातीचे कार्ड प्रभावी वाटत असताना जावळे यांनी मिळविलेला विजय हा त्यांचा व्यक्तिगत संपर्क, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार गिरीश महाजन यांचे वर्चस्व सिद्ध करणारा आहे. श्री. महाजन यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड. रवींद्र पाटील उमेदवार होते. श्री. पाटील यांची राजकीय कुवत मर्यादितच होती; पण त्यांचे मराठा असणे आणि या मतदारसंघात मराठा समाजाचे गठ्ठा मतदान असणे याचा काही मेळ घातला येईल का? याचाच विचार स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी केला होता. बहुतांशी तो विजयाच्या जवळ जाणारा होता, हे जावळे यांना मिळालेले कमी मताधिक्य दर्शविते. जावळे यांना केवळ लेवा पाटीदार समाजाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविणे, हे भाजपमधील काही नेत्यांनाही मान्य नव्हते; परंतु श्री. खडसे, पांडुरंग फुंडकर, श्री. महाजन, डॉ. राजेंद्र फडके, चैनसुख संचेती आदींनी घेतलेली मेहनत विजय निश्चित करून गेली. श्री. खडसे हे भाजपअंतर्गत राजकारण करताना पक्षाच्या राज्यस्तरावरील संघटनात्मक पदांवर लक्ष ठेवून आहेत. श्री. मुंडे यांच्यापाठोपाठ त्यांनाही महत्त्वाकांक्षा आहेच. रावेरसह जळगावची जागा परत मिळविल्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपची उमेदवारी देताना, तसेच शिवसेनेचे उमेदवार देतानाही खडसे- जैन संमतीचा प्रभाव राहणारच आहे.
जळगाव- रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंगेसला कॉंग्रेसची निष्क्रियता अपयशाकडे नेणारी ठरली. हा पराभव ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नाराज करणारा आहे. खानदेशात श्री. पवार यांचे आपल्याकडे मुक्कामी थांबणे किंवा आपल्या निवासस्थानी जेवण घेणे, अशा गोष्टींचे प्रचारासाठी भांडवल करणारे नेते आहेत. मात्र, या नेत्यांना अशा प्रभावाचे मतांमध्ये रूपांतर करता येत नाही, हे जळगाव महापालिका निवडणूक व आताच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. म्हणूनच, विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला नव्याने मांडणी करावी लागणार आहे.

Monday, May 4, 2009
ओम भवती भिक्षांदेही!

भारताचा चेहरा जगासमोर कसा आहे? हे घरबसल्या जाणून घेण्याचे इंटरनेट हे एक सोपे माध्यम. वेगवेगळ्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीतून भारत कसा आहे किंवा विभिन्न क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निरीक्षणातून भारताचे वर्णन व्यक्तिगत ब्लॉगमध्ये कशाप्रकारे नोंदले आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न भारताविषयी अनोखी माहिती समोर आणतो. आपलाच देश आपल्याला अनोळखी वाटू लागतो. मात्र, भिकारी- भिखारी आणि बेगर्स यांच्याविषयी इंटरनेटवर माहिती शोधत असताना "भारत हा भिकाऱ्यांचा देश आहे आणि तेथे भिकाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी पुढील टिप्स लक्षात ठेवा' असे जेव्हा वाचनात आले, तेव्हा अस्वस्थ झालो. त्याच मनःस्थितीत नोंदलेल्या इतरही माहितीचा या "दखल'मध्ये ऊहापोह
जळगावचे प्राध्यापक डॉ. सुनील मायी यांचे "आलो जन्मभरी मागाया' हे छोटेखानी पुस्तक साधारणतः सहा महिन्यांपूर्वी वाचनात आले. भिकाऱ्यांविषयी त्यांनी केलेल्या निरीक्षणांची नोंद त्यात आहे. भिकाऱ्यांचे तीन- चार इरसाल कॅरेक्टर लेखकाने उभे केले असून, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या सर्वच प्रकारच्या भिकाऱ्यांचे प्रातिनिधिक चित्रण त्यात आहे. वेगळ्या विषयावरील रंजक माहिती असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून संपले. त्यानंतर या विषयाचा विसर पडला. "भुसावळमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली' अशी बातमी तीन- एक महिन्यापूर्वी वाचनात आली. या भिकाऱ्यांमध्ये "गर्दूल्ले' जास्त आहेत, असाही संदर्भ होता. पुन्हा विषय स्मृतीबाहेर गेला.इंटरनेटवर विविध विषयांची माहिती शोधण्याची मला सवय आहे. एके दिवशी सहज भिकारी- भिखारी आणि बेगर्स हे शब्द गुगलवर ऑपरेट करून माहितीचा शोध घेतला. समोर आलेल्या वास्तवाने उडालोच. प्रवासी आणि पर्यटनाशी संबंधित अनेक वेबसाइटची यादी समोर आली. भिकारी आणि पर्यटनाचा काय संबंध? उत्सुकता वाढली. "भारतात पर्यटनाला जाता आहात?' असा प्रश्न करीत पर्यटकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याविषयी या वेबसाइटवर अनेक टिप्स दिलेल्या होत्या. त्यात "भारतातील भिकाऱ्यांपासून सावध!' असा इशारा नोंदलेला होता. इंडिया ट्रॅव्हल टिप्स, वर्ल्ड ऑफ इंडिया आणि इंडिया डॉट ट्रॅव्हल डॉट एजन्ट डॉट कॉमवर या टिप्स वाचता आल्या. या तिन्ही वेबसाइटवर भिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या पाच ते सात टिप्स होत्या. भारतात अपंग वृद्ध- महिला- मुले भीक मागतात. मात्र, काही देखावा करतात, उपाशी मुले दाखवून भीक मागणाऱ्या महिला असतात, वाहनातून उतरल्यानंतर लगेच काही देऊ नका, तर परत जाताना द्या, मुलांना भीक देताना भावनाशील होऊ नका; कारण त्यांचे पालकच त्यांना तसे करण्यास सांगतात. मुलांना रोख स्वरूपात भीक देऊ नका; कारण पालक ती हिसकावून घेतात. काही करावेसे वाटलेच तर स्वयंसेवी संस्थांना मदत करा, अशा अनेक टिप्स वाचनात आल्या. भारताच्या पर्यटनविषयक आणि सामाजिक चेहऱ्याचे विद्रुपीकरण या वेबसाइटच्या माध्यमातून कसे होत आहे? असा प्रश्न मनात निर्माण झाला. त्या वेळी प्रा. मायी यांच्या पुस्तकातील अनेक निरीक्षणे आठवली. मंदिर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाग-बगीचे अशा सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या भिकाऱ्यांची गर्दी आठवली. या ठिकाणांशी भारतीय पर्यटनस्थळे थेट संबंधित आहेत. त्यामुळे तेथे दिसणारा भारत वेबसाइटच्या माध्यमातून व्यक्त होतो, हे लक्षात आले. कामत डॉट कॉम या ब्लॉगवरही भिकाऱ्यांविषयी अशीच; मात्र भारतीय संस्कृतीचे चुकीचे दर्शन घडविणारी माहिती आढळून आली. लेखकाने अत्यंत अर्धवट माहितीवर निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो, "भारतात भिकारी परंपरेने तयार होतात. हिंदू साधू होण्यासाठी प्रथम भीक मागता आली पाहिजे'. ही माहितीसुद्धा चेहरा बिघडवणारीच वाटते.भारतातील तपस्वी, विद्वान साधू- महंतांच्या प्रतिमांना छेद देणारे हे लेखन अस्वस्थ करते. भारतीय संस्कृतीत "भिक्षा मागणे' हासुद्धा एक संस्कार आहे, याची माहिती कोणीतरी अशा अर्धवट लेखकांना द्यायला हवी. अध्ययन करणारा ब्रह्मचारी आणि सर्व सुखांकडे पाठ फिरविणारा संन्याशी यांना पोटापुरती भिक्षा मागण्याचा हक्क संस्कृतीने मान्य केला आहे. गुरुदक्षिणा देण्यासाठी विद्यार्थी, विवाह- यज्ञ किंवा आई- वडील यांच्या पोषणासाठीही भिक्षा मागणे योग्य मानले गेले आहे. आपले दैन्य घालविण्यासाठी राजा किंवा धनिकाकडे याचना करण्यासही संस्कृतीची मान्यता आहे. उपनयन संस्कार (मौंज) करताना आचार्यांनी बटूला ब्रह्मश्चर्याविषयी उपदेश केल्यानंतर मातेकडे बटूने भिक्षा मागण्याचाही संस्कार केला जातो. पहिल्या भिक्षेवरही आचार्यांचाच अधिकार असतो. भारतीय संस्कृतीदर्शनातील या बाबीही ठळकपणे समोर मांडल्या गेल्या पाहिजेत. याचा अर्थ या प्रथा- परंपरांचे समर्थन करण्याचा हा किंवा त्या योग्यच असल्याचा दावा करण्याचा येथे प्रयत्न नाही, हेही येथे स्पष्ट व्हावे. खरेतर भारतीय संस्कृती कोषात "भिक्षा' शब्दाची व्याख्या अत्यंत समर्पक शब्दांत दिली आहे. तेथे तर्कतीर्थ म्हणतात, "शरीर धडधाकट असूनही लोकांकडे अन्न, वस्र, पात्र, द्रव्य याची याचना करणे म्हणजे भिक्षा मागणे.'इंटरनेटवर "भिकारी' विषयावरील शोधमोहिमेत आणखी काही वेगळे संदर्भ आढळले. भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत 2007 मध्ये भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथे लाखभर भिकारी आढळले. त्यांपैकी चार पोस्ट ग्रॅज्युएट, सहा पदवीधर, 796 बारावी उत्तीर्ण होते. एकूणपैकी 799 पुरुष व 1541 महिला शारीरिकदृष्ट्या पूर्णतः धडधाकट होत्या. यातील काही भिकाऱ्यांचे रोजचे उत्पन्न (कमाई?) 500 रुपये होती.भिकाऱ्यांसंदर्भात अशीच एक आकडेवारी लक्ष वेधून गेली. 2004 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात नवी दिल्लीत 60 हजार, मुंबईत तीन लाख, कोलकात्यात 75 हजार, तर बंगळूरमध्ये 56 हजार भिकारी आढळले. हैदराबाद महानगराच्या बाबतीत असा निष्कर्ष आहे, की तेथे दर 375 माणसांच्या पाठीमागे एक भिकारी आहे... आता बोला. हीच गंमत मुंबईच्या संदर्भात आहे. 1996 मध्ये तेथे 20 हजार भिकारी होते. आज तेथे सहा लाख भिकारी आहेत. मुंबईत भिकाऱ्यांच्या माध्यमातून वार्षिक किती रुपयांची उलाढाल होते? याबाबतची आकडेवारीही राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे आणि तो आकडा आहे... 180 कोटी मात्र. सांगली पोलिस दरवर्षी भिकाऱ्यांसाठी दिवाळी साजरी करतात.काही श्रीमंत भिकाऱ्यांच्याही नोंदी आढळल्या. अहमदाबाद येथे एका भिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या झोपण्याच्या कापडात 44 हजार रुपये कॅश मिळाली होती. तेथेच भद्रकाली मंदिराजवळची एक भिकारी महिला नातवास खर्च करण्यासाठी रोज 50 रुपये देत होती. सारंगपूरच्या एक भिकाऱ्याने सामाजिक कार्यात सव्वा लाखाची देणगी दिली होती.हे सारे संदर्भ वाचताना गंमत वाटत होती. भिकारी हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केले, तरी विदेशी पर्यटकांना त्यांच्या रूपात भारताची ओळख होत आहे, याविषयी खेदही वाटत होता. पुन्हा प्रा. मायी यांच्या पुस्तकातील एक सूचना मार्गदर्शक वाटली. ती म्हणजे, महानगरांमध्ये भिकाऱ्यांसाठी "बेगर्स होम' उभारले गेले पाहिजेत. जळगावमध्येही या सूचनेवर महापालिका व स्वयंसेवी संस्थांनी वेगळा विचार करायला काय हरकत आहे?-------------------सदराशी संबंध नसलेली गोष्टएका आयटी कंपनीच्या समोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यास त्या कंपनीतील बडा अधिकारी 50 रुपयांची नोट देत असे. भिकारी त्याला हसून नमस्कार करायचा. काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्याने 50 ऐवजी 20 ची नोट देणे सुरू केले. भिकारी ती नोट घ्यायचा आणि केवळ स्मित करायचा. पुन्हा काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्याने त्या भिकाऱ्यास 10 रुपयांची नोट देणे सुरू केले. त्यावर निर्विकारपणे भिकारी त्या अधिकाऱ्यास म्हणाला, "महाशय, आपण काही अडचणीत आहात का? आपण मला कमी रकमेची नोट देत आहात?' तो अधिकारी म्हणाला, "होय, पूर्वी माझे खर्च कमी होते. आता, माझा मोठा मुलगा उच्चशिक्षणाला गेला म्हणून मी 50 ऐवजी 20 रुपये देत होतो. त्यानंतर मुलगी कॉलेजात गेली. तिचा खर्च वाढला म्हणून मी तुला 10 रुपये देत आहे.' तो भिकारी निर्विकारपणे म्हणाला, "तुम्हाला अजून तिसरे मूल आहे का?' अधिकारी म्हणाला, "होय, एक लहान मुलगा आहे.' त्यावर भिकारी परखडपणे म्हणाला, "महाशय, या तिसऱ्या मुलाचे शिक्षण मला देण्याच्या रकमेतून कृपया करू नका.'
Saturday, May 2, 2009
मुद्दा 49 अंश तापमानाचा !

अत्याधुनिक तंत्रज्ञान ः अत्यंत संवेदनशिल नोंदीजळगावमध्ये तापमानाचा पारा अखेर 49 अंश सेल्सिअसच्या वर गेला. काल (ता.29) दुपारी एक वाजून 16 मिनीटांनी जळगावमधील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 49.2 अंस सेल्सिअस नोंदले गेले. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात "सकाळ' च्या माध्यमातून पोचली. "इ सकाळ' च्या माध्यमातून जगभर पोचली. आज (ता. 30) या बातमीविषयी संपूर्ण महाराष्ट्रातून जळगावकरांना विचारणा व्हायला लागली. त्यात कुतूहल, जिज्ञासा, चिंता आणि उपहास असा अनेक भावनांचे मिश्रण अनुभवाला आले. यातूनच मुद्दा 49 अंश तापमानाचा समोर आला. एक बाब प्रथम स्पष्ट करायला हवी ती म्हणजे, जी मंडळी ही ऐतिहासीक नोंद लोकांच्यापर्यंत पोचवू शकले नाहीत, त्यांनी या मुद्याचा उलटा प्रवास सुरू केला. हे कसे शक्य आहे ? लोक कसे राहू शकतील ? ज्यांनी हे नोंदले किंवा सांगितले त्यांच्या तंत्रज्ञानाविषयी शंका असावी ? असेही मुद्दे समोर आले.49.2 अंश तापमानाची नोंद ही रस्त्यावरच्या कोणत्याही संस्थेने केलेली नाही. जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या जैन उद्योग समुहाच्या ग्रीनहाऊसमधील अत्याधुनिक यंत्रणेच्या संगणक मापनावर ही नोंद झाली आहे. सर्वाधिक तापमानाची ही नोंद केवळ 15 मिनीटांसाठी आहे. 1 वाजून 02 मिनीटाला तापमान 47 अंश, 1 वाजून 17 मिनीटाला 49.02 आणि 1 वाजून 32 मिनीटाला पुन्हा 48 अंश सेल्सिअस अशी नोंद आहे.जळगाव शहरात अजून दोन वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तापमानाची नोंद केली जाते. तेथे वापरल्या जाणाऱ्या पद्धतीविषयी शंका घेण्याचे कारण नाही. किंवा त्यांचीच पद्धत खरी असे कोणीही छाती टोकून सांगू शकत नाही. आता मुद्दा हा आहे की, जैन उद्योग समुहातील ग्रीन हाऊसमधील नोंद कितपत विश्वासार्हा मानावी ?जैन उद्योग समुहाचे शेती संशोधन केंद्र मोहाडी रस्स्यावरील जैन हिल्स परिसरात आहे. तेथे उतीसंवंर्धन केंद्रात विविध पिकांच्या रोपांसाठी ग्रीनहाऊस उभारले आहे. या ग्रीन हाऊसमधील तापमान कमाल आणि किमान 27 सेल्सिअस ठेवावे लागते. सापेक्ष आर्द्रता 70 टक्के असावी लागते. म्हणजे रोजच तापमान नोंदविणे व ते नियंत्रणात ठेवण्याचे काम. पूर्वी केवळ ग्रीन हाऊसमधील तापमानाची नोंदणी आणि निरीक्षण केले जात होते. यात सूर्याच्या किरणांची प्रखरता, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान याच्या नोंदी केल्या जातात. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. भवरलाल जैन यांनी बाहेरील तापमानाच्या नोंदीसाठी डिसेंबर 2002 मध्ये अमेरिकन तंत्रज्ञान असलेली संगणक प्रणाली मागविली. आपल्या भागातील शेतकऱ्यांना तापमानाचे निष्कर्ष देता यावेत हीच त्या मागची भावना होती. अर्थात बारमतीच्या प्रतिभा प्रतिष्ठानमध्ये ज्या प्रणालिचा उपयोग केला जातो तिच ही प्रणाली.वॉचडॉग ही अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीने सूर्याच्या किरणांची प्रखरता, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान नोंदविण्यासाठी स्पेक्ट्रम सिस्टिम विकसीत केली आहे. ग्रीन हाऊसच्या बाहेर सेन्सर लावण्यात आला आहे. त्याला प्रती 20 मिनीटांचा अवधी देत तापमान नोंदविण्याची सोय केली आहे. या सर्व नोंदी संगणक करतो. माणूस नाही. या सेन्सरजवळ नेहमीचे तापमापकही जोडलेले आहे.काल (ता. 29) याच सेन्सरच्या संवेदशिलतेवरुन 49.02 अंश सेल्सिअसची नोंद झाली. या साऱ्या माहितीचे विश्लेषण करणारी व्यक्ती कोण आहे ? त्या आहेत कल्याणी किरण मोहरीर. त्यांचे शिक्षण बीएस्सी बॉटनी, एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी. कामाचा अनुभव 1996 पासून याच ग्रीन हाऊसमध्ये वातावरणाच्या, तापमानाच्या बदलाच्या नोंदी करणे त्या अभ्यासणे. आता हे सारेच विश्वासार्हा असल्यावर अविश्वास ठेवणार कोण ? आहेत काही जण. त्यापैकी एक शासकीय यंत्रणा. जिच्याकडे कोणत्याही अत्याधुनिक सोयी- सुविधा नाहीत अशी अधिकारी- कर्मचारी मंडळी. बरे, तापमान अधिकच वाढले म्हटल्यावर वेगळ्या मागण्या पुढे येवू नयेत ही प्रशासन प्रमुखाला चिंता. वाढीव तापमानामुळे दुष्काळाच्या तीव्रतेचा लाभ घेण्याची प्रवृत्ती वाढू नयेही, ही सुद्दा चिंताच. आणि काही जणांना वृत्त चुकल्याची चिंता. म्हणूनच, थेट सारे समाजून घेण्याचा आणि वाचकांच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न केला. (या विषयाच्या संदर्भात कोणाकडेही काहीही शास्त्रशुद्ध माहिती असल्यास "सकाळ"कडे पाठवा. किंवा तेट बोला 9881099189 वर)जगाच्या पाठीवरही नोंदजळगावच्या काल (ता.29) च्या तापमानाची नोंद जगाच्या पाठीवरही झालेली आहे. ही नोंद योग्य असल्याचा हा दुसरा पुरावा. जगभरातील हवामानाचा, वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या अनेक संस्था आहेत. उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीवरून सध्याचे वातावरण आणि पुढील 24 तासाचे वातावरण या विषयी या संस्था अंदाज देतात. या पैकीच एक असलेल्या ऍक्युव्हेदर डॉट कॉम या संस्थेच्या वेबसाईटवरही कालचे जळगावचे तापमान 49 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. या वेबसाईटवर हवामानाशी संबंधित अनेक बाबी आपण पाहू शकतो. येथे एक उलेल्ख करावा लागेल. तो म्हणजे चार वर्षांपूर्वी पाऊस कृत्रिम पद्धतीने पाडण्याचा प्रकल्प वर्षा हा प्रयोग शेगाव (जि. बुलडाणा) येथून राबविला जात होता. त्यावेळी "व्हेदर मॉडिफिकेशन' याच वेबसाईटवर उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ढगांच्या छाचित्रावरुन अंदाज घेत किमान पाचहाजर फूट उंचावर हेलिकॉप्टर पाठवून पुरेसे बाष्प असलेल्या ढगांमध्ये (काळे ढग) द्रावण फवारून कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडला जात होता. (कृत्रिम पाऊस नाही. पाऊस खराच मात्र, तो पाडण्याची पद्धत मानवी...कृत्रिम)
Saturday, April 18, 2009
व्ही. यू. नाना !
कार्पोरेट कल्चरमध्ये जागतिक स्तरावरील संस्थांचे प्रतिनिधित्व करीत ग्रामीण शेतकऱ्यांशी संपर्क हरवून बसलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील यांना शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. स्वतः 26 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या, तब्बल 19 वर्षे अध्यक्षपद स्वतः सांभाळलेल्या श्री. पाटील यांना उतारवयात सत्ता गमावण्याचा हा अनुभव कायम यातना देत राहील. सहकारी संस्थांना "स्वतःची जहागीर' समजून वागणाऱ्या नेत्यांना शिरपूर कारखान्याचा हा निकाल धडा शिकवतो. श्री. पाटील यांच्यासह त्यांच्या चेल्याचपाट्यांचा पराभव नव्या दमाच्या वसंतराव उत्तमराव पाटील ऊर्फ व्ही. यू. नाना पाटील यांच्यासारख्या कर्तव्यकठोर प्रशासकीय अनुभव असलेल्या नेत्याने केला. सहकारात यापुढे अशाच नेतृत्वाची गरज आहे, हेही साऱ्यांनी ध्यानात घ्यावे. व्ही. यू. नानांची ओळख करून देणारी ही दखल...
काही माणसे कर्तृत्वामुळे खूप-खूप मोठी होतात. अशा मोठ्या माणसांच्या सावल्याही मोठ्या पडतात. या सावल्यांच्या आडोशात हळूहळू विभिन्न प्रवृत्तींचे अनेक कार्यकर्ते घुसतात. त्यापैकी बहुतांश सावलीचा गैरवापर करणारेच असतात. त्यांच्या उपद्रवामुळे इतर माणसे मोठ्यांच्या सावलीत येत नाहीत. सुरवातीला सावली बदनाम होते. नंतर त्यातील माणसे विश्वास हरवून बसतात. आणि जेव्हा सावलीही हरवून जाते, तेव्हा मोठी झालेली माणसे बिनसावलीची होतात. जो सावली देत नाही, त्याच्या आश्रयाला कोण थांबते? कोणीही नाही. मग मोठी माणसे केवळ उंचीने मोठी राहतात. वाढलेल्या वयात आणि थकलेल्या डोळ्यांत आपली सावली शोधत राहतात...
असेच काहीसे झाले ते सहकारातील ज्येष्ठ व वयोवृद्ध नेते शिवाजीराव गिरधर पाटील यांचे. त्यांची ओळख साऱ्या जगाला. जागतिक साखर-बीट महासंघाचे अध्यक्ष म्हणून. भारतात ओळख ती राज्यसभेचे खासदार आणि साखर महासंघाचे अध्यक्ष म्हणून. खानदेशात ओळख ती शिरपूर साखर कारखान्याचे अध्यक्ष व धुळे जिल्हा बॅंक, राज्य शिखर बॅंकेचे संचालक म्हणून. संवेदनशील अभिनेत्री कै. स्मिता पाटील यांचे पिताश्री म्हणूनही त्यांचा लौकिक होताच. असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या शिवाजीराव पाटील यांना शिरपूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दारुण पराभव पाहावा लागला. 17 पैकी त्यांच्यासह 16 जण पराभूत. वर म्हटल्याप्रमाणे "सावलीच हरवल्याचा' हा परिणाम म्हणावा लागेल. शिवाजीरावांच्या कार्याविषयी येथे लिहिण्याचे कारण नाही. मात्र, ज्यांच्यामुळे शिवाजीराव यांना हाही अनुभव घ्यावा लागला त्या व्ही. यू. पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी ही दखल आहे.
कोण आहेत हे व्ही. यू. नाना? यांचे नाव सहकारात पुढारी म्हणून कुठे वाचले नाही. हो, कधीतरी शिरपूर कारखान्यात हा माणूस सहाय्यक लेखापाल, नंतर कार्यकारी संचालक आणि अल्पकाळ कार्याध्यक्ष होता, असे कुठेतरी स्मरणात आहे. मग, मध्येच कसा काय पुढारी झाला? प्रशासकाचा नेता होण्याचा हा प्रवास कसा? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांतून व्ही. यू. नानांचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाते...
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द, मेहनतीच्या जोरावर काहीतरी वेगळे करून दाखविण्याची ईर्षा मनात बाळगली आणि ते साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केली तर काय घडते? याचे उत्तर आहे वसंतराव उत्तमराव पाटील तथा व्ही. यू. नाना पाटील. शिरपूर कारखान्यात सहाय्यक लेखापाल, मुख्य लेखापाल, सचिव, कार्यकारी संचालक, कार्याध्यक्ष असा प्रवास करत आज ते अध्यक्ष झाले आहेत. थोडे फिल्मी वाटावे असेच हे कथानक. रहिमपुरे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे 20 सप्टेंबर 1954 ला त्यांचा जन्म झाला. त्यावेळी कुटुंबाची स्थिती हलाखीचीच होती. वडिलोपार्जित व्यवसाय शेती. शेतीची कामे करीत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण शिंदखेड्यात पूर्ण केले. शिरपूर येथील "एसपीडीएम' महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी मिळविली. पदव्युत्तर शिक्षण धुळे येथे विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले. त्यानंतर 1976 मध्ये भोरस (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील बेलगंगा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सहाय्यक लेखापाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 1979 ते 1982 पर्यंत त्यांनी धुळे तालुक्यातील नवलनगर परिसरातील संजय सहकारी साखर कारखान्यात लेखा विभागात काम केले. अनुभव व प्रशासनातील कार्यकुशलतेमुळे त्यांना 1983 मध्ये स्थापन झालेल्या शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्यात उपमुख्य लेखापाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिचे त्यांनी सोने केले.
परिश्रमाच्या बळावर अल्पावधीतच त्यांना डिसेंबर 1983 मध्ये मुख्य लेखापाल म्हणून पदोन्नती मिळाली. सहकारी साखर कारखान्यात नोकरीचे सर्वोच्चपद कार्यकारी संचालकाचे असते. परंतु त्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. वयाच्या चाळिशीत जिद्दीने अहोरात्र अभ्यास करून त्यांनी 1993 मध्ये पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत घेण्यात येणारी कार्यकारी संचालकपदाची प्रवेश परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. त्यानंतर 1994 ते 98 पर्यंत ते शिरपूर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक होते. प्रशासनातील अनेक धाडसी निर्णय घेत त्यांनी कारखान्याच्या प्रगतीस हातभार लावला. काही कारणास्तव त्यांनी 1998 मध्ये शिरपूर साखर कारखाना सोडला. 1998 मध्ये गुजरातमधील बोडोली येथे बोडोली सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. तेव्हा हा कारखाना उभारला जात होता. अवघ्या दोन वर्षांत कमीत कमी खर्चात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेला सहकारी साखर कारखाना त्यांनी उभा केला. त्यानंतर 2003 ते 06 पर्यंत त्यांनी बडोदा शुगर मिलमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले. श्री. शिवाजीराव पाटील यांच्या आग्रहाखातर त्यांनी पुन्हा 2006 मध्ये शिरपूर साखर कारखान्याच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळली. हा कारखाना काही काळ बंद अवस्थेत होता. पुन्हा कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तथापि, संचालक मंडळातील काही जणांच्या दुराग्रहामुळे आणि श्री. शिवाजीराव पाटील यांनीही "धरसोड भूमिका' घेतल्याने 12 जुलै 2007 ला व्ही. यू. पाटील यांना कार्याध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र, या आघाताने ते खचले नाहीत. हा कारखाना एकदा आपण चालवूच, या जिद्दीने त्यांनी व्यूहरचना केली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचे शेतकरी पॅनल 17 पैकी 16 जागा जिंकून सत्तेत आ
ले. काळाने व्ही. यू. पाटील यांनाच आता अध्यक्षपद मिळवून दिले आहे. 10 एप्रिलला पहाटे त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. हा सत्ताबदल अनुभवताना श्री. शिवाजीराव पाटील यांच्या डोळ्यांत अश्रू आले.
श्री. व्ही. यू. पाटील उत्तम प्रशासक आहेत. विविध कारखान्यांत जबाबदारीच्या पदांवर काम केलेले असल्यामुळे कामगारांचे प्रश्न, वेतन, ऊसतोडणी, ऊस वाहतूक, उसाचा भाव, संचालकांचे सत्तेतील वागणे अशा कळीच्या मुद्यांची त्यांना चांगलीच माहिती आहे. खानदेशात कधीकाळी पुरुषोत्तमनगर, बेलगंगानगर, नवलनगर, भोरस, जिवरामनगर असे अनेक नागरी परिसर सहकार प्रकल्पांमुळे फुललेले होते. आज तेथे काय आहे? यावर चर्चा करण्याची गरज नाही. सहकार प्रकल्पांच्या अवस्थेवरही बोलण्याची सोय नाही. अशा परिस्थितीत एक प्रशिक्षित कुशल प्रशासक सहकार तत्त्वावरील कारखान्याला कशा पद्धतीने ऊर्जितावस्थेत आणतो? हेच पाहण्याची साऱ्यांना उत्सुकता आहे. व्ही. यू. नानांची "सावली' मोठी व्हावी. मात्र, भविष्यात ती कधीही हरवू नये, अशाच शुभेच्छा या वेळी त्यांना द्यायला हव्यात...
सदराशी संबंध नसलेली गोष्ट
जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या संदर्भातील हा किस्सा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना, ते आणि त्यांचा गौरवर्णीय मित्र एकदा फिरायला निघाले होते. वाटेत समोरून एक कृष्णवर्णीय व्यक्ती येत होती. त्याने श्री. जॉर्ज यांना ओळखून मंद स्मित केले आणि डोक्यावरील हॅट काढून नम्रपणे अभिवादन केले. उत्तरादाखल श्री. जॉर्ज यांनीही त्याला अभिवादन केले. तो काळ गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यातील संघर्षाचा होता. श्री. जॉर्ज यांच्यासमवेत असलेल्या गौरवर्णीय मित्राला श्री. जॉर्ज यांनी त्या कृष्णवर्णीयाला केलेला नमस्कार आवडला नाही. मित्र म्हणाला, "अरे तू एका कृष्णवर्णीयाला नमस्कार करतो. हे तुझ्या पदाला आणि तुला शोभत नाही.' त्यावर श्री. जॉर्ज म्हणाले, "मित्रा, त्या कृष्णवर्णीयाने मला नमस्कार करीत त्याची सभ्यता, शिष्टाचार आणि संस्कृती दाखविली. मी तर राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्या कितीतरी पटीने मला अशा गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. केवळ वर्ण हेच माणसाच्या मूल्यमापनाचा निकष नाही. सभ्यता ही सुद्धा एक मोजपट्टी आहेच.'

Monday, March 30, 2009
सुगंधित आनंदी पाने !
खानदेशकन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पहिल्या जळगाव दौऱ्याच्या आठवणी जागविणारी "गगन भरारी कर्तृत्वाची, नजर माहेरी ममतेची' ही स्मरणिका आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या सहस्त्रचंद दर्शन सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध झालेला "गौरवांजली' हा गौरव ग्रंथ वाचनात आले. रचना, लेखांकन, संपादन, छायाचित्र संयोजन आणि गुणवत्तापूर्ण छपाई अशा विविध निकषांवर हे दोन्ही अंक अप्रतिम आहेत. अनेक आठवणी ताज्या करणारी ही "आनंद पाने' आहेत. त्याची दखल...
आठ फेब्रुवारी 2008 चा शुक्रवार तमाम जळगावकर विसरलेले नाहीत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तथा खानदेशकन्या प्रतिभाताई पाटील या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माहेरातील मान्यवरांनी त्यांचा "न भुतो न भविष्यती' असा सत्कार केला. तोच हा दिवस. लाडक्या लेकीच्या सत्कारासाठी, तिला माहेरीची साडीचोळी देण्यासाठी सारा खानदेश कसा अधीर, उत्साहित झाला होता हे आजही हजारो लोकांनी आठवते आणि ते प्रसंग काल- परवाच्या आठवणींप्रमाणे लाखभर डोळ्यांत अजूनही तरंगून जातात. राष्ट्रपती प्रतिभाताईंचा दौरा यशस्वी करण्याचे आव्हान जिल्हा नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या सोबत साऱ्याच राजकीय नेत्यांनी- शासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारले होते. ताईंचा तो दौरा साऱ्या अर्थाने आठवणीतलाच ठरला.
या दौऱ्यातील अनेक प्रसंग पुन्हा ताजे टवटवीत करण्याचे काम गगन भरारी कर्तृत्वाची, नजर माहेरी ममतेची' या स्मरणिकेने केल्या आहेत. माध्यम क्षेत्रातील ज्येष्ठ आनंद गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध झालेल्या या स्मरणिकेत छायाचित्रांचा वापर आणि मजकुराची मांडणी हेच खरे वैशिष्ट्य आहे. या स्मरणिकेच्या प्रस्तावनेत श्री. गुप्ते सुरवातीलाच म्हणतात, सुगंधी वासाचं फूल पुस्तकांच्या पानात दाबून चुरगळतं खर, पण पुस्तक उघडल्यानंतर एक मंद सुगंध ते देत राहतं. महिनों- महिने. रम्य आठवणींचंही असंच असतं.' हेच वाक्य स्मरणिका वाचताना मनांत रुंजी घालत राहतं. पानोपानी ताईंच्या दौऱ्याचा सुगंध पुन्हा पुन्हा आठवणी ताज्या करतो. ताईंना सत्काराचे निमंत्रण देण्यापासून स्मरणिका सुरू होते. बैठका, सह्या, रॅली, व्यासपीठ उभारणी, ताईंचे आगमन, रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, रस्त्यावर गर्दी, कार्यक्रमस्थळी गर्दी, सारी गर्दीच गर्दी, सत्काराचा क्षण आणि क्षण, क्रीडा संकुल उद्घाटन असे सारे प्रसंगच जिवंत करण्याचे कसब या स्मरणिकेच्या निर्मितीत साधले गेले आहे. ही स्मरणिका केवळ खासगी वितरणासाठी आहे मात्र, ती आपल्या संग्रही असावी या अपेक्षेने तिची प्रत मिळविण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा.
गौरवांजली...!
खानदेशचे लोकनेते तथा लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी गेल्या 16 जूनला वयाच्या 79 व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. हा कार्यक्रम खूप आधी झाला मात्र, त्यानिमित्त प्रसिद्ध केलेला "गौरवांजली' अलीकडे वितरित झाला आहे. लोकसेवक मधुकराव गौरव समितीतर्फे प्रकाशित ही स्मरणिका 324 पानांची आहे. त्याचे देणगी मुल्य पाचशे रुपये आहे. या अंकाची रचनाही अत्त्युत्तम आहे. श्री. शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात समन्वयक प्रभाकर चौधरी व आदींनी मेहनतीने केलेले काम प्रत्येक पानांपानातून दिसून येते. श्री. मधुकरराव तथा बाळासाहेब चौधरी यांचे व्रतस्थ चरित्र आणि चारित्र्याविषयी समाजातील विविध मान्यवर अत्यंत आत्मियतेन लिखाण करतात, त्यातून बाळासाहेब यांना अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढतच जाते. राष्ट्रपती प्रतिभाताई (तेव्हा त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या), मधुमंगेश कर्णिक, कै. यशवंतराव चव्हाण, कै. पी. व्ही. नरसिंहराव, रा. सु. गवई, प्रा. ठाकूरदास बंग, ग. प्र. प्रधान, चंद्रशेखर धर्माधिकारी, राम शेवाळकर, प्रा. एन. डी. पाटील, वि. वि. चिपळूणकर,, डॉ. कुमार सप्तर्षी अशी शेकड्यांनी मान्यवर मंडळी बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्व या स्मरणिकेतून उलगडत जातात. (यातील काही लेख पूर्वीच्या इतर प्रकाशनातून संपादित केले आहेत.) कै. कुसुमताई चौधरी यांच्याही भावना "इकडच्या स्वारींचा वाढदिवस' म्हणून यात वाचता येतात. बाळासाहेब यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांची दूर्मिळ छायाचित्र या स्मरणिकेत आहेत. म्हणूनच ही पाने सुगंधी आनंदाची वाटतात.
ताईंची कृतज्ञता
या दोन्ही स्मरणिकांची पाने चाळताना एक प्रश्न सातत्याने डोक्यात फिरत राहतो. तो हाच की, राज्याच्या मंत्रिमंडळात समकालीन मंत्री असलेल्या ताई आणि बाळासाहेब यांचा एकमेकांच्या प्रती स्नेह कसा राहिला असेल ? त्याचा थोडा उलगडा "गौरवांजली' मध्ये ताईंच्या लेखात होतो. ताई म्हणतात, "बाळासाहेब जळगावला माझ्याकडे आल्यानंतर मोठा भाऊ बहिणीकडे आल्याचा आनंद व अनुभव मला येत असे' ताईंनी बाळासाहेब आदराने उल्लेख जळगावच्या नागरी सत्कार प्रसंगीही केला होता. मात्र, बाळासाहेब यांचे ताईंशी कशा प्रकारचे ऋणानुबंध होते ? हे अद्याप वाचनात आलेले नाही. बाळासाहेब यांच्या "लोकसेवक' या चरित्रात ताईंच्याविषयी कुठेही उल्लेख दिसत नाही. (बाळासाहेब यांनी ताईंच्या विषयी "सकाळ' च्या "राष्ट्रप्रतिभा स्वागतम् ' या पुरवणीत एक लेख लिहिलेला आहे)
सदराशी संबंध नसलेली गोष्ट
आश्रमातील तिघा शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची परवानगी गुरूंकडे मागितली. गुरू म्हणाले उद्या सायंकाळी निर्णय घेऊ. दुसऱ्यादिवशी सकाळी गुरूंनी तिघांना शेजारच्या नदीतून हंडे भरून आणण्यास सांगितले. तिघे जेव्हा आश्रमाच्या बाहेर पडले तेव्हा तेथे पसरलेले काटे तिघांच्या तळ पायात रुतले. पहिला तेथेच काटे काढत बसला. दुसरा काटे काढून पाणी आणण्यास गेला. तिसऱ्याने मात्र झाडू रस्ता स्वच्छ करीत काटे बाजूला केले. त्यानंतर तो पाणी आणण्यास गेला. गुरू तिघांना पाहत होते. त्यांनी सायंकाळी तिघांना बोलावले. दोघांना आश्रमातच थांबण्याचे सांगून तिसऱ्याला गृहस्थाश्रम जाण्याचे सांगितले. ते म्हणाले, "शिक्षण आचरणात आणले नाही तर शिक्षण आंधळे असते आणि कृतीत शिक्षण दिसले नाही तर आचरण पांगळे असते.'

Tuesday, March 24, 2009
सकाळ खानदेश दिवाळी अंकाचा गौरव
सकाळ खानदेशतर्फे दिवाळी २००८ मध्ये ग्रामविकास, ग्रामविकास, ग्रामसमृद्धी या विषयावर दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला होता. यात केंद्रीय- राज्याचे ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, डाँ. आनंद कर्वे, मोहन धारीया, चैत्राम पवार यांच्या मुलाखती, ग्रामदूत म्हणून नीलिमा मिश्रा, अरुण निकम, विजया पाटील, देवाजी तोफा, साहेबराव पाटील, डाँ. धनंजय नेवाडकर यांच्या विषयी माहिती, विकासाच्या वाटेवरील २१ गावांची माहिती, गाव लईं न्यारं म्हणूनि २४ गावांची माहिती होती. या शिवाय ग्रामगीते म्हणून मान्यवर कविंच्या कविता व ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांची छायाचित्रे होती. या अंकाचे मुखपृष्ठ श्री. अनिल उपळेकर (पुणे) यांनी चितारले होते. या अंकाला तुका म्हणे पुरस्कार बुलडाणा येथे 15 फेब्रुवारी २००९ ला प्दान करण्यात आला.
Monday, March 23, 2009
झुलत्या मनोऱ्याचे 18 वे "श्राद्धवर्ष' !

एरंडोलपासून अवघ्या सोळा किलोमीटरवर असलेल्या फरकांडे येथील प्रार्थनास्थळातील जगप्रसिद्ध दोन झुलत्या मनोऱ्यांपैकी एक मनोरा कोसळल्याच्या घटनेला गेल्या 21 मार्चला 18 वर्षे पूर्ण झालीत. वास्तूशास्त्रात जगभर चमत्कार मानले जाईल असे स्थळ नामशेष होण्याचे हे 18 वे "श्राद्ध' वर्ष.
खानदेशातील ेऐतिहासिक स्थळे कालौघात नष्ट होत असल्याचे हताशपणे पाहण्याशिवाय आपण काही करू शकतो का......?ंफरकांडे. अवघ्या पाच हजार वस्तीचे गाव. सामुहिक सहभागातून गाव विकासाच्या काही योजना सध्या तेथे यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. त्यात तंटामुक्त अभियानसोबत व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, बचतगट स्थापना असे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने यशस्वी होत आहेत. तरीसुद्धा सामुहिक "दखल' घ्यावी असे कोणतेही कर्तृत्व अद्याप ग्रामस्थांनी दाखविलेले नाही.मात्र, इतिहासाच्या पानांमध्ये "फरकांडे' ची न पुसली जाणारी अशी नोंद झालेली आहे. ती तेथील "झुलत्या मनोऱ्यांमुळे'. जळगाव जिल्ह्याच्या इतिहासाचा आढावा किंवा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती फरकांडे शिवाय परिपूर्ण होत नाही. साऱ्या जगाची माहिती देणाऱ्या इंटरनेटवर सुद्धा "स्विगिंग टॉवर्स ऑफ फरकांडे' म्हणूनच फरकांडेची ओळख आहे. ही ओळख अत्यंत जुजबी माहिती देणारी आहे. जवळपास दहा- बारा वेबसाइटवर फरकांडेच्या झुलत्या मनोऱ्याची माहिती नोंदविताना सोबत पाटणादेवी मंदिर आणि तेथील दीपबुरूजांचे छायाचित्र दिसते. प्रथमदर्शनी तेच झुलतेमनोरे असावेत असा गैरसमज होऊ शकतो.जगाला माहिती देणाऱ्या या "महाजाला'त फरकांडेच्या मनोऱ्यांचे "शाब्दिक' चित्र (होय, एकाही वेबवर छायाचित्र नाही) जेवढ्या दुर्लक्षित पद्धतीने दिसते, तेवढ्याच उपेक्षेने राज्य शासन आणि पुरातत्त्व विभाग या मनोऱ्यांच्या देखभाल- दुरुस्तीबाबत वागत आहे. जळगाव जिल्हा गॅझेटीयर किंवा राजपत्रात आजही फरकांडे येथे दोन झुलते मनोऱ् असल्याची नोंद आहे. तीच माहिती इंटरनेटवरही आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे ?तब्बल 18 वर्षांपूर्वी म्हणजे 21 मार्च 1991 ला प्रार्थनास्थळालगतचा डाव्या बाजूचा मनोरा कोसळला. आता तेथे केवळ विटा- दगडांचा ढीग आहे. उरला दुसरा मनोरा. तो सुद्धा देखभाल- दुरुस्ती अभावी कधीही कोसळू शकतो. त्यानंतर गेल्या 18 वर्षांत या मनोऱ्यांच्या व्यथा सातत्याने मांडण्याचे काम केले ते तेथील मनोरा बचाव समितीने. 6 जुलै 1995 ला दरवर्षी उपोषण करणे, निवेदन देणे असा कार्यक्रम या समितीने सुरूच ठेवला. त्यांना पहिली मदत केली ती खानदेशचे नेते रोहिदास पाटील यांनी. ते धुळ्याचे नेते आहेत असे मुद्दाम म्हटले नाही, कारण जळगाव जिल्ह्यातील पुढाऱ्यांना उगाचच दुखावल्यासारखे वाटायला नको. श्री. पाटील यांनी 25 फेब्रुवारी 1997 ला तत्कालीन पर्यटनमंत्री प्रकाश मेहता यांना भेटून निवेदन दिले. अर्थात, कार्यवाही झाली नाही आणि मनोरा बचाव समितीला सलग 17 वर्षे एक दिवस उपोषण करण्यासाठी मिळाला. नाही म्हणायला शासनाने एक काम केले. ते हेच की, 25 नोव्हेंबर 1997 आणि 14 जून 2001 च्या राजपत्रात फरकांडेच्या झुलत्या मनोऱ्यांना (?) ऐतिहासिक स्मारक म्हणून मान्यता देवून टाकली, एकदाची ! पण ही मान्यता दिल्यानंतर काय केले जाते ? हे कोणालाही माहित नाही. कारण, आजपर्यंत कोसळलेल्या मनोऱ्याच्या पुनर्बांधणीसाठी किंवा जो उभा आहे त्याच्या दुरुस्तीसाठी एक रुपया सुद्धा शासनाकडून आलेला नाही. बघा आठवून, गेल्या अठरा वर्षांमध्ये युती- आघाडीच्या शासनात जळगावचे किती पुढारी मंत्री झाले आणि नंतर सत्तेवरून पायउतारही झाले. त्यांनी काय केले ?...आम्ही सुद्धा हताशपणे बघण्याशिवाय काही करू शकतो का ? (नाही...तसे करू शकतो...माणसी किमान एक एक रुपया गोळा करून मनोऱ्याच्या दुरुस्तीसाठी कलेक्टर यांच्याकडे लोकवर्गणी देवू शकतो. तसे करायचे असल्यास सकारात्मक प्रतिसाद द्या...9881099189 वर) अन्यथा काही वर्षांनी आपण मुलाबाळांना चित्रात हे मनोरे दाखवू शकू.मनोऱ्यांचे ऐतिहासिक महत्त्व फरकांडे जवळ उतावळी आणि अंजनी नद्यांचा संगम आहे. तेथून जवळ एका प्रार्थनास्थळाच्या दर्शनीबाजूस हे दोन मनोरे होते. या प्रार्थनास्थळावर तीन गोलाकार घुमटही आहेत. मनोऱ्यांची उंची 16 मीटर (पन्नास फूट) आहे. आतील बाजूस 15 मीटर लांबीची महिरपींची भिंत आहे. वर जाण्यासाठी गोलाकार 56 पायऱ्या आहेत. वर डंबरी असून तेथे उभे राहून मनोऱ्यास हलविण्याचा प्रयत्न केल्यास पूर्वी दोन्ही मनोरे हलत असत. म्हणून त्यांना झुलते मनोरे म्हणत. आता एकच मनोरा आहे.हे गाव हे भुईकोट किल्ल्यात (नगरदूर्गात) वसले होते. गावाच्या भोवती आजही तटबंदीचे भग्नावशेष दिसतात. हा किल्ला फारुकी राजांच्या काळात 400 वर्षांपूर्वी बांधला गेला असावा असा तर्क आहे. त्याच काळात प्रार्थनास्थळाचे काम झाले असावे. काहीजण मात्र हे प्रार्थनास्थळ 270- 275 वर्षांपूर्वी चांद मोमीन यांनी बांधल्याचे सांगतात. स्थापत्यकलेचा चाहता मिरान आदिलखान याच्या काळातही (1438- 41) हे बांधकाम झाल्याचा अंदाज केला जातो. (संदर्भ ः जळगाव जिल्ह्यातील किल्ले आणि गढ्या ः नि. रा. पाटील)झुलत्या दीपमाळापारोळा येथून अवघ्या सहा किलोमीटरवर म्हसवे आहे. तेथे झुलत्या मनोऱ्या प्रमाणेच झुलत्या दीपमाळा आहेत. या दीपमाळांचा परीघ 4.8 मीटर असून उंची 9.3 मीटर आहे. त्याचे बांधकाम विटा आणि चुन्यातच केले आहे. या दीपमाळाही फरकांडे येथील झुलत्या मनोऱ्याप्रमाणे हालतात. फरकांडे प्रार्थनास्थळातील मनोरे आणि म्हसवे येथील झुलत्या मनोऱ्यांचे स्थापत्य हे आधुनिक काळातील स्थापत्य विशारदांसाठी एक आव्हानच आहे. अशा प्रकारच्या दीपमाळा किंवा मनोरे हे भारतात इतत्र कुठेही नाहीत. ब्रिटिशांनी मनोऱ्यांचे स्थापत्य समजावून घेण्यासाठी प्रयत्न केले होते. आपण हे अद्भुत स्थापत्य किमान एकदा तरी पाहिले आहे का ?सदराशी संबंध नसलेली गोष्ट"सुलभ इंटरनॅशनल' हे नाव सर्वांना परिचित आहे. डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या प्रथेचे उच्चाटन कसे करावे ? या सामाजिक प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी या सेवेच्या माध्यमातून केला आहे. जेव्हा त्यांनी काम सुरू केले तेव्हा ते एकटे होते. आज त्यांनी किमान 10 लाखांपेक्षा जास्त शौचालये बांधली असून, डोक्यावरून मैला नेण्याची प्रथाही बंद झाली आहे. अर्थात मध्यंतरी वीस वर्षांचा काळ गेला असून, डॉ. पाठक निष्ठेने काम करीत राहिले आहेत.
Saturday, March 21, 2009
मायावतीच पंतप्रधान !

भारताच्या या पुढील पंतप्रधान महिला असण्याची शक्यता अधिक आहे. कारण, या पदासाठी बहुमताची जुळवाजूळव करण्यासाठी मायावती, जयललीता, ममता, सोनिया यांच्या सहकार्याची किंवा पसंतीची गरज पडणार आहे. या चारही महिलांच्या तुलनेत मायावती यांचे पारडे मला जड वाटते. त्याची कारणे १) मायावती सध्या उत्तरप्रदेश सारख्या सर्वांत मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. २) कोणत्याही घटकाशी- पक्षाशी त्या तडजोड करु शकतात. (राजकारणाच्या पूर्वार्धात त्यांनी सवर्णांना शत्रू मानले. आता उत्तर्धात त्यांनी चक्क यू टर्न घेत सर्व सवर्णांशी जमवून घेतले आहे नव्हेतर, सत्तेत सहभागही दिला आहे) ३) स्वतःच्या स्वार्थासाठी त्या कोणत्याही व्यक्तीशी तडजोड करु शकतात ४) त्यांचे अर्थकारणही सशक्त आहे ५) त्यांचे दलित असणे हे जसे त्यांना पंतप्रधानपदाकडे नेणारे आहे तसे ते इतरांना सहकार्यासाठी प्रवृत्त करणारे आहे. (देशाची पहिली महिला आणि त्यात पुन्हा दलित महिला पंतप्रधान करण्यासाठी आम्ही पाठींबा देत आहोत, हे अनेकांना सांगणे सोयीचे होईल). मायावती यांच्यानंतर महिला पंतप्रधान होण्याची संधी सोनिया यांनाच आहे. त्याची काही कारणे १) १८ व्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटप करताना घटक पक्षांनी काँग्रेसला अगदीच दुय्यम वागणूक दिली आहे. (उदा. लालूप्रसाद- रामविलास पास्वान यांचे बिहारमधील जागा वाटप, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली रस्सीखेच) हे पाहता काँग्रेस पक्ष फार काळ श्री. मनमोहनसिंग यांना नेते मानमार नाही. काँग्रेस खतरेमे है म्हणत, सारी सत्तालोभी मंडळी सोनियाजी तुम्हीच पंतप्रधान व्हा असा गळा काढतील. २) राहूल गांधी यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करुन सोनियाजींना कधीतरी पंतप्रधानपद स्वीकारावे लागेल ३) इतर घटक पक्षांतील काही मंडळींना सोनियाजींच्या नावाने दिल्लीतील सोयीचे राजकारण करणे शक्य होते, ती मंडळीही फार दिवस श्री. मनमोहनसिंग यांना नेता मानणार नाहीत. उर्वरीत जयललीता व ममता यांचा फारतर पाठींबा म्हणून सहभाग असेल. त्यांना पंतप्रधानपदाची संधी दिसत नाही. मात्र, त्यांची पसंती ग्राह्य राहील.
Subscribe to:
Posts (Atom)