संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा चेहरा मोहरा म्हणून स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या नंतर एकनाथराव खडसे आणि नितीन गडकरी यांच्या चेहऱ्यांकडे पाहिले जात होते. महाजन, मुंडे दोघेही अकाली गेले. त्यांच्या नंतर राज्यातील सत्तास्थाने गडकरी, खडसे भोवती काही काळ होती. यापूर्वी केंद्रात भाजप आघाडी आणि राज्यात युतीची सत्ता असताना गडकरींना दोन्ही ठिकाणी मंत्रीपद मिळाले होते. खडसेही पहिल्यावेळी जरा उशिरानेच मंत्री झाले होते. आता केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप आघाडीचे सरकार असून गडकरी मंत्रीपद उपभोगत आहेत. राज्यातही भाजप नेतृत्वातील युतीचे सरकार असून खडसेंना मात्र सत्तेच्या बाहेर सक्तीने बसवले आहे.
मला भाजप सोडायचा नाही पण पक्षच बाहेर ढकलत आहे. तशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे अशी खंत स्वतः खडसे यांनी रावेर येथे व्यक्त केली आहे. सर्व पक्षिय नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंनी आपली खंत व्यक्त केली. अर्थात, तेथे उपस्थित असलेले काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे खडसेंना म्हणाले, पक्ष ढकलण्याची वाट का पाहाता, तुम्हीच निर्णय घ्या. आम्ही आहोत मदत करायला. खडसेंची खंत आणि चव्हाणांचे आवतन लगेच सोशल मीडियात व्हायरल झाले.
भाजपत राहायचे किंवा नाही हा निर्णय खडसे यांना स्वतःलाच घ्यायचा आहे. मागील पंधरवड्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत जळगाव येथे खडसे यांच्याविषयी बोलून गेले, खडसे भाजपत फार काळ राहणार नाहीत. भाजप विषयी जी खंत खडसे वर्तमान काळात व्यक्त करीत आहेत तिचा भविष्य काळ राऊत यांनी बोलून दाखवला. मात्र त्यावर खडसेंनी राऊत यांना सुनावले आणि म्हटले, मी जो पक्ष वाढवला तो सोडणार नाही. अर्थातच, राऊत मुंबईत गेल्यानंतर बातमी अशीही होती की, खडसे हे शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंना भेटणार आहेत म्हणून. सध्या तरी तसे काही घडलेले नाही.
राऊतांच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पारोळ्यात येवून गेले. त्यांनीही खडसेंना सोबतच्या पंगतीत या असे आमंत्रण दिले होते. मात्र तेव्हा खडसेंनी जाहिर उत्तर न देता पवार यांच्या कानात आपली व्यथा सांगितली. त्यावरुन पवार कळ लावून गेले की, खडसेंनी माझ्या कानात जे सांगितले ते जर मी जाहिर केले तर खळबळ उडेल. खडसे आता जसे भाजपत अस्वस्थ आहेत, तसे स्व. मुंडे ही काही काळ अस्वस्थ होते. ते सुध्दा ज्येष्ठनेते शरद पवार यांचा सल्ला घ्यायला गेले होते. पण स्व. मुंडे हे कधी ही स्व पक्षियांवर घसरत नसत. खडसे मात्र स्व पक्षियांवरील आपला राग विधी मंडळात व बाहेर सुध्दा लपवू शकत नाहीत.
खडसेंचाही पवार कुटुंबियांवर विश्वास आहे. त्यातल्या त्यात अजित पवारांशी ते जुळवून घेतात. शरद पवार मात्र खडसेंशी अंतर करुन ठेवतात. विरोधी पक्षनेतेपदी खडसे असताना शरद पवार यांनी अत्यंत शेलक्या भाषेत खडसेंचा उल्लेख तोडीपाणी करणारे नेते असा केला होता. शरद पवार असे इतर कोणाविषयी अद्याप बोललेले नाहीत. खडसेंचे मंत्रीपद गेल्याच्या वेळी खान्देशच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी खडसेंच्या फार्म हाऊसवर जावून भेट घेतली होती. परंतु याच अजित पवार यांनी खडसेंच्या घराणेशाहीचा मुद्दा उकरुन काढत पत्नी व मुलीकडे असलेल्या पदांकडे अंगुली निर्देश केला होता. आता सुध्दा खडसेंना सोबत या म्हणणारे अशोक चव्हाण यांनी गजमल पाटील यांचे कथित लाच प्रकरणात खडसेंवर अगदी वाईट शब्दांत टीका केल्याचे आठवते आहे.
महाराष्ट्रात भाजप व शिवसेना युती मोडण्याचा धाडसी निर्णय जाहीर करण्याचे श्रेय खडसे यांनी स्वतःच यापूर्वी घेतले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे हे मुक्ताईनगर मतदार संघात जावून खडसेंविषयी काय काय बोलले हे जळगाव जिल्ह्यास माहित आहे. अशाही स्थितीत खडसे व ठाकरे भेट होणार अशी अफवा पसरत असते.
खडसेंची अलिकडची वक्तव्ये ही त्यांची राजकीय आगतिकता व असहाय्यता स्पष्ट करतात. कधी तरी खडसे म्हणाले होते, माझी आणि लालकृष्ण अडवाणींची भाजपत अवस्था सारखीच आहे. म्हणजे काय तर सत्ता हाती असूनही अडवाणी व खडसे दोघेही सत्तेची फळे खावू शकत नाहीत. नंतर कधी तरी खडसे म्हणाले, कृषि विकास करणाऱ्या शरद पवार यांच्या बारामतीत जावून राहायची इच्छा होते. आता तर खडसेंना पक्षातून बाहेर ढकलले जात असल्याची जाणिव झालेली आहे. अशा अवस्थेत स्वतःचे मन मारुन आणि आपल्या लाखो समर्थकांचा हिरमोड करुन खडसे भाजपत का थांबत असावेत ? हा प्रश्न पडतो. खरे तर खडसेंनी भाजप सोडायला हिच वेळ योग्य आहे. खान्देशच्या या झुंझार व तडफदार नेत्याने कधीच मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीसच्या नाकावर टीच्चून पक्षाला रामराम करायला हवा होता.
खडसेंची भाजपत आज काय अवस्था आहे ? तर पक्षातले इतर नेते सुध्दा संपर्कात राहिलेले नाही. ज्यांना पक्षांतर्गत पदांवर बसवले त्यांनी सुध्दा घराचे वासे फिरवून टाकले. याचे एकमेव उदाहरण म्हणजे, खडसे यांनी गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन जळगाव शहरातील महामार्ग विकासासाठी १०० कोटी रुपये आणले त्याची जाहिर माहिती आमदार सुरेश भोळेंनी दिली. वास्तविक या निधीसाठी भोळे व खासदार ए. टी. पाटील यांचा काडीचा संबंध नव्हता, पण निधी आम्ही आणला असे श्रेय भोळे व पाटील यांनी घेवून टाकले. हे खडसेंनीच सांगितले आहे.
अखेर खडसेंना स्वतः पत्रकारांशी गप्पा मारुन निधी मी आणला हे सांगावे लागले. त्यातही जळगाव येथे समांतर रस्ते मागण्यासाठी लोक रस्त्यावर आले तर खडसेंना हेही सांगावे लागले की, हे रस्ते करायची जबाबदारी मनपाची आहे. पण, जळगाव जिल्ह्यासाठी रस्ते विकास अंतर्गत १६ हजार कोटी रुपये गडकरी देणार होते, ते कधी मिळतील यावर खडसे भाष्य करु शकले नाही. कारण, गेल्या दोन वर्षांत केंद्र व राज्य सरकारने खडसेंनी सूचविलेल्या अनेक विकास योजना बासनात गुंडाळल्या आहेत. अशाच प्रकारे महामार्ग विस्ताराचा ४७२ कोटींचा प्रकल्प आणि त्यासाठी केलेल्या भूमिपूजनाची कोनशिला आहे कुठे ? असा प्रश्न पडतो.
खडसेंनी दोनवेळा मंत्रीपद उपभोगले. विरोधी पक्षनेता म्हणूनही इतरांना सळो की पळो करुन सोडले. मंत्री जेव्हा सत्तेत असतो तेव्हा वरिष्ठ सरकारी अधिकारी मुलगी, मुलाचे नाते लावते. पण पद गेले की, मुलगी सारखी वागणारी वरिष्ठ पदावरची व्यक्ति फोनही घेत नाही, असा अनुभव खडसेंना जरुर असावा. जळगाव मनपावर खडसेंची मर्जी खपा होती. पण खडसेंचे मंत्री पद गेले आणि मेहरुण तलाव सुशोभिकरणाचा विषय घेवून मनपाला निधी कोणी मिळवून दिला, हे खडसेंना ज्ञात असेलच. त्याप्रमाणेच आताच्या पालकमंत्र्यांच्या विश्वास व पाठबळावर सध्याचे वरिष्ठ अधिकारी काम करीत असतील तर खडसेंनी त्यांच्याही पुढे आगतिक होवून, आता तुम्ही जनतेला लेखी आश्वासने देणार का ? असे विचारावे हेच मनाला पटत नाही.
खडसेंची भाजपत अवस्थादिवसेंदिवस बिकट होत आहे. स्वपक्षातील सहकारी आता टोमणे मारत असतात, म्हणतात जास्त बडबडणाऱ्यांचे कसे हाल होतात, पाहात आहात ना ? पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अशी किती तरी वक्तव्ये केली आहेत. चंद्रकांत पाटील यांनी दोनदा नारायण राणेंच्या मंत्रीपदासाठी तारखा जाहीर केल्या होत्या. पण खडसेंचा मंत्रीपदाचा विषय काढला की ते म्हणाले होते, मोदी व शहा त्यांचा निर्णय घेतील. दुसरीकडे जेव्हा खडसे निर्वाणीची भाषा बोलू लागले तेव्हाच गिरीश महाजनही बोलू लागले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते आमच्या संपर्कात आहेत.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सडविण्याची भाषा कधीतरी सुरेशदादा जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वापरली होती. दुर्दैवाने मध्यंतरी साडेचार वर्षे जैन यांना तुरुंगात काढावी लागली. जैन यांना अशा प्रकारे तुरुंगात सडविण्यासाठी पवार, खडसे एकत्र होते असा तर्क काही जण लावतात. तुरुंगात सडविण्याचा हा एक प्रकार असला तरी सत्ता असताना ही एखाद्याला ठरवून बाहेर बसविणे म्हणजेच सडविणे सुध्दा असते हेही खडसेंच्या लक्षात येत असावे.
एखाद्या गल्लीत मुले एकत्र येवून लपाछपी खेळत असताना एखाद्या वांड मुलास सर्व जण बाजूला बसवतात. त्याला खेळू देत नाहीत. गल्लीचे इतर लोक हे पाहून समजून घेतात. पण मुलांच्या खेळात कोणीही बोलत नाहीत, तसे काही खडसेंचे सध्या होते आहे. खडसेंना असे बाजूल बसविण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचाच इंटरेस्ट असावा. खडसेंवर जे जे आरोप झाले, त्यावर खुलासे हे फडणविसांनीच केले. भोसरी येथील एमआयडीसी भूखंड खरेदी प्रकरणात न्या. झोटींग समिती सुध्दा फडणविसांनी नेमली. नंतर या समितीच्या अहवालास अर्थ नाही असे फडणवीसच म्हणाले. फडणविस विधी मंडळात खडसेंना क्लिन चीट देतात पण पुन्हा मंत्रीपद देत नाहीत, या मागील अन्वयार्थ जनतेला कळत नाही का ?
अशा प्रकारे सर्वच बाजुंनी जर खडसेंची कोंडी भाजपत होत असेल तर कशाला स्वाभिमान बाजुला सारुन खडसेंनी सहन करीत राहावे ? खडसे हे खान्देशचे स्वयंभू व अनभिषिक्त नेते आहेत. त्यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवून भाजपतून बाहेर पडायलाच हवे. किती दिवस भाजपच्या पालथ्या घड्यावर खडसे पाणी टाकणार ? आतापर्यंतच्या वागणुकीचा मतितार्थ हाच आहे की, खडसेंनी भाजप सोडायचे धाडस दाखवावे. काँग्रेस व राष्ट्रवादीची सोबत करण्यापेक्षा शिवसेनेत प्रवेश करावा. ठाकरे हे खडसेंना नक्कीच पुढे घेवून जातील. जळगाव जिल्ह्यातही भाजपनंतर क्रमांक दोनचा पक्ष शिवसेनाच आहे. खडसे स्वतःच शिवसेनेत आल्यावर सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा खडसेंवरील रोषही संपुष्टात येईल.
म्हणूनच खडसेंना आग्रहाची विनंती आहे की, तुम्हाला इतर कोणी पक्षाबाहेर ढकलत असेलतर तुम्ही स्वतःच पक्षाबाहेर पडा. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मग्रूर भाजपला धडा शिकवायची हिच संधी खडसेंना आता लाभणार आहे !!
(टीप - ब्लॉग व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी असेही सांगितले की, खडसेंनी आता केंद्रात जावे. रक्षाताईंच्या ऐवजी खडसे जर खासदार झाले तर ते तेथे मोदींसोबत मंत्री होतील. महाराष्ट्रासह इतर राज्यात त्यांचे समर्थक तयार होतील. रक्षाताई आमदार झाल्याच तर त्या सुध्दा मंत्री होवू शकतील.

अतीषय मार्मीक विवेचन...
ReplyDeleteमर्मभेदी
ReplyDeleteमर्मभेदी
ReplyDelete