Saturday, January 27, 2018

नाथाभाऊ, भाजपतच थांबा !

सोशल मीडियातील एक अनोखा सर्व्हे ...
समर्थक आणि हितचिंतकांचा सल्ला ...
जायचेच असेल तर काँग्रेस पहिली पसंती
दुसरा पर्याय रा. काँ. आणि शिवसेना
१० टक्के वाचक म्हणतात, आता थांबा !

भारतीय जनता पक्षातून मला बाहेर ढकलले जाते आहे, अशी खंत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी रावेर येथे एका कार्यक्रमात व्यक्त केली. त्यानंतर खडसे यांचे इतर पक्षांशी असलेले पक्षातीत संबंध लक्षात घेवून, नाथाभाऊ आता भाजप खरेच सोडा ! असा लेख सोशल मीडियातून व्हायरल केला. अवघ्या दोन दिवसात सुमारे ६ हजारांवर वाचकांनी तो वाचला. खडसेंच्या संभाव्य राजकिय हालचालींची लोकांना, त्यांचे समर्थक, हितचिंतक व हितशत्रूंना किती उत्सुकता आहे ? हे यावरुन लक्षात आले.

खडसेंविषयी असलेली सहानुभूती आणि द्वेषही जाणून घेण्यासाठी पून्हा सोशल मीडियात एक मत नोंदवा चाचणी घेतली. फेसबुकवर वाचकांना आवाहन केले की, जर नाथाभाऊंनी भाजप सोडलाच तर त्यांनी कोणत्या पक्षात जावे ? यासाठी काँग्रेस, रा. काँ., शिवसेना,  आरपीआय व मनसे हे पर्याय दिले. जवळपास २४ तासांत २०० वर वाचकांनी मत नोंदवले. मत नोंदवा म्हणून व्हाट्स ॲप गृपमधूनही आवाहन केले होते. या आवाहनाचा निष्कर्ष सायंकाळी काढला.

२०० टक्के पैकी जवळपास ५० टक्के समर्थक व हितचिंतक म्हणतात, भाऊ पक्ष सोडू नका. भाजपतच न्याय मिळेल. आज पक्षात बोलावणाऱ्या पुढाऱ्यांनी पूर्वी अवमान केलाच आहे. भाजपमध्ये नक्कीच पूर्ववत मानसन्मान मिळेल. मात्र १६ टक्के कट्टर समर्थक म्हणतात नाथाभाऊ हाच आमचा पक्ष. ते जातील तेथे आम्ही जावू. याच प्रश्नाला जोडून १० टक्के समर्थक असेही म्हणतात की, नाथाभाऊंनी स्वतंत्र पक्ष काढावा. खान्देशचा विकास हा मुद्दा घ्यावा. काही तर असे म्हणतात की, स्वतंत्रपणे आमदार निवडून आणून राजकीय तडजोड करुन मुख्यमंत्रीपद मिळवावे.

नाथाभाऊंवर यापूर्वी काँग्रेसने गजमल पाटील कथित लाच प्रकरणात, रा. काँ. ने तोडीपानी करणारे नेता व घराणेशाहीचा आरोप केले आहेत. शिवसेना तर नाथाभाऊंना युती तोडणारा शत्रू समजते. या पार्श्वभूमीचा विचार करुन २७ टक्के वाचक म्हणतात काँग्रेसमध्ये जा. तेथे मुख्यमंत्रीपदाची जागा रिकामी आहे. २३ टक्के वाचक म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जा. तेथे अजितदादांशी जुळवून घेता येईल. शिवसेनेत जाण्याबाबत मात्र समर्थक सावध आहेत. केवळ १६ टक्के  वाचक शिवसेनेला पसंती देतात.

खरे तर नाथाभाऊंसाठी इतर पक्षात प्रवेशाचा विचार करायला नको. तरी पण ५ टक्के वाचक आरपीआय व ५ टक्के वाचक मनसेचा पर्याय सूचवतात. बहुतांश जणांना नाथाभाऊंची खंत ही दबावतंत्राचा वापर वाटते. असे बोलून नाथाभाऊ लक्ष वेधून घेत असून मी पक्ष सोडू शकतो असे भासवत असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियातील हा मत आजमवण्याचा अनोखा प्रयोग केवळ आणि केवळ नाथाभाऊंच्या विषयी जनमत आजमावण्याचा प्रयत्न आहे. यात नोंदवलेले प्रत्येक मत हे वाचता येणारे व मोजता येणारे आहे. ते खालील लिंकवर उपलब्ध आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10213924809628631&id=1661031896

No comments:

Post a Comment