Thursday, July 29, 2010
विक्रमादित्य सचिन
आपण मास्टरब्लास्टर का आहोत हे सचिनने बुधवारी आणि गुरूवारी श्रीलंकेविरूद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात खेळतांना दाखवून दिले. सचिन केवळ स्वार्थासाठी खेळतो अशी टीका त्याच्यावर होत होती. बुधवारी त्याने भारतीय संघ संकटात असतांना टिच्चून फलंदाजी केली आणि कारकिर्दीतले 48 वे शतक ठोकले. तो खेळपट्टीवर टिकला की विक्रम सहज होत असतो याचा प्रत्यय देखील आला. केवळ शतक ठोकण्याच्या इराद्याने तो खेळतो म्हणणे अनेकदा चुकीचे ठरले आहे. आदल्या दिवसाप्रमाणेच सचिनने गुरूवारी देखील टिच्चून फलंदाजी करत पाचवे द्विशतक झळकावले. त्याचे हे द्विशतक भारतीय फलंदाजांमध्ये विक्रमी ठरले. द्विशतकांच्या रांगेत श्रीलंकेचा संगकारा सात द्विशतके झळकावून अग्रस्थानी आहे. सचिन आता त्याच्यामागे दोन पावलांवर आहे. यापूर्वी मास्टरब्लास्टरनने कारकिर्दीत 1999 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध अहमदाबाद येथे पहिले द्विशतक झळकावले होते. त्यावेळी त्याने 217 धावा केल्या होत्या. यानंतर नागमूरमध्येही त्याने झिम्बाब्वेविरूद्ध अशीच कामगिरी केली होती. 2004 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्यांच्याच मायदेशात द्विशतक झळकावून आपण खंडाबाहेर संयमित फलंदाजी करु शकतो हे दर्शवून दिले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके असे एक ना अनेक विक्रम या मास्टरब्लास्टरच्या नावावर आहेत. अजून किती विक्रम याच्या नावावर लागतील हे भविष्यात जरी गूढ राहणारे असले तरी मास्टरब्लास्टर लवकरच कसोटी आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये शतकांचे शर्तक पूर्ण करेल हे सांगण्यास कोणत्या भविष्यवेत्याची गरज पडणार नाही. श्रीलंकेविरूद्धचा आणखी एक कसोटी सामना आणि ऑस्ट्रेलियन संघ भारत दौर्यावर दोन कसोटी सामने खेळणार असतांना सचिन या दोन मालिकांच्या दरम्यान नक्कीच हा विक्रम करेल. मास्टरब्लास्टरने आतापर्यंत कसोटीत 48 शतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 46 शतके ठोकली आहेत. या दोन क्रिकेटच्या प्रारूपाची गोळाबेरीज केली होती. ती संख्या 94 वर जाते. म्हणजेच क्रिकेटच्या दोन प्रारूप मिळून सचिन शतकांचे शतकही साजरे करेल याविषयी कोणाच्याही मनात शंका नसावी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment