Saturday, January 27, 2018
Friday, January 26, 2018
जलक्रांती घडविणारे भोणे ...
पाणी अडवा पाणी जिरवा या मूळ संकल्पनेवर आधारित अनेक सरकारी योजना आल्या. गाव आणि शेत शिवारापर्यंत पोहचल्या. काहींचा गवगवा झाला. काही नावाला सुरु राहिल्या. बहुतेक आल्या कधी आणि गेल्या कधी समजले नाही. सरकारी खर्चही भरपूर होवून फारसा परिणाम काही साध्य झाला नाही. मागील वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेचा बोलबाला आहे. काही गावांमध्ये काम होते आहेत. काही ठिकाणी देखावा सुध्दा आहे.
Thursday, January 25, 2018
नाथाभाऊ, आता भाजप सोडाच!
संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा चेहरा मोहरा म्हणून स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या नंतर एकनाथराव खडसे आणि नितीन गडकरी यांच्या चेहऱ्यांकडे पाहिले जात होते. महाजन, मुंडे दोघेही अकाली गेले. त्यांच्या नंतर राज्यातील सत्तास्थाने गडकरी, खडसे भोवती काही काळ होती. यापूर्वी केंद्रात भाजप आघाडी आणि राज्यात युतीची सत्ता असताना गडकरींना दोन्ही ठिकाणी मंत्रीपद मिळाले होते. खडसेही पहिल्यावेळी जरा उशिरानेच मंत्री झाले होते. आता केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप आघाडीचे सरकार असून गडकरी मंत्रीपद उपभोगत आहेत. राज्यातही भाजप नेतृत्वातील युतीचे सरकार असून खडसेंना मात्र सत्तेच्या बाहेर सक्तीने बसवले आहे.
Friday, January 27, 2017
समांतर रस्त्यासाठी गांधी होवू या ...
आयुष्याच्या अर्ध शतकात महात्मा गांधी जाणून
बुजून कधी स्वीकारावा लागला नाही. पाठ्यपुस्तकातला गांधी कधी तरी वाचला.
जयंती-पुण्यतिथीला कोणाच्या तरी तोंडून ऐकला. टपाल तिकीटाच्या रुपात गांधी
चिटकवला. कमवायला लागल्यावर गांधी खिशातही बाळगला. पण, गांधी मार्गावर चालण्याची वेळ कधी आली
नाही. जळगावकरांना गांधीमार्च मध्ये चालण्याची संधी मिळते आहे. जळगाव फर्स्ट या
बिगर राजकीय संघटनने दि. 30 जानेवारीस समांतर रस्त्यांच्या मागणीकडे सरकारी यंत्रणांचे लक्ष
वेधण्यासाठी गांधीमार्च आयोजित केला आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील
वाहतूक कोंडी आणि अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येक
जळगावकरने या गांधीमार्चमध्ये चालायला हवे.
Saturday, August 8, 2015
नदीम आणि अदनानची इनसाइडर स्टोरी
Tuesday, February 3, 2015
होम चिकित्सा केंद्र - तपोवन
पारोळा- अमळनेर रस्त्यावर पारोळ्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर तपोवन हे होम चिकित्सा केंद्र आहे. तेथे जैविक ऊर्जा, वैद्यकशास्त्र, कृषिशास्त्र आणि हवामानशास्त्र याचा वैदीक पद्धतीने अभ्यास व प्रचार- प्रसार केला जातो. अग्निहोत्राच्या माध्यमातून या शास्त्रांचा सुरेख संगम घालून निसर्गदायी झालेली मानवी जीवनशैली येथे अनुभवता येते. त्याच्या अनोखा प्रवास...
देशदूत शब्दगंधमधील मूळ लेख
http://deshdoot.com/enewspaper.php?region=Jalgaon&date=1359829800&id=50325
यू ट्यूब वरील क्लिप
https://www.youtube.com/watch?v=bI-AcBocmHA&list=UUdKzXMOjfaFRS1G2C189voA&index=1
तपोवन हे फार्म हाऊस नाही. सहलीचे पर्यटन स्थळ नाही. पार्टी करण्याची जागा मुळीच नाही. तपोवन हे निसर्गाशी नाते जोडून निसर्गदायी मानवी जीवनशैली तयार करणारे केंद्र आहे. वेद- पुराणांचा अभ्यास करून त्यातील शास्त्र शुद्ध संकल्पनांचा आजही पाठपुरावा करीत त्याचे महत्व पटवून देणारी जीवनशाळा आहे.
होम- हवनचे महत्व ते काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. होम केल्याने पाऊस पडतो का? कोणाचे आरोग्य सुधारते का? होमातील आहुतीमुळे निर्माण होणार्या ज्वाला, भस्म व धुराशी मानवाच्या जीवनशैलीचा काय संबंध? असे प्रश्न विज्ञानवादी काही चिकित्सक विचारतात. या प्रश्नांच्या मागे बर्याचवेळा कुचेष्टा असते. मात्र, विज्ञानाच्या कसोटीवर जिज्ञासू म्हणून प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तपोवनमध्ये एकदा गेलेच पाहिजे.
पारोळ्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर तपोवन आहे. धुळे येथील कै. वसंतराव परांजपे हे अक्कलकोटचे सदगुरू गजानन महाराज यांच्या संपर्कात होते. 1985 च्या सुमारास गजानन महाराजांचे धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नापिंप्री (ता. पारोळा) येथे आगमन झाले. तेथे गजानन महाराजांनी त्यांना परिसरात अग्निहोत्राचा प्रचार- प्रसार करण्याचा संदेश दिला. महाराजांचा आदेश मानून परांजपे यांनी अग्निहोत्राच्या प्रचार- प्रसाराचे काम देशभर सुरू केले. महाराष्ट्रातील एक केंद्र रत्नापिंप्री येथेही सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्रामस्थांच्या व काही सहकार्यांच्या मार्फत त्यांनी तपोवनची रचना 1995 मध्ये केली. प्रत्यक्ष 1997 पासून केंद्राचे काम सुरू झाले. आज या केंद्राला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. सुमारे एक तपाच्या वाटचालीत तपोवनची ओळख संपूर्ण जगात होम थेरपी सेंटर म्हणून झाली आहे. या केंद्राचे व्यवस्थापन कै. परांजपे यांचे पूत्र श्री. अभय परांजपे (रा. धुळे) पाहतात. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील ब्रुस जॉन्सन आणि त्यांच्या पत्नी ऍन गॉडफ्रे यांचाही या केंद्राच्या व्यवस्थापनात सहभाग राहीला आहे. या दोघांनी अग्निहोत्र प्रचार- प्रसारासाठी आपले आयुष्यच समर्पित केले आहे.
तपोवनची रचना निसर्गशेतीचे सूत्र घेवून केली गेली. त्यामुळे येथील माळरानाच्या जमिनीवर निसर्ग फुलविण्याचे आव्हान वेदशास्त्राला आणि त्याच्या अनुयायांच्या समोर होते. रत्नापिंप्रीच्या काही ग्रामस्थांना हा प्रकल्प वेडेपणाचा वाटत होता. काही जण सोबत होते तर काही विरोधात होते. काहीशा खडकाळ, रुक्ष आणि निकस वाटणार्या जमिनीवर काय होणार? याची उत्सुकता सार्यांना होती. आजचे तपोवन पाहिले म्हणजे काळाच्या प्रवाहात किती अनंत अडचणींचा सामना करावा लागला असेल याची कल्पना येते.
आज या खडकाळ जमिनीवर निसर्गशेती फुलली आहे. तालुक्यातील इतर ठिकाणापेक्षा या भागात पर्जन्याचे प्रमाण वाढले आहे. फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला, रोपवाटीका, वनौषधी, धान्यपिके, हळद असे अनेक शेती उत्पादन येथे पाहता येते. या सार्याची उगवण आणि वाढ काढणी ही निसर्गशेती किंवा सेंद्रीय शेती पद्धतीनुसार केली जाते. ब्रुस आणि ऍन यांनी या सार्या स्वप्नवत रचनेच्या वास्तवपूर्तीसाठी आयुष्याची 15-16 वर्षे दिली.
शेतीसाठी पाणी हवे. जमिन खडकाळ असल्यामुळे पाण्याची अडचण होतीच. भविष्यातील आव्हान लक्षात घेवून तपोवन परिसरात पर्जन्य संधारणाचा कार्यक्रमही राबविण्यात आला. शेतातून वाहणार्या नाल्यातील पाण्याचे नियोजन केले गेले. कोरड्या विहारी भरल्या. नाल्यात जास्तकाळ पाणी टीकून राहू लागले. शेतीला पाणी मिळाले. निसर्गशेतीच्या संकल्पनेतील प्रयोगांनी हळूहळू परिसर बहरत गेला.
तपोवनचा मुख्य हेतू अग्निहोत्र शेती पद्धतीचा प्रचार- प्रसार हाच होता. त्यामुळे 25 मार्च 2001 पासून येथे अखंड महामृत्यूंजय मंत्र जागरचा प्रयोग सुरू झाला. तेथे सूर्यादय आणि सुर्यास्ताच्या समयपासून अखंड अग्रनिहोत्र सुरू असते.
निसर्गशेतीच्या सोबत मानवी जीवनशेलीही निसर्गदायी कशी होईल? याचाही विचार करण्यात आला. त्यामुळे होम- हवन तंत्र शिकण्यासोबतच मातीच्या घरांची निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय पद्धतीने बी- बियाणे निर्मिती, रोपांची निर्मिती हेही प्रयोग सुरू झाले. होम हवनसाठी गाईचे तूप लागते म्हणून गोशाळा सुरू झाली. आज गोशाळेत 125 वर गाई असून तेथे दुधासह गावराण तूप व ताकाची मुबलक उपलब्धता आहे. यापैकी कोणत्याही उत्पानाची विक्री मात्र केली जात नाही.
तपोवनातील सेंद्रीयशेती व्यवस्थापन अनुभवताना एक बाब लक्षात येते, ती म्हणजे परिसरात जास्वंदाची खूप झाडे आहेत. विविध रंगी फुले नेहमी ताजी, टवटवीत दिसतात. यामागील कारण विचारले असता सांगण्यात येते की, जास्वंदावर मावा, बुरशी आदी रोगांचा प्रादुर्भाव सहज होतो. त्यामुळे झाड लवकर नष्ट होते. तपोवन परिसरात कोणत्याही रासायनिक किटनाशकांचा किंवा खतांचा वापर होत नसल्यामुळे येथे जास्वंद नैसर्गिक पद्धतीने वाढले असून आजपर्यंत एकही झाड कशामुळेही नष्ट झालेले नाही. हीच बाब तपोवनमधील रोपवाटीकेतील पोरनिर्मितीला लागू होते. तेथील भाजापालाही टवटवीत असतो. मध्यंतरी कोरफड व हळद लागवडीचा प्रयोग ही करण्यात आला.
तपावेनच्या जागेची निवड कशासाठी ?
तपोवनच्या रचनेसाठी सध्याची जागा का निवडली या विषयी सांगण्यात येते की, 1985 च्या सुमारास रत्नापिंप्री येथे मंदिरातील मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सदगुरू गजानन महाराज यांचे रत्नापिंप्रीला आगमन झाले होते. तेव्हा त्यांना येथील तप भूमीविषयी साक्षाःत्कार झाला. त्यांच्या प्रेरणेतून शिवधाम मंदिर आणि तपोवनची निर्मिती करण्यात आली. या भागात प्राचिनकाळी ऋषीमुनींचा वास होता. नेहमी जप- तप, होम- हवन सुरू असायचे. तपोवनमध्ये सध्या कोणतेही खोदकाम केले तर तेथे भस्म आढळून येते. म्हणूनच परांजपे यांनी केंद्राला तपोवन हेच नाव दिले. आज तपोवनमधील निसर्गदायी शेतीची माहिती घेण्यासाठी 50 हून अधिक देशांचे हजारो प्रतिनिधी येवून गेले आहेत. ऑस्टे्रलिया, जर्मनी, अमेरिका, चिली या देशांमध्ये अखंड अग्निहोत्र केंद्र सुरू आहेत. परांजपे यांना 14 भाषा अवगत होत्या. त्यामुळे त्यांनी समाजाला अत्यंत प्रभावीपणे आणि सप्रयोग अग्निहोत्राची गरज समजावून दिली. सन 2004 मध्ये तपोवनमध्ये बार्शीच्या श्रीयोगीदान वेद, विज्ञान आश्रमातर्फे पर्जन्य जाग झाला. त्यानंतरच्या अनुभवातून परिसरात दरवर्षी सरासरी पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
काय आहे अग्निहोत्र?
तपोवनमध्ये अखंड अग्निहोत्र सुरू असते. कर्मकांडाचा भाग समजली जाणारी ही पद्धत वैदिक विधीतील विज्ञान प्रक्रिया आहे. अग्निहोत्र म्हणजे ठिक समयी पवित्र पद्धतीने प्रज्वलित केलेल्या अग्नित आहुती देणे. अग्निहोत्र हे उलट्या पिरामीड आकाराच्या ताम्र पात्रात केले जाते. यात तांदूळ (अक्षत), गायीचे तूप, गाईच्या शेणापासून केलेल्या गोवर्या याची महा मृत्यूंजय मंत्रोच्चारात आहुती दिली जाते. यासाठी सूर्यादय व सुर्यास्ताची अचूक वेळ साधवी लागते.
अग्निहोत्र सुरू असताना ताम्रपात्राच्या भोवती प्रंचड चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. ही पवित्र ऊर्जा परिसरातील विघातक ऊर्जा (रेडीएशनचा प्रभाव असलेली किरणे) निष्क्रिय करते. हवनासाठी वापरलेल्या गाईचे तूप, गोवर्या व अक्षत यामुळे औषधी धूर निर्माण होतो. तो मानवी आरोग्यासाठी हितकारक असतो. त्यामुळे श्वसन विकार दूर होतात.
अग्निहोत्रामुळे मेंदुतील पेशी प्रसन्न होवून मज्जासंस्था कार्यप्रवण होते. रक्त शुद्धी होते. त्वचा चैतन्यदायी होते. फुफ्फूस, हृदय, रक्तप्रवाह यावर अप्रत्यक्ष परिणाम होतो. असाच रिणाम परिसरातील वृक्ष, वेली, झुडुपांवरही होतो.
अग्निहोत्र करताना मंत्र कसे म्हणावेत?
अग्निहोत्र दिवसातून दोन वेळा करतात. ते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अचूक वेळेवर करावे. यासाठी तपोवनमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे अक्षांश व रेखांशनुसार सूर्योदय व सूर्यास्ताचे वेळापत्रक उपलब्ध आहे. अग्निहोत्र करताना पुढील मंत्र म्हणावेत-
सूर्योदयाच्यावेळी-
सूर्याय स्वाहा
(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत पहिला भाग अग्नित टाकावा)
सूर्याय इदम् न मम
प्रजापतये स्वाहा
(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत दुसरा भाग अग्नित टाकावा)
प्रजापतये इदम् न मम
सूर्यास्ताच्यावेळी-
अग्नये स्वाहा
(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत पहिला भाग अग्नित टाकावा)
अग्नये इदम् न मम
प्रजापतये स्वाहा
(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत दुसरा भाग अग्नित टाकावा)
प्रजापतये इदम् न मम
तपोवनातील गोधडी शिवण केंद्र
ब्रुस आणि ऍन यांनी तपोवनात काम करीत असताना परिसरातील महिलांना गोधडी शिवण्याचा एक अनोखा रोजगार दिला. मॅगसेस पुरस्कार विजेत्या व अलिकडे पद्मश्री मिळालेल्या बहादरपूरच्या खानदेशकन्या निलीमा मिश्रा यांच्या बचत गटांच्या माध्यमातून ही गोधडी देशाच्या बाहेर सातासमुद्रापार पोहचली.
ऍन या फॅशन डिझाईनर आहेत. त्यांनी कारखान्यातील चिंधी कापडाचा उपयोग करुन गोधडी, पर्स आणि महिलांचे कपडे शिवण्याचे काम सुरू केले. महिलांना शिवणकाम कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. शिवणकामाचे डिझाईन दिले जाते. त्याप्रमाणे महिला शिवणकाम करतात. आपल्याकडे ग्रामीण भागात जुन्या कपड्यांची गोधडी शिवतात. या केंद्रीतील गोधडी नव्या कपड्यांची असते. जुन्या गोधडीत उब मिळावी म्हणून पुरण (जुन्या कापडाची भर असते). तो प्रकार या गोधडीत नसतो. विविध कापडांचे तुकडे वापरून तयार होणारी गोधडी लक्ष वेधून घेते. परदेशात स्थायिक भारतीय ती खरेदी करतात. त्वचेशी संबंधीत विकार असलेले ती घेतात. काही दानशूर मंडळी या गोधडींचे गरजूना वाटप करतात. सातासमुद्रापार गेलेल्या गोधडीची कहाणी वेगळीच आहे.
तपोवनसाठी संपर्क
तपोवनचे व्यवस्थापक म्हणून सध्या संजय पाटील (मो. क्र. 9923552154) पाहतात. केंद्राची शेत जमिन 22 एकर आहे. या केंद्राचे व्यवस्थापन फाईव्ह फोल्ड पाथ मिशन या ट्रस्टच्या माध्यमातून केले जाते. या ट्रस्टसाठी कोणतेही सरकारी अनुदान मिळत नाही. येथे माहिती घेण्यासाठी येणारे साधक देणगी स्वरुपात मदत करतात.
इंटरनेट वापरणा-यांचे ""123456'' वर प्रेम
इंटरनेट'च्या मायाजालमध्ये प्रवेश व त्याच्या वापरासाठी पासवर्ड (सांकेतांक) हा महत्त्वाचा घटक. त्याच्याशिवाय संगणकीय किंवा नेट यंत्रणा हाताळता येत नाही. जेवढी माणसं त्यापेक्षा जास्त त्यांचे पासवर्ड. इंटरनेट वापरणारे कोट्यवधी ग्राहक आणि त्यांचे कोट्यवधी सांकेतांक. मात्र, यापैकी लाखो लोकांचे सांकेतांक हे सारखेच तयार होत असल्याचे लक्षात येत आहे. सोपा आणि लक्षात राहणारा "पासवर्ड' हवा या हेतूने तयार केले जाणारे अंक- अक्षर समुह नेहमीच्या वापरातील असल्याचे जगभर केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. जगभरात इंटरनेट वापरणारे सर्वाधिक ग्राहक "123456' या अंक समुहाचा पासवर्ड म्हणून वापर करतात असे लक्षात आले आहे. त्याची ही दखल...
इंटरनेटचा वापर व्यक्तीगत, संस्था किंवा समुह पातळीवर झपाट्याने वाढतो आहे. जगभराची लोकसंख्या सन 2008 अखेरीस 610 कोटी 29 हजार एवढी गृहीत धरल्यास त्यापैकी158 कोटी 15 लाख 71 हजार लोक इंटरनेटचा वापर करीत असल्याचे सर्वेक्षणानोंदले गेले आहे. इंटरनेट वर्ल्ड स्टॅट डॉट कॉमतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील 41.1 टक्के इंटरनेट ग्राहक हे आशिया खंडातील आणि उर्वरित 58.9 टक्के हे उर्वरित खंडातील आहेत. भारताचा समावेश आशिया खंडात असून त्यात इंटरनेटचा सार्वधिक वापर असणाऱ्या टॉपच्या दहा देशांमध्ये प्रथम क्रमांकावर चीन (लोकसंख्येच्या 22 टक्के वापर), द्वितीय क्रमांकावर जपान (73.8 टक्के वापर) आणि तृतिय क्रमांकावर भारत (अवघा 7.1 टक्के वापर) यांचा समावेश आहे. त्याखालोखाल इतर देश येतात. हॉंगकॉंग, साऊथ कोरिया, मलेशिया, सिंगापूर, तैवान, आदी ठिकाणचे इंटनेट वापराची टक्कवारी 69 ते 70 टक्के आहे. ही सगळी आकडेवारी लक्षात घेता इंटरनेट हे कशा प्रकारे वाढणारे मायाजाल आहे ? त्याची कल्पना येते.
इंटरनेट वापरासाठी मुलभूत गरज अत्याधुनिक प्रणालीचा संगणक आणि त्या सोबत ब्रॉडबॅंण्ड कनेक्शन ही असते. त्यानंतर इंटरनेटवरील मायाजालात प्रवेशासाठी कुठल्यातरी सर्च इंजिनचे (गुगल, याहू, रेडिफ या सारख्या) सभासद व्हावेलागते. इंटरनेट कायम हाताळणीसाठी (साईन इन करण्यासाठी) वापरणाऱ्याचे नाव (यूजर्सनेम)व सांकेतांकची (पासवर्ड) रचना करावी लागते. अशा प्रकारची नोंदणी करणे म्हणजेच इंटरनेटवरील मुसाफिरीस प्रारंभ करमे होय. इंटरनेट वापरणाऱ्यांची जगभरातील आकडेवारी जेव्हा आपण पाहतो तेव्हा वाटते की, संबंधितांचे सांकेतांक किता विभिन्न रचनेचे राहत असतील ? तसे असतेही. सांकेतांक तयार करण्यासाठी 1 ते 0 अंकांचा आणि ए टू झेड या अक्षरांचा तसेच की बोर्डवरील काही चिन्हांचाही वापर करता येतो. त्यामुळे सांकेतांक तयार करण्याच्या शक्यशक्यता वाढतात. परंतु, सांकेतांक सोपा असावा सहज लक्षात असणारा असावा या हेतूने केलेली अक्षरांची रचना सर्वसमान्य होवू पाहत आहे. त्यातूनच संगणकीय सेवा- सुविधेत गैरप्रकार करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींची संख्या वाढते आहे.
"व्हाट्समायपास डॉट कॉम' या संस्थेने पासवर्ड रचनेच्या संदर्भात 34 हजार इंटरनेट ग्राहकांच्या केलेल्या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. त्यातील पहिला निष्कर्ष असा की, "123456' हा शब्द समुह सांकेतांक म्हणून वापरणाऱ्यांची जगभरात सर्वाधिक संख्या आहे. या संस्थेने जगभरातील सांकेतांक नोंदणीचा अभ्यास करुन 500 सांकेतांकांची यादी तयार केली आहे. जगभरात कोणत्याही नव्या 50 ग्राहकांचा गट जेव्हा इंटनेटचा वापर सुरू करतो, त्यापैकी 20 ग्राहक या 500 सांकेतांकमधील अक्षरांची रचना वापरतात, असा निष्कर्ष आहे. यात 123456 ही रचना प्रथम क्रमांकवर, पीएएसएसडब्लूओआरडी (पासवर्ड) दुसऱ्या क्रमांकवर, 12345678 ही रचना तिसऱ्या क्रमांकवर, 1234 ही रचना चौथ्या क्रमांकवर, पीयूएसएसवाय ही रचना पाचव्या क्रमांकवर आणि पुन्हा 12345 ही अक्षर समुह रचना सहाव्या क्रमांकवर आहे.
या शिवाय एनसीसी1701 (स्टारशिप जहाजाचा क्रमांक), टीएचएक्स 1138 (जॉर्ज लुकासचा पहिल्या चित्रपटाचे नाव), क्यूएझेडडब्लूएसएक्स (संगणकावरील की बोर्डची रचना), 666666 (सिक्स सिक्सेस), 7777777 (सेव्हन सेव्हन्स) या अक्षर समुहासह बॅटमन, बॉण्ड007, कोकाकोला, पासवर्ड1, एबीसी123, मायस्पेस1, ब्लींक182 या शब्द समुहांचाही वापर मोठ्या प्रमाणात सांकेतांक म्हणून होताना दिसतो.
हे सर्वेक्षण करताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे, हौसे खातर इंटरनेटवर खाते सुरू करणारी अनेक मंडळीनंतर यूजर्सनेम आणि पासवर्डही विसरतात. सुमारे 28हजार ग्राहकांचे पासवर्ड विस्मृतीत गेल्याचे दिसून आले. यातील 16 टक्के लोकांनी त्याचे स्वतःचे नाव (फर्स्टनेम), 14 टक्के लोकांनी की बोर्डवरील अक्षरांचा समुह सांकेतांक म्हणून वापरला होता. याशिवाय लक्षात राहण्यासाठी सोपे म्हणून टीव्हीवर सादर होणाऱ्या लहानमुलांच्या कार्यक्रमांची नावेही काहींनी पासवर्ड म्हणून दिलेली होती. त्यात पोकमॉन, मॅट्रीक्स, आयर्नमॅन या शब्दांचा समुह होता.
इंटरनेटवर कोणत्याही सर्च इंजिनवर खाते सुरू करताना द्यावा लागणारा सांकेतांक किमान आठ अंक- अक्षर किंवा त्या सोबत चिन्हांचा समुह असावा लागतो. खरेतर हा सांकेतांक अर्थपूर्ण शब्द असावा किंवा विशिष्ट क्रमाची अंक लिपी असावी असे नाही. मात्र, बरेच ग्राहक सोपा आणि लक्षात राहणारा शब्दच सांकेतांक म्हणून वापरतात. उपरोक्त सर्वेक्षणाच्या दरम्यान बहुतांश ग्राहकांनी आठपेक्षाही कमी अंक- अक्षरांचा वापर केलला दिसला. केवळ एका ग्राहकाचा सांकेतांक 32 अंक- अक्षरांचा समुह होता. काही जणांनी "आय डोन्ट केअर', "व्हाटेव्हर', "यस' आणि "नो' चाही वापर केल्याचे आढळून आले.
पासवर्डला पर्यायी शब्द "वाचवर्ड' हाही आहे. अलिकडे कार्यालयाच्या अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या संगणकीय प्रणालीत संगणक सुरू करण्यासाठी, संगणकाला लॅन- व्हॅन प्रणालीत जोडण्यासाठी, संगणकातील विशिष्ट प्रोग्राम (उदा. वेबकॅमेरा) सुरू करण्यासाठी, मोबाईल फोनसाठी, केबल टीव्हीच्या प्रसारणासाठी (डिकोडर्स), एटीएमसाठी सांकेतांक लागतात. अनेक ठिकाणी वेगवेगळे सांकेतांक तयार करण्यासाठी निरुत्साह दाखविणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे उपरोक्त सर्व प्रणालीत एकच सर्वमान्य (युनिक) सांकेतांक तयार करण्याचा प्रयत्न केला जातो.
पासवर्ड तयार कण्याची संकल्पनाच मुळात अनेकांच्या लक्षात येत नाही. केवळ अंक, अक्षर किंवा चिन्हांचा वापर म्हणजे सांकेतांक नाही. तो तयार करताना, एखाद्या म्हणीचा, वाक्प्रचाराचा, सुभाषिताचा, कवितेच्या ओळीचाही विचार करायला हवा. यातील शब्दांचे अद्याक्षर किंवा त्यातील विशिष्ट शब्दांचा वापर सांकेतांक म्हणून करता येतो. हे करीत असताना किबोर्डवरील कॅपिटल लेटर्स (इंग्रजी लिपीतील मोठे अक्षर) आणि स्मॉल लेटर्स (लहान अक्षर) यांचाही कल्पकतेने वापर करता येतो. अशा पद्धतीने केलेला सांकेतांक सहजासहजी इतर कोणाला समजू शकत नाही. दरमहा, तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी सांकेतांक बदलावा असेही सांगितले जाते. मात्र, येथे एक लक्षवेधी बाब नमुद करावी लागेल ती हीच की, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सर्वेसर्वा असलेल्या बिल गेट्स यांनी अद्याप एकदाही पासवर्ड बदललेला नाही.
पासवर्डची कल्पना आली कशी ?
रोमन साम्राज्यात सम्राटाच्या निवासाच्या तंबू किंवा प्रासादाच्या भोवती पायदळ आणि घोडदळातील शिपाई रोज गस्त घालायचे. या दोन्ही दलातील रोज नव्या शिपायांची साठी निवड व्हायची. एकाच्यानंतर दुसऱ्या कोणाची गस्तसाठी निवड झाली आहे, हे कळविण्यासाठी लाकडाच्या चिन्हांचा वापर केला जायचा. हे चिन्ह कमांडरच्या उपस्थितीत एकाकडून दुसऱ्याला दिले जायचे. ते दोघांनाच माहित असायचे. तो शब्द होता "वाचवर्ड' नंतर झाला "पासवर्ड'
सदराशी संबंध असेला गोष्ट
कॉर्नेल विद्यापिठातील रॉबर्ट मॉरिस या विद्यार्थाने संगणकासाठी 2 नोव्हेंबर 1988 ला एक प्रोग्राम तयार केला. त्याचे नाव वर्म (किडा) असे होते. हा वर्म संगणकात स्वतःच्या प्रती तयार करुन त्याचा विस्तार करीत असे. त्याने हा प्रोग्राम इंटरनेटवर घुसवला. त्यानंतर वर्मने स्वतःच्या असंख्य प्रती तयार करुन अमेरिकेतील प्रत्येक संगणक क्रॅश केला. नंतर मॉरिस यांने या वर्मला नष्ट कसे करावे याचाही प्रोग्राम पाठविला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाल नाही. या गुन्ह्याबद्दल मॉरिसला नंतर चारवर्षे कैद आणि 10050 डॉलर दंड झाला.

शरददादांची भावकी !
नेत्यांनाही अडचणीत आले. त्यापैकी "दखल' घ्यावी लागेल ती मंत्री डॉ. विजय गावित यांचे बंधु शरद गावित यांनी "बहुजन समाजवादी पक्षा'तर्फे केलेल्या उमेदवारीची. श्री. शरद गावित एवढे फोकसमध्ये नव्हतेच. मात्र, मंत्र्यांचे भाऊ आणि कॉंग्रेस विरोधातील उमेदवारी यामुळे ते चर्चेत आले आहेत...
लोकसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागा वाटपाचा घोळ अखेरच्या टप्प्यापर्यंत सुरू होता. नंदुरबारची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळावी म्हणून रस्सीखेच झाली. रावेरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला नको असतानाही कॉंग्रेसने बहाल केली. त्यामुळे दोन्ही ठीकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते- कार्यकर्त्यांचे संबंध ताणले गेले. अखेर नंदुरबार कॉंग्रेसकडेच राहणार म्हटल्यावर डॉ. गावीत यांचे बंधू श्री. शरद गावीत यांनी "बसपा' तर्फे अर्ज भरला. पक्षाचे प्रदेशस्तरावरील नेते श्री. ईश्वरलाल जैन यांनी श्री. शरद यांना समजावण्याचा प्रयत्न केला. "मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य नाही. त्यामुळे इतरांचे ऐकण्याचा प्रश्न नाही' असे म्हणत श्री. शरद गावित यांनी अर्ज कायम ठेवला. "भाऊ ऐकत नाही. त्यामुळे मी आघाडीचेच काम करेन' असे डॉ. गावित यांनी अखेर जाहीर केले. त्यानंतरही कॉंग्रेस नेत्यांचा आणि डॉ. गावित यांचा "सांधा' या मतदार संघात जुळलेला नाही. श्री. शरद गावित यांच्या रुपाने रावेर आणि जळगाव मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोघा उमेदवारांना ग्रहण लागण्याची शक्यता आहे.
या सगळ्या घटनां- घडामोडीत केंद्रस्थानी राहिलेले श्री. शरद गावित हे कोण आहेत ? त्याचा राजकारणाशी काय संबंध ? मंत्री डॉ. गावित यांच्या कार्यव्यवस्थापनात त्यांचा सहभाग काय ? असे अनेक प्रश्न नंतर खानदेशातील तमाम मतदारांच्या मनांत निर्माण झाले.
मंत्री डॉ. गावित यांचे बंधू अशी ओळख असलेल्या श्री. शरद गावित यांना नंदुरबार जिल्हा पातळीवर "शरददादा' म्हणून ओळखले जाते. डॉ. गावित यांच्या मार्फत राबवायच्या विविध योजनांचे सीत्रसंचालन श्री. शरद गावित हेच करतात.
नटावद (ता. नंदुरबार) येथील कृष्णा गावित या शिक्षकाच्या कुटुंबात शरद यांचा जन्म झाला. गावित परिवार प्रारंभा पासून राजकारणाकडे ओढला गेलेला. त्यांचे काका तुकाराम हुरजी गावित कॉंग्रेसचे खासदार होते. त्यानंतर कृष्णा गावित यांनीही विधानसभेत जाण्याचे प्रयत्न केले. त्यात अपयश आले. मात्र, 1995 च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रस्थापितांना विरोध करीत डॉ. विजय गावित हे अपक्ष म्हणून निवडणून आले. त्याअगोदर ते औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते. तेव्हा पासून आजपर्यंत यशाची एक एक शिडी चढत जाणाऱ्या डॉ. गावित यांची कारकिर्द यशस्वी ठरली आहे.
डॉ. गावित हे प्रथम राज्यमंत्री, नंतर कॅबिनेटमंत्री व त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्या कामाची व्याप्ती नंदुरबार मतदार संघ, जिल्हा व राज्यात वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांना विश्वासू सहकाऱ्याची गरज भासू लागली. मंत्रालयात कक्ष अधिकारी असलेले बंधू राजेंद्र गावित प्रशासकीय पातळीवर त्यांना मदत करू लागले. मंत्री डॉ. गावित यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांची अधिकृत नियुक्ती झाली. त्यांना घरातलाच एक विश्वासू सहकारी मिळाला. मुंबईतील, मंत्रालयातील कामे होऊ लागली. प्रशासनातील अडचणी दूर झाल्या. हे काम करीत असतांनाच राजेंद्र गावित यांनी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या शाखा वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत केले. या सोसायटीच्या सुमारे 36 वर शाखा आहेत.
डॉ. गावित यांचे दुसरे बंधू प्रकाश गावित हे शेती कामाकडे लक्ष देत होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केही जिल्हा परिषद सदस्य झाले. दुसरे बंधू संजय गावित हे नाशिक पोलिस विभागात उपनिरीक्षक आहेत. प्रत्येकाची अशी स्वतंत्र रचना असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संपर्कासाठी अजून सहकारी अपेक्षीत होता. राज्यपरिवहन महामंडळाच्या सेवेत लेखा लिपिक असलेले श्री. शरद यांनी पाच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी केली. त्यावेळी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. या निवडणूकीत त्यांना अपयश आले. त्यांच्या राजीनाम्या समवेत त्यांच्या पत्नीनेही आरोग्य विभागातील सेवेचा राजीनामा दिला. त्यानंतर श्री. शरद यांनी डॉ. गावित यांना सहकार्य करण्यात लक्ष घातले. आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, सामुहीक लाभ, व्यक्तिगत लाभाच्या योजना त्यांनी तळागाळा पर्यंत पोहोचवल्या.
श्री. शरद गावित यांना ही कामे करताना लोकांशी संपर्काची विशिष्ट शैली सापडली. ज्या गावात योजना द्याची आहे तेथे जावून ते चर्चा करतात. योग्य लाभार्थ्यांची निवड करतात. सामुहीक आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांचा जनतेला अधिकाधिक लाभमिळावा यासाठी तळागाळापर्यंत प्रय्तन करतात. लोकांचे अर्ज घेणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे ही कामे त्या त्या गावातील स्थानिक सहकारी कार्यकर्त्यांकडून करुन घेतात. आदिवासी प्रकल्प विभागातून त्याला मंजूरी मिळवतात. त्यानंतर लाभात दिल्या जाणाऱ्या गायी, म्हैस, बकरी गट, विविध यंत्र आदी स्वत: घेऊन जातात आणि संबंधितांपर्यंत त्या पोहोचवतात. या प्रत्येक टप्प्यात त्यांचा स्वत:चा संपर्क प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी असतो. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ डॉ. गावित यांच्यापेक्षा श्री. शरद गावित यांनीच मिळवून दिला, अशी प्रतिमा ग्रामीण भागात तयार झाली आहे. कोणतेही काम करण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला श्री. शरद गावित यांची भेट घ्यावी लागते. त्यांनी हिरवा कंदिल दाखविला तर काम मार्गी लागते. व्यक्तिगत लाभाची योजना असो की सामुहीक कामाचे उद्घाटन असो.
आतातर जिल्हा परिषदेत डॉ. गावित यांच्या पत्नी सौ. कुमुदिनी गावित अध्यक्षा आहेत. त्यामुळे तेथील योजनांचाही लाभ आता श्री. सरद गावित यांच्या मार्फतच लोकांच्यापर्यंत पोटत आहे. सुमारे नऊ वर्षापूर्वी नंदुरबार नगर पालिकेत सत्तेवरून वाद होत होते. दोन गट निर्माण झाले होते. त्यात डॉ. गावित यांचे शालक जगदीश वळवी (चोपडा, जि. जळगाव येथील रहिवासी) हे काही काळ नंदुरबार येथे वास्तव्यास होते. ते पालिकेचे सदस्य झाले. डॉ. गावित यांच्या विरोधी गट असलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांच्या सहकार्याने ते नगराध्यक्षही झाले होते. डॉ. गावित यांचे सासरे रमेश पान्या वळवी हे माजी गृहराज्यमंत्री आहेत.
डॉ. गावित यांचे काम सांभाळणाऱ्या श्री. शरद गावित यांच्या संपत्तीचा तपशिलही लक्षवेधी आहे. त्यांच्याकडे रोकड 48 हजार रुपये, पत्नीकडे रोकड 20 हजार रुपये, मुलगा राजश्रीच्या नावावर 3 आणि जयश्रीच्या नावावर 2 दोन हजार रुपये बॅंकेत आहेत. युनियन बॅंकेत सात लाख 12 हजार, डीडीसीसी बॅंकेच्या धानोरा शाखेत 17 हजार 144, जयकृष्ण पतपेढीत 1 लाख 59 हजार रुपयांच्या टेवी आहेत. नटावद येथे 5.32 हेक्टर, नटावद येथेच 3. 2 हेक्टर, कोठली येते 0.80 हेक्टर, विठ्याफळी येथे 0.80 हेक्टर शेत जमिन आहे. तोरणमाळ येथे 128 चौमी, कोठली येथे 36000 चौफु, नागाई नगर 208 चौमी, विमल प्लाझा दुकानमध्ये 20.84 मीटरचे दुकान आहेय त्यांच्यानावावर युनियन बॅंकचे कर्ज 3 लाख 85 हजार, व्यक्तिगतकर्ज 6 लाख रुपये आहे.
असे आहेत शरद गावित
नाव : शरद कृष्णराव गावित
जन्म तारीख : 11 एप्रिल 1963
पत्ता : नटावद (ता. जि. नंदुरबार)
जात : हिंदू भिल (अनुसूचित जमाती)
शिक्षण : बी.ए. मानसशास्त्र - प्रथम श्रेणी (मार्च 1987)
एम. ए. इतिहास - ऍपियर (मार्च 1989).
विविध पदे - माजी अध्यक्ष - आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी, नटावद (ता. जि. नंदुरबार),
संचालक - आदिवासी युवक क्रिडा विकास मंडळ, नटावद (ता. जि. नंदुरबार), माजी अध्यक्ष - प्रकल्पस्तरीय समिती, नंदुरबार.
दखल
सोमवार
ता. 13 एप्रिल 2007 साठी

Sunday, February 10, 2013
आनंदयात्री ! - अशोकभाऊ जैन
आनंदयात्री! - अशोकभाऊ जैन
अजातशत्रू असलेल्या श्री. अशोकभाऊ जैन हे आज वयाची 50 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्याकडे येणारा कंपनीतला व बाहेरचा माणूस अडचणी घेऊन येतो. त्यावर शक्यतो मार्ग काढून अडचणी सोडविण्याचे काम श्री. अशोकभाऊ करतात, म्हणून ते ठरतात ‘आनंदयात्री’
माझ्या 50 वर्षांच्या आयुष्यात जैन उद्योग समुहात गेली 30 वर्षे वेगवेगळ्या जबाबदार्या पार पाडताना ‘आनंददायी’ अनेक घटना घडल्या. कुटुंब, कंपनी, मित्र मंडळी आणि समाज अशा विविध ठिकाणी माझा सहभाग आहे. त्यामुळे माझ्या मनाला आणि माझ्यामुळे इतरांना आनंद देणारे अनेक प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. म्हणूनच मला माझ्या आयुष्याचा प्रवास आनंददायी वाटतो.
मी महाविद्यालयीन शिक्षण घेताना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात पुढे असायचो. महाविद्यालय व विद्यापीठाच्या क्रीकेट टिममध्ये होतो. कबड्डी व खो-खो या खेळापासून लांब राहिलो. मात्र, लंगडी या खेळात संघाचा कप्तान होतो. आज अखिल भारतीय लंगडी खेळ संघटनेचा मी अध्यक्ष आहे. महाविद्यालयाच्या गॅदरींगसाठी मी पडद्यामागून काम करायचो. खर्च 51 हजार रुपये होता. मी वडिलांकडून 5 हजार व आ. सुरेशदादांकडून 5 हजार असे 10 हजार रुपये आणले. इतरांकडून वर्गणी गोळा केली व धडाक्यात स्नेहसंमेलन केले. बॅडमिंटन, हॉकी व फुटबॉल हेही माझे आवडते खेळ. आर. आर. शाळेत असताना मी स्काऊटचा सार्जन्ट होतो. बहुदा या खेळांमधूनच मला मित्रांची आवड निर्माण झाली व काम टिमवर्क म्हणून करायला शिकलो.
जळगाव शहरात कोणतेही नवे तंत्रज्ञान पहिल्यांदा मी कंपनीत आणले. हॉट लाईन, झेरॉक्स, पेजिंग, फॅक्स, फ्रॅकींग मशिन व आठ मोबाईल आम्हीच पहिल्यांदा आणले.
कंपनीतल्या शंभर कर्मचार्यांना एकाच वेळी शंभर नॅनो देण्याचा उपक्रम यशस्वी केला, याचा मला मनस्वी आनंद आहे.
कंपनीच्या यशात अनेक आनंदाचे प्रसंग आहेत. मात्र, पहिल्यांदा कंपनीची जमीन खरेदी केल्याची आठवण मला आजही आठवते. कंपनीचे काम करताना तेथील बांधकाम आराखडे, सुविधांचे आराखडे व यंत्र-तंत्रासाठी नियोजन करताना मी स्वत: लक्ष घालतो. सध्याच्या सौरऊर्जा साहित्यनिर्मिती प्रकल्पाचे पूर्ण आरेखन माझेच आहे.
कुटुंबातही मला आनंद देणारे अनेक प्रसंग आहेत. आईच्या इच्छेखातर सर्व नातेवाईकांना आमच्या कुलदेवतेच्या गावी नेले तो प्रसंग सर्वांत आनंद देणारा.
माझा मुलगा आत्मन कालच तबल्याची परिक्षा उत्तीर्ण झाला. आमच्या घरात अथांग हा लंडन स्कूल ऑफ कॉमर्समध्ये सिलेक्ट झाला. अमोली सीए परीक्षा उत्तीर्ण झाली. अभेद्यला 82 टक्के गुण मिळाले. आशूली, आरोही यांनीही उत्तम गुण मिळविले आहेत. हे सारे पाहता आमचे पिताश्री मा. भवरलालजी जैन यांच्या तिसर्या पिढीतही त्यांच्यातील अनेक गुणांचा संगम दिसून येत आहे. आम्ही चौघे भाऊ आ. मोठेभाऊंचा वारसा जपून आहोत. तोच वारसा तिसर्या पिढीतही पुढील 100 वर्षे असेल ही बाब आनंद देणारी आहे.
माझ्या आयुष्यात लग्नांनंतर संततीप्राप्तीसाठी 10 वर्षांचा काळ गेला. उपचारासाठी अमेरिका गाठली, पहिल्या इस्पितळात अपेक्षित यश मिळाले नाही. दुसर्या इस्पितळात यश मिळाले. पहिल्या मुलीच्या जन्माची बातमी माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात आनंदाची बातमी ठरली. हा अनुभव लक्षात घेऊनच कंपनीतील इतर अधिकारी, कर्मचार्यांसाठी आम्ही संततीप्राप्तीसाठी वैद्यकीय उपक्रम राबवित आहोत. हा सारा प्रवास आनंदाचा आहे.
सोलर प्रकल्पपूर्तीचा ठेवा
जैन उद्योग समुहाचा सोलर ऊर्जानिर्मिती प्रकल्प एका वर्षात गतीने पूर्ण केला. त्याचा प्रारंभ 11.11.2011 ला करण्यात आला. 12.12.2012 ला 12 वाजून 12 मिनिटांनी त्याचे उद्घाटन आ. मोठेभाऊ यांच्या हस्ते झाले. ही बाबही आनंद देणारी आहे. बालगंधर्व महोत्सव, मा. श्री. अप्पासाहेब पवार यांच्या नावाने पुरस्कार देणे, प्रतिभाताई पाटील यांचे कार्यक्रम, गांधी रिसर्च सेंटरचे उद्घाटन अशा अनेक कार्यक्रमांतून आनंद मिळाला आहे.
http://www.deshdoot.com/enewspaper.php?region=Jalgaon&date=1360434600&id=50977

Monday, January 21, 2013
दरवाजाबाहेरचे मुस्लिम मराठी साहित्य
जळगाव येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करुन करताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले. डाविकडून आयोजक फारुक शेख, डॉ. एस. एन. लाळीकर, स्वागताध्यक्ष गफार मलिक, जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन, कॉ. विलास सोनवणे, मुस्लिम मराठी सहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. इक्बाल शेख मिन्ने, संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आजम आणि इतर.
--------------
मुस्लिम लेखकांचे मराठी साहित्य हा विषय आजही अभिजात मराठीच्या व्यासपिठापासून कोसो दूर आहे. संत, दलित, विद्रोही, मराठी, ब्राह्मण, पुरोगामी, अस्मितादर्श, अंकुर अशा विविध साहित्य संमेलनांच्या स्वतंत्र व्यासपिठाची दखल कुठेना कुठे घेतली जाते. अभिजात साहित्य संमेनाच्या आयोजनात या विषयांशी संबंधित चर्चा, परिसंवाद तरी झडतात. मात्र, मुस्लिम लेखकांच्या मराठी साहित्यासाठी आजही मराठी साहित्य दरबाराच्या दाराबाहेरचीच जागा आहे. हे वास्तव आहे. बहुधा यामागे समाजावरील मुस्लिम द्वेषाचे व दुर्लक्षाचेही संस्कार हेच प्रभावी कारण असावे का ?
जळगावमध्ये शुक्रवार (दि. 18) पासून 10 व्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास उत्साहात प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांच्या या संमेलनात मुस्लिमांच्या शिक्षणासह साहित्य प्रवाहातील विविध विचारधारा उलगडणारे परिसंवाद होत आहेत. संमेलन आयोजकातील काही मित्र जवळच्या संपर्कातील असल्यामुळे आणि त्यांच्या आग्रहाखातर संमेलनाच्या उद्घाटनाला जावून बसलो. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले करणार असल्यामुळे या संमेलनाच्या उघाटन कार्याक्रमात ते काय बोलतात ? हेही ऐकण्याची इच्छा होती. चिपळूण येथे नुकत्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मण माने यांनी श्री. कोतापल्ले यांच्यावर केलेली जाहिर टीका लक्षात घेता, श्री. कोतापल्ले काही उत्तर देतात का ? या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. संमेलनस्थळी बसलेलो असताना मुस्लिम मराठी साहित्याविषयी फारशी माहिती आणि आस्थाही नव्हतीच.
उद्घाटनाच्या सत्राला उपस्थिती कमीच होती. मान्यवर म्हणून आलेल्या 15 - 20 जणांच्या पलिकडे ओळखीचेही फारसे लोक नव्हतेच. स्वागताध्यक्ष श्री. गफार मलिक यांच्या भाषणात गर्दीचा उल्लेख झालाच. ते म्हणाले, मी गर्दी आणू शकलो असतो पण, ती साहित्याशी संबंधित नसती. आम्ही राजकारणी वेगळीच गर्दी गोळा करतो. वातावरण तसे थोडे नरमच होते. वक्ते काय बोलतात तेवढे ऐकूया अशा सैल विचारांनी खुर्चीत सुस्तावलो होतो. मोबाईलच्या नेटवर मित्रांशी चॅटींगही सुरू होते. स्वागत सोहळा लांबल्यामुळे आळसही होताच.
मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी संमेलन आयोजनाची माहिती प्रास्ताविकात देणे सुरू केले. तेव्हा थोडे कान टवकारले. मुस्लिम लेखकांचे मराठी आणि त्याची गरज याचा उहापोह ते करु लागले. तेव्हा विषय समजावून घेण्यासाठी मी सावरलो. मुस्लिमांचा आणि मराठीचा काय संबंध ? हा माझ्याही मनात असलेल्याला प्रश्नाचे उत्तर ते देत होते.
महाराष्ट्रात आलेल्या मुस्लिमांची मातृभाषा दख्खनी. ते महाराष्ट्रात थांबले. संपर्काची स्थनिक भाषा त्यांनी स्वीकारली. नंतरच्या काळात अरबी व्यापार्यांसोबत सुफी संत भारतात आले. त्यांनी तत्कालिन हिंदू धर्मग्रंथ समजावून घेतले. वेद- उपनिषदांचा अभ्यास केला. त्यांची स्वतःची एकेश्वराची विचारधारा त्यांना रुजवायची होती. त्यासोबत मैत्री, सद्भाव, बंधुभाव याचा संदेश द्यायचा होता. सुफी संतांनी एकेश्वराची कल्पना मांडताना इतरही सामाजिक विचारधारांची उकल केली. वेद- उपनिषदांच्या विचाराधारेत आणि त्यात काही प्रमाणात साम्य होते. विचारांच्या या देवाण घेवाणमध्ये सुफी संतांनी मराठी स्वीकारली. ती सुद्धा अभिजात मराठी. तत्कालीन मराठी संत रामदास, तुकाराम, स्वामी रामानंद आदीच्या विचारधारांचेही साम्य सुफी संतांच्या रचनांमध्ये दिसते किंवा त्यांच्या विचारांचा प्रभाव मराठी संताच्या रचनांमध्ये दिसतो. मुस्लिम आणि मराठीचा हा संबंध डॉ. इक्बाल शेख मिन्ने यांनी अत्यंत ओघवत्याशैलीत मांडला. प्रत्येक शब्द समजत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नव्हते.
विषय वळला मुस्लिमांच्या मराठी साहित्य निर्मितीकडे. कै. कवी कुसुमाग्रजांच्या कुठलाशा परिषदेतील वक्तव्याचा संंदर्भ त्यांनी दिला. कै. कुसुमाग्रज म्हणाले होते, महाराष्ट्रातील गुजराथी, मारवाडी, सिंधी, ख्रिश्चन मराठी बोलतात मात्र मुस्लिम मराठी बोलत नाहीत. या वक्तव्याने डॉ. मिन्ने दुखावले. ते स्वतः आणि त्यांचे काही मित्र केवळ मराठी बोलतच नसत तर त्यात कविता, कथा, ललित आदी मराठी साहित्य निर्मिती करीत. त्यामुळे त्यांनी एकत्र येवून कै. कुसुमाग्रजांना पत्र लिहून आपल्या भावना कळविल्या. हे ऐकत असताना मी मोबाईलवरील खेळ बंद केले. आता कान देवून नीटपणे सर्व ऐकू लागले.
बोलण्याच्या ओघात डॉ. मिन्ने यांनी त्यांच्या मुस्लिम मराठी साहित्य लेखकांच्या चळवळीचा 24 वर्षांचा प्रवास अत्यंत थोडक्यात सांगितला. या कालप्रवासात किमान एक हजारावर असे मुस्लिम साहित्यिक या व्यासपिठाशी जोडले गेले.
डॉ. कोतापल्ले यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन का करण्यात येत आहे ? या मागील हेतूही त्यांनी सांगितला. ते म्हणाले, मुस्लिम लेखकांची मराठी साहित्य निर्मिती सातत्याने सुरू आहे. ते साहित्य दर्जेदार आहे. त्यात विषयांचे वैविध्य आहे. साहित्याच्या इतर प्रवाहाप्रमाणेच ते सशक्त आहे. असे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दाराबाहेरच हे साहित्य आहे. आज या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आपण केल्यामुळे किमान अभिजात मराठी साहित्याचा दरवाजा थोडाफार किलकिला होईल...
हे सारे ऐकताना माझ्यातला पत्रकार सजग झाला होता. साहित्याच्या नव्या प्रांताची अनोळखी बाजू समोर येत होती. समजली नव्हती. तशी मानसिक बैठक नव्हती. अर्थातच, परंपरेमुळे. पत्रकार म्हणून मुस्लिमांचा संबंध नेहमी कुराण आणि बुरखा याच्याशी. नेहमी गुन्हेगारी, वाद- विवादांशी किंवा दंगलीशीच असतो हाच समज. कधीकाळी मी सुद्धा सच्चर समितीच्या आयोगावर चर्चा घडवून आणली होती. पण मुस्लिम लेखकांचा मराठी साहित्य प्रांत... हा विषय अछूतच होता...
डॉ. मिन्ने यांच्यानंतर कॉ. विलास सोनवणे बोलले. त्यांच्या भाषणाचा विषय हाही मुस्लिमांचे मराठी साहित्य आणि मुस्लिमांची सद्यस्थिती हाच होता. उद्घाटनसत्र असल्यामुळे त्यांना बोलायला वेळ कमीच होता.
मात्र, अत्यंत मोजक्या शब्दात त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांचा प्रत्येक शब्द धारदार होता. अनुभवाच्या कसोटीवर तासलेला होता. प्रत्येक मुसलनामाला आरोपींच्या पिंजर्यातून बाहेर काढणारा होता. श्री. सोनवणे गेली अनेक वर्षे मुस्लिमांमधील ओबीसींच्या संघटनेची चळवळ बळकट करीत आहे. त्यामुळे त्यांना मुस्लिमांमधील जाती- पोटाजाती, भेदाभेद तोंडपाठ. विविध समित्यांचे संदर्भ देत त्यांनी आजचा सामान्य मुस्लिम कसा पिडीत, मागास आहे याचे वास्तव चित्र उभे केले.
मुस्लिमांना भारतावारील आक्रमणकर्ते म्हणून नेहमी संबोधले जाते. हाच आजच्या समाजाचा माईंडसेट आहे. त्यामुळे मराठीचा आणि मुस्लिमांचा काय संबंध हाच प्रश्न सारेजण विचारतात. तो बदलायला हवा हे स्पष्ट करताना श्री. सोनवणे म्हणाले, बाबरीच्या पतनानंतर देशात मुस्लिमांच्याविषयी संशयाचे वातावरण होते. हिंदुत्त्ववादी प्रभावामुळे हा समाज गप्प होता. विशिष्ट विचारांच्या प्रभावाचे चक्र मुस्लिमांचे चित्र भारतद्वेष्टे असल्याचे बिंबवत होते. या विचारांना त्यांच्याच भाषेत आणि तेवढ्याच संयमाने उत्तर देण्याची गरज होती. म्हणूनच मुस्लिम मराठी साहित्य निर्मितीची चळवळ बळकट होत गेली. गेल्या 24 वर्षांत ती निश्चित वाढली असून सशक्त विचारांनी उभी सुद्धा आहे. अशावेळी इतरांनी त्यामागील कारणमिमांसा समजून घ्यावी.
डॉ. कोतापल्ले यांच्याकडे पाहून श्री. सोनवणे म्हणाले, मराठी साहित्यात अनेक प्रवाह आले. त्या सार्यांना अभिजात मराठीने सामावून घेतले. आदरही केला. मात्र, मुस्लिमांच्या मराठी साहित्याची अवस्था कधीकाळी गावकुसाबाहेर असलेल्या साहित्यापेक्षा वाईट आहे. त्यांच्यासाठी साधा दरवाजाही उघडला जात नाही.
हा संदर्भ अधिक स्पष्ट करताना श्री. सोनवणे म्हणाले, मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 50 लाख देण्याचे मान्य करते. इतर प्रांत, प्रवाहाच्या साहित्य संमेलनांसाठी भरघोस देणग्या दिल्या जातात. पण, मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दमडी देत नाही किंवा आमदार- खासदार निधीतून एक रुपया देत नाहीत. असू देत, गेली 24 वर्षे आमची चळवळ सुरू आहे आणि दहावे संमेलन जळगावमध्ये यशस्विपणे होत आहे.
अर्थात, उद्घाटनपर भाषणात श्री. कोतापल्ले या संदर्भातील काही मुद्यांना स्पर्श करतील अशी अपेक्षा होती. ती चुकीची ठरली. त्यांच्या भाषणातही मुस्लिम मराठी साहित्याला अभिजात मराठी संमेलनाचा दरवाजा बंदच राहिला. श्री. कोतापल्ले यांनी इतिहासाच्या चुकीच्या लेखनाचाच मुद्दा मांडला. मुस्लिमांसोबत सार्याच समाज घटकांचे चित्र यापूर्वी इतिहास लेखकांनी आपापल्या अधू चष्म्यातून द्वेषमुलक व आपापल्या कुवती प्रमाणे रंगविले. त्यात सत्य कथन कमी आहे किंवा त्याचा दूराभास आहे, हाच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. श्री. कोतापल्ले यांनी यापूर्वीही या विचारांची मांडणी वारंवार केली आहे.
खरेतर, श्री. कोतापल्ले यांच्या पुढाकारातून अभिजात मराठी साहित्य निर्मितीच्या प्रवाहात मुस्लिम मराठी साहित्यिकांचाही प्रवाह कसा सामावून घेता येईल ? यावर त्यांनी स्वतः भाष्य करायला हवे होते. तो मुद्दा सुटलाच. त्यांच्या भाषणातही मुस्लिम मराठी साहित्य दाराबाहेर राहिले.
कॉ. सोनवणे यांच्या भाषणाने माझ्या कानांत कडकडीत तेल ओतले होते. मी 24 वर्षे पत्रकारितेत आहे. अनेक लेखकांचे लेख प्रसिद्ध केले. मुस्लिम नेत्यांच्या प्रतिक्रिया वारंवार छापतो. मात्र, मुस्लिम लेखकांच्या साहित्याकडे लक्षच गेले नाही, हा स्वतःमधील आधा अधुरा मुद्दा ठळकपणे लक्षात आला. दुसर्या दिवशी (शनिवारी) संमेलनस्थळी कॉ. सोनवणे यांची भेट घेतली. त्यांना मनातील विचार थेट बोलून दाखविले. मलाही मुस्लिम मित्र आहेत. त्यांच्यात मी वावरतो. पण, तुम्ही मांडता तसा विचार मी कधीच केला नाही, असे प्रांजळपणे म्हणालो. त्यावर ते हसले. म्हणाले, तरुण मित्रा आधी स्वतःपासून विचार कर, मी मुस्लिम द्वेष्टा का आहे ? वास्तव विचार करशील तर तुला तुझेच उत्तर मिळेल. माझे लहानपण गावातील मुस्लिम तरुणांना मामा म्हणण्यात गेले. आईला तेच जवळचे नातेवाईक होते. पण, आज पारंपरिक विचारांच्या प्रभावाने 80 व्या वर्षी आईचाही माईंडसेट मुस्लिम द्वेष्टा झाला आहे. मी काय करावे ? तू सुद्धा स्वतःपासून विचार कर... गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली. मराठी साहित्यांत खलनायकी पात्र मुस्लिमच का असते ? या प्रश्नाची रुखरुख निर्माण करणारी ती उदाहरणे... मी काही प्रश्न मनांत घेवून उठलो...कुठे तरी स्वतःच्या काही विचारांना बदलण्याची उमेद घेवून..
जैन उद्योग समुहाचा आधार
जळगावमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी मुस्लिम संमेलनाला जैन उद्योग समुहाने एक हाती प्रायोजकत्व दिले आहे. आयोजकांच्या मर्यादा होत्या. लोकप्रतिनिधींकडून फारशी मदत मिळाली नाही. सरकारी निधी नाहीच. बहुधा मराठी साहित्याच्या सेवेचा हा अप्रत्यक्ष लाभच जैन उद्योग समुहाला मिळाला. या संमेलनाचे नेटके संयोजन स्थानिक कार्यकर्ते श्री. फारुक शेख यांच्या नेतृत्वात इतरांनी केले आहे.
(प्रतिक्रियेसाठी संपर्क क्रमांक 9552585088)
-------------
Monday, January 14, 2013
परिवर्तनाच्या उंबरठ्यावर लेवा पंचायत ( Lewa Patil )
परिवर्तनाच्या उंबरठ्यावर लेवा पंचायत
लेवा पाटील समाजाच्या जात पंचायतीला पाऊणशे वर्षांचा इतिहास आहे. समाजातील वाद आणि कौटुंबिक कलह मिटविण्याचे न्यायालयबाह्य व्यासपीठ म्हणून बहुतांश कुटुंबांनी पंचायतीत झालेले निर्णय मान्य केले आहेत. दोषारोपाचे एक बोट दाखवून ही व्यवस्था बदनाम होईल मात्र उध्वस्त होणार नाही. पंचायतीला सांभाळणारे अनेक हात असून त्यांच्या सहकार्याने नव्या जोमाने, चेहर्यानेे पंचायत कार्यरत राहील. तसे करताना आरोपांच्या मागील काही कारणांचे वास्तवही समाजातील मान्यवर, प्रज्ञावंतांनी जाणून घ्यावे. तरच परिवर्तनाचा उंबरठा ओलांडल्याचे चित्र साकारले जाईल...
दिलीप तिवारी
जळगाव जिल्ह्यातील लेवा पाटीदार समाज कष्टाळू, मेहनती, प्रामाणिक, पापभिरू उच्चशिक्षीत, उद्योग- व्यावसायी, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राजकियदृष्ट्या जागरुक आहे. या समाजाचे स्वतःचे एक वर्तुळ आहे. त्यातही जातभेद- पोटभेदांची छोटी वर्तुळे आहेत. काही वर्तुळे राजकिय महत्वाकांक्षी मंडळींची आहेत. थोडीफार वर्तुळे आर्थिकदृष्या सक्षम असलेल्या उद्योग- व्यावसायींची तर काही बागायतदार शेतकर्यांचीही आहेत. वर्तुळांनी छेद दिलेल्या जागेत सर्वसामान्य समजला जाणारा समाज आहे. तो कधी वर्तुळांच्या आत तर कधी वर्तुळांच्या बाहेर असतो. अर्थातच, हा निर्णय सुद्धा हा सर्वसमाज स्वतंत्रपणे घेत नाही. जेव्हा एखाद्याचा कंपास वाढतो तेव्हा त्याच्या वर्तुळाचा परिघ वाढतो, आपसूक त्यातील सर्वसामान्य समाज वाढतो. कंपास छोटा झाला की तो कमी होतो. न बोलता, न कुरकूरता. यापूर्वी अनेकांचे राजकिय कंपास छोटे- मोठे झाले. त्या त्या वेळी समाजाने त्याचे लाभ घेतले तसे अंतर्गत कलहाचे चटकेही सहन केले. कधी एकत्र येवून तर कधी विभागले जावून. तरीही लेवा समाजाचे वर्तुळ एकसंघ आहे, हे मान्य करावेच लागेल.
लेवा समाजाच्या वर्तुळाचा परिघ कितीही कमी झाला किंवा वाढला तरीही समाजाच्या जात पंचायतीची अलिखीत आणि न दिसणारी अशी मर्यादा त्याला आहे. समाजातील अनेक नेते आजपर्यंत मोठे झाले. राज्याच्या आणि देशाच्या राजकिय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रावर त्यांनी आपल्या कार्यपद्धतीचा शिक्का मोर्तब केला पण जात पंचायतीच्या कारभारात ढवळाझवळ केली नाही किंवा कधी सत्तास्थानाची स्पर्धा म्हणून तेथे वादविवादांचे मोहळ उठवले नाही.
अगदी सन 1940 चे संदर्भ आठवले तर जात पंचायतीचे सामाजिक महत्त्व लक्षात येते. महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होवून कै. धनाजीनाना चौधरी आणि कै. भाऊसाहेब बोंडे आदींनी खिरोदा गावातील मंदिर हरिजनांसाठी खुले केले होते. त्यामुळे नाराज झालेल्या समाजातील काही मंडळींनी तक्रार केल्यानंतर जात पंचायतीने या दोघांसोबत इतरांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय तेव्हाचे कुटुंबप्रमुख कै. विठ्ठल पाटील (आताचे कुटुंब प्रमुख श्री. रमेश पाटील यांचे वडिल) यांनी दिला होता. जात पंचायतीचा हा निर्णय कै. चौधरी व कै. बोंडे यांच्यापर्यंत पोहचला. त्यांनी त्यावर टीका टीपण्णी करण्यापेक्षा वेगळीच व्यूहरचना करून मार्ग काढण्याचे ठरविले. पाडळसा गावात आपल्या बहिष्कारावर काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी कै. बोंडे आणि कै. सीताराम चौधरी एकेदिवशी थेट गावात पोहचले. त्यांचा टांगा कै. विठ्ठल पाटील यांच्या दारातच उभा राहिला. या दोघांचा तेव्हा समाजात दबदबा होता. त्यांना पाहून कै. पाटील म्हणाले, अरे बाबा माह्याच घरी आले. आता या. बसा. जेवा. असे म्हणत त्यांनी दोघांना आमरसाचे जेवण दिले. कुटुंबनायकच बहिष्कृत लोकांना प्रतिष्ठेने घरात बोलावतो व जेवू घालतो म्हटल्यावर समाजातील विरोधाचे कंगोरे आपोआप गळून पडले. ही बातमी समाजात पसरली आणि पसरवली गेली. दुसर्यादिवशी जात पंचायत झाली. तेव्हा कै. धनाजीनाना तेथे आले. कुटुंबनायक आणि पंचांनी हरिजन प्रथा निर्मूलनाच्या कार्याचा गौेरव करीत बहिष्काराचा निर्णय मागे घेतला. जात पंचायतीच्या निर्णयाचा आणि कुटुंबप्रमुखाचाही सन्मान राखला गेला. कोणतेही शाब्दीक तांडव न करता बहिष्कार मागे घेण्याचा हेतू साध्य झाला. येथे कुटुंबप्रमुखाच्या प्रागतिकपणाचेही कौतुक करावे लागेल. जात पंचायतीच्या निर्णयाचा फेरविचार करताना त्यांनी जातीपाती निर्मूलनाच्या सुधारणावादी विचारांचा गौरव केला. बहुधा फारच थोड्या मंडळींना ही घटना माहित असावी.
लेवा समाज जात पंचायतीच्या उपयुक्ततेचा विचार करायचा असल्यास तो गेल्या अर्ध शतकाताल समाजांतर्गत प्रवाह कसे बदलले ? याचा मागोवा घेत करावा लागेल.
सन 1956 ची एक आठवण अशीच. लेवा पंचायतीच्या निस्पृह आणि समान न्यायासोबत दातृत्वाची आठवण करून देणारी. कै. मधुकरराव चौधरी हे तेव्हा शिक्षणासोबतच समाजिक क्षेत्रात नवनव्या कल्पना राबविते होते. जळगाव परिसरात कै. डॉ. जी. डी. तथा अण्णासाहेब बेंडाळे शैक्षणिक क्षेत्रात काम करीत होते. आपापल्या संस्थांच्या गरजेसाठी जात पंचायतीसमोर जाण्याची वेळ दोघांवर आली. योगायोगाने दोघेही समोरासमोर आले. कै. डॉ. बेंडाळे हे कै. मधुकररावांना म्हणाले, बाळासाहेब मी जळगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी होस्टेल बांधतो आहे. खर्चासाठी पैसा हवा. होस्टेल बांधकामासाठी जात पंचायतीने आर्थिक मदत करावी, असे तुम्ही कुटुंबनायकांना सूचवा. कै. मधुकरराव म्हणाले, अण्णा तुमची सूचना आणि कार्य उत्तमच आहे. पण मी सुद्धा आज पंचायतीच्या दारात याचक म्हणूनच आलो आहे. कुष्ठरुग्णांसाठी संस्था स्थापन केली आहे. त्यासाठी मला कुटुंबनायकांकडून आर्थिक मदत हवी.
जात पंचायतीच्या दारात एकमेकांचे विशिष्ट हेतू घेवून आलेल्या या मान्यवरांनी आपल्या गरजा लक्षात आल्यावर परस्पर विरोधाचा सूर आवळला नाही. सामंजस्य आणि दुसर्याच्या समाज कार्याचा सन्मान करणारा संदेशच काळाच्या पानांवर लिहून ठेवला. कै. मधुकरराव पुढाकार घेवून म्हणाले, अण्णा तुमच्या होस्टेलला जात पंचायतीने आर्थिक मदत करावी असे मी सूचवतो. आमच्या कुष्ठसेवा मंडळाला मदत द्यावी असे तुम्ही सूचवा. दोघांनीही एकमेकांना समजावून घेतले. सांभाळून घेतले. प्रत्यक्ष पंचांच्या बैठकीत कै. डॉ. बेंडाळे यांच्या होस्टेलच्या बांधकामासाठी आर्थिक मदत देण्याचा ठराव लगेच मंजूर झाला मात्र कुष्ठसेवा मंडळाला का मदत द्यावी ? यावर थोडे विरोधाचे वातावरण झाले. अखेर मानवतावादी दृष्टीकोन अंगिकारत जात पंचायतीने कुष्ठसेवा मंडळालाही तेवढीच आर्थिक मदत दिली. जात पंचायतीच्या दारात सर्वांना कशी समान वागणूक होती, तेथे विवेक होता, आदर होता, निस्पृहपणा आणि पारदर्शकता होती हेच यातून दिसते.
या नंतर येतो आपण सन 1960 च्या दशकात. लेवा समाजात तेव्हा कायस्थिती होती ? शिक्षणाची दारे विविध संस्थांच्या माध्यमातून खुली होत होती. समाज शिक्षीत होवून सुधारेल असे आशादायक चित्र असताना मुलीच्या लग्नासाठी सोने आणि रोख रकमेचे बाय- बाय असे सूत्र तयार झाले होते. मुलीचा जन्म झाला की, कुटुंबावर भविष्यात संकटच कोसळणार, असे समजले जात होते. हुंड्यासाठी शेती विक, घर विक, काय असेल ते विक किंवा गहाण तरी टाक असे भयावह चित्र होते. याच्या विरोधात लेवा पंचायतीने पहिल्यांदा समाजाभिमूख भूमिका घेतली. हुंडा पद्धत बंद करून लग्न कार्य व इतर विधी- कार्यक्रमात खर्च कमी करण्याचे निर्बंध घालणे सुरू झाले. या समस्येने ग्रस्त आणि सोशिक समाज समाधानी होता. अर्थात, खावून पिवून संपन्न असलेल्या कुटुंबांचा सुधारणावादी विचारांनी विरोध होताच. त्यामुळे हुंडाबंदी विचारसरणी फारशी लोकप्रिय झाली नाही. पण, भविष्यातील त्रासातून सुटका करुन घेण्याचा मार्ग सर्वसामान्य कुटुंबांनी स्वीकारायला सुरवात केली. मुलीचा गर्भ काढून टाकण्याचे प्रमाण वाढू लागले. समाजातील नवशिक्षीत वैद्यकिय व्यावसायिक सुद्धा यात नौवलोकिक मिळवू लागले. असेच वातावरण 10- 12 वर्षे होते.
सन 1972 ते 76 चा काळ लेवा समाजासाठी सूवर्णकाळ होता. राज्याच्या मंत्रिमंडळातील साडेतीन मंत्रीपदे जळगाव जिल्ह्याच्या वाट्यावर आली होती. त्यात कै. मधुकरराव हे कॅबिनेट तर कै. जे. टी. दादा महाजन राज्यमंत्री होते.दोघांच्या प्रभावाखाली समाजाचा शैक्षणिक विकास न अडखळता सुरू झाला. शिकलेला समाज हुशारही होतो आणि काळाची पावलेही चटकन ओळखतो. समाजातील प्रती हजारी पुरुषांच्या मागे महिलांची संख्या रोडावत असल्याचे लक्षात येते होते. भविष्याच्या उदरात काय दडले आहे ? याचा अंदाज येत होता. पुन्हा हुंडाबंदी आंदोलन लेवा पंचायतीच्या माध्यमातून उभे राहीले. या आंदोलनात गावोगावचे तरुण उत्साहाने सहभागी झाले. कारण, तेव्हा प्रत्येकाच्या घरात मुलगी, बहिण, पुतणी, भाची अशा रुपात मुली होत्या. 21 व्या शतकात विवाहासाठी लेवा समाजात मुलीच मिळणार नाहीत, आदिवासी- भिल्ल समाजाच्या मुली आणाव्या लागतील किंवा कराराने लग्न करण्याची वेळ येईल हे वास्तव या तरुणाईला उमगले नव्हते, हेही तेवढेच खरे. तसे झाले असते तर आज लेवा समाजातील मुलांच्या लग्नाची समस्या उद्भवलीच नसती.
लेवा पंचायतीने गावोगावी जावून हुंडाबंदी विरोधात प्रबोधन केले. मुलीचा गर्भ काढू नका असा आग्रही केला. समाजात परिवर्तन आले मात्र, कालप्रवाह विवेकाच्या अनेक गोष्टी सोबत घेवून गेला.
सन 1984 च्या सुमारास समाजातील सर्व मान्यवर एकत्र आले. कै. मधुकरराव, कै. दादासाहेब बोरोले, कै. जे. टी. दादा महाजन असे अनेक मान्यवर. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही. यापैकी कै. मधुकराव आणि कै. जे. टी दादा यांच्यात राजकिय मतभेद टोकाचे होते. अगदी एकमेकांचे पटेनासे असेच. सध्याचे लेवा कुटुंबनायक श्री. रमेश पाटील हे युवावस्थेत होते. त्यांची दोघांना दोन शब्द सुनावले. अखेर समाजासाठी दोघेही संयम ठेवून, तोल सांभाळून लेवा पंचायतीच्या व्यासपीठावर आले. समाजाचे जोरदार अधिवेशन झाले. मुलगी पाहणे, साखरपुडा, लग्न, बाळंतपण, संततीप्राप्ती आणि मर्तिकाचे विधी अशा अनेक बाबतीत परंपरा मोडीत घालणारे ठराव अधिवेशनात झाले. युवक आणि महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लेवा पाटील समाजाने खर्या अर्थाने तेव्हा परिवर्तनाचा पहिला उंबरठा ओलांडला.
पण म्हणतात, समाजासाठी नियम करणारेच ते मोडतात. यात सर्व सामान्यापेक्षा मान्यवर जास्त असतात. हाच अनुभव समाजाला आले. कै. मधुकरराव आणि कै. जे. टी. दादांच्या राजकिय प्रभावातून नियम मोडणे सुरू झाले. वादाच्या वर्तुळांनी परस्पर छेद देत लेवा पंचायतीचा परिघ पार आकसून टाकला. अगदी दिसेनासा होईल असा. काळाच्या पडद्याआड अनेकांचे कंपास गेले. काही जण नवा कंपास घेवून उभे राहिले. तेव्हा लेवा पंचयातीच्या वर्तुळाचे अस्तित्व नगण्यच राहिले. ती व्यवस्था केवळ समाजातील सामान्य कुटुंबातील घटस्फोटांची गार्हाणेे ऐकणारी राहीली. आर्थिकदृष्या सक्षम मंडळी लेवा पंचायतकडे जाण्यापेक्षा न्यायालयात धाव घेत.
समाज शिक्षीत आणि उच्च शिक्षीत होत गेल्यावर प्रश्न कमी होतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरले. उच्चशिक्षीत महिलांचे प्रश्नही वेगळ्या स्वरुपात समोर येवू लागले. मुलींची संख्या मूळातच कमी त्यात शिक्षणामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकास व अधिकाराची झालेली जाणीव यामुळे सुशिक्षीत मुलींशी लग्न जुळण्यापेक्षा त्यांचे लग्नांनंतर वर्षा- दोनवर्षांत घटस्फोटांचे प्रमाण वाढले. तेव्हा पुन्हा आवश्यकता निर्माण झाली न्यायालयाच्या बाहेर निर्णय देणार्या लेवा पंचायतीची. हे चित्र पाहताना आठवण येते ती एका लेखाची.
जात पंचायती का हव्यात ? या विषयी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांचा जात पंचायतीचे विसर्जन करण्यापूर्वी... हा लेख एकदा वाचावा असाच आहे. न्यायव्यवस्थेत निस्पृहपणे न्यायदानाचे काम करणारे न्या. कोळसेपाटील म्हणतात, जात पंचायतीची उपयुक्तता लक्षात येण्यासाठी काही मुद्द्यांचा वेध घेणे गरजेचे ठरेल. मुख्य म्हणजे जात पंचायतीत संपूर्ण गाव एकत्र येऊन एखाद्या खटल्याचा निकाल देत असते. त्यामुळे तो निकाल पारदर्शक असतो. शिवाय खटल्यातील साक्षीदारांना गावापुढे साक्ष द्यावी लागते. त्यामुळे ती खरी ठरते. कारण गावासमोर सहसा खोटे बोलण्याचे धाडस केले जात नाही. याउलट न्यायालयात मात्र शपथेवर खोटी साक्ष दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. वास्तविक, न्याय हा साक्षीवर अवलंबून असतो. त्यामुळे साक्ष खरी असणे गरजेचे असते. साक्ष खोटी ठरली तर संबंधितांना न्याय मिळत नाही. या पार्श्वभूमीवर जात पंचायतीत सहसा खोटी साक्ष दिली जात नसल्याने तेथे मिळणारा न्याय योग्यच असतो यात शंका नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जात पंचायतीत दिला जाणारा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे त्यावर पुन्हा अपील करता येत नाही. परिणामी, खटले प्रलंबित राहण्याची शक्यता उरत नाही. साहजिकच वेळेची आणि पैशाची बचत होते.
जात पंचायतीद्वारे कारभार पाहिला जात होता तेव्हा समाजात प्रामाणिकपणा होता. शिवाय आजच्यासारखे असंख्य पुढारीही नव्हते. त्यामुळे जात पंचायतींवर पुढार्यांचे वर्चस्व निर्माण होते असे म्हटले जाते ते अलीकडच्या काळाशी सुसंगत ठरते. जात पंचायतींवर वरिष्ठ जातींचे वर्चस्व होते असाही आरोप केला जातो. त्यात तथ्य असले तरी या प्रक्रियेत सर्व जातींना सामावून घेतले जात होते, ही बाबही लक्षात घ्यायला हवी. या सर्व बाबी लक्षात घेता न्याययंत्रणा आणि जात पंचायत यांच्यात योग्य समन्वय निर्माण करणे गरजेचे आहे, असे वाटते. जात पंचायतीकडून कायदा हातात घेऊन अन्याय्य शिक्षा सुनावल्या जाऊ नयेत. यासाठी कायद्यात सुधारणा गरजेच्या आहेत. अशा शिक्षा सुनावणे टाळता आल्यास जात पंचायत न्यायदानासाठी सहाय्यक सिद्ध होऊ शकते, ही बाब लक्षात घ्यायला हवी.
न्या. कोळसेपाटील यांच्या लेखामुळे जात पंचायतीची गरज आणि तेथे राजकिय पुढार्यांमुळे होणारे हेवेदावे या मागील वास्तव लक्षात येते. काळाच्या प्रवाहात लेवा पंचायतीच्या बाबतही थोडे असेच घडत गेले म्हणावे लागेल. लेवा पाटील समाजचे काही गुण लेखाच्या सुरवातीलाच दिले आहेत. मात्र, हा समाज कुटुंबकेंद्री आणि त्यातील नेतमंडळी आत्मकेंद्री आहे, हेही इतिहासाच्या पानांतील व्यक्तिमत्वे वाचताना लक्षात येते. समाज कुटुंबकेंद्री झाला आणि नेते आपापल्या वर्तुळात मग्न झाले, अशावेळी समजासाठी झोकून काम करतो कोण ? हा प्रश्न शिल्लक राहीला. सार्वत्रिक निवडणुकींच्यावेळी लेवा समाजाच्या एकत्रित मतांचे नव्हे तर आपल्या परिघातील समर्थकांचे गणित पक्षाच्या नेत्यांनी वारंवार मांडले. यात फरफट झाली ती सर्वसमान्य माणसाची. तो केवळ निवडणुकीतला मतदार राहीला. निवडून येणारे समर्थकांच्या गोताळ्यात राहीले तर पराभूत होणारे समाजाला दुषणे देत राहीले. काळाच्या या चक्रात लेवा पंचायत राहीली कुठे ? ती केवळ घटस्फोटांची प्रकरणे मिटवणे एवढ्याच कामाची राहीली.
लेवा पंचायतीला कोणताही शासकिय निधी नाही, कोणत्याही प्रकारची वार्षिक वर्गणी नाही, इमारत- फोन- गाडी अशा सुविधा नाहीत. मग, घरच्या भाकरी खावून समाजासाठी राबतो कोण ? तेव्हा उरले पिढीजात कुटुंबनायक असलेले श्री. रमेश पाटील आणि त्यांच्यासोबतची काही मंडळी. अनेक बुजूर्गांचे निधन झाले. जागा वर्षानुवर्षे रिकाम्या राहील्या. मध्येच कधीतरी काही तरुण जोडले. त्यातील काही वादातीत होते. पण, समाजाच्या कामासाठी जी येतील ती चालवावी लागतात. तेथे नो एन्ट्री हा फलक कोणासाठीही नसतो. गुन्हेगारांसाठीही नाही.
काही मिळत नाही म्हटल्यावर लेवा पंचायत कार्यरत आहे की नाही, याच्याशी विविध क्षेत्रात प्रस्थापित मंडळींना फारसा फरक पडत नव्हता. समाजाचे गाडे आपल्या गतीने धावत होते. वर्तुळ पूर्ण करीत होते.
मध्यंतरी लेवा पंचायतची उपशाखा जळगाव येथे सुरू करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तथा प्रज्ञावंत श्री. नंदकुमार बेंडाळे यांनी समाज कार्यात लक्ष घालण्याचे ठरविले. त्यांनी सोबत काही जणांना घेतले. यापूर्वी जुन्या- नव्या पदाधिकार्यांमधील अंतर्गत कलह बाहेर आलेला नव्हता. जुन्या मंडळींनी 10- 12 लाखांचा हिशेब दिला नाही, नव्या काही पदांची निवड चुकीच्या पद्धतीने झाली असे आक्षेप दबक्या आवाजात सुरू होते. त्याचवेळी लेवा पंचायतीतील काही जुन्या पदाधिकार्यांवरही आक्षेप होते. घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये पक्षपात, अडवणूक असे किरकोळ प्रकार चर्चेत होते.
या असंतोषाचा जाहीर वाफारा सोडला तो माजी खासदार व गोदावरी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. उल्हास पाटील यांनी. फैजपूर, भुसावळ आणि इतर एका ठिकाणी झालेल्या लेवा समाजाच्या मेळाव्यात. भाषणात डॉ. पाटील बोलून गेले, समाजात घटस्फोटांचे प्रमाण शून्य व्हायला हवे. तसे झाले तर श्री. रमेश पाटील यांचे काम संपेल. वक्तव्याचा संदर्भ समाजातील वाढत्या घटस्फोटांच्या संख्येकडे लक्ष वेधण्याचा होता. मात्र, बोलण्याच्या ओघात डॉ. पाटील यांनी दुकान की दुकानदारी असा शब्द प्रयोग केल्याचे सांगून आरोप- प्रत्यारोपांचे मोहळ उठविण्यात आले. समाजातील समस्यांचा मूळ मुद्दा बाजुला पडला. आरोपीच्या पिंजर्यात आले, विद्यमान कुटुंबनायक आणि इतर पदाधिकारी. त्यांच्या बचावाला काही मंडळी सरसावली. योगायोगही कधीकधी अडचणी निर्माण करतो, श्री. रमेश पाटील यांच्या समर्थनार्थ उभे ठाकले माजी खासदार गुणवंतराव सरोदे, सौ. श्यामलाताई सरोदे, वाय. जी. महाजन आणि नंतर विधानसभेतील विरोधीपक्षनेते ना. एकनाथराव खडसे. हे सारे जण योगायोगाने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी निघाले. डॉ. पाटील पडले कॉंग्रेसचे. या धुमाळीत जळगावचे ऍड. प्रविण जंगले यांनीही कायदेशिर बाबी उलगडणारे एक पत्र प्रसिद्धीस पाठवून दिले. झाला लेवा पंचायतीच्या कारभाराविषयी हलकल्लोळ सुरू झाला.
श्री. रमेश पाटील हे डॉ. पाटील यांचे चूलत बंधू लागतात. डॉ. पाटील आणि श्री. बेंडाळे यांच्यात शैक्षणिक साम्राज्य विस्तारण्याची खुली स्पर्धा आहे. लोकसभेची आगामी निवडणूक कॉंग्रेस पक्षातर्फे किंवा अपक्ष लढण्याची तयारी डॉ. पाटील यांची आहे. डॉ. पाटील यांच्या विरोधात भाजपची फौज आहे. ऍड. जंगले आणि लेवा पंचायतीच्या जळगाव उपशाखेचे कुलसचिव ऍड. संजय राणे यांच्यातही स्पर्धा आहे. दोघे समव्यवसायी. अशा या मान्यवर मंडळींच्या अप्रत्यक्ष हेव्यादाव्यात प्रतिष्ठा पणाला लागली ती लेवा पंचायत आणि निष्ठेने काम करणार्या श्री. रमेश पाटील यांचीच. श्री. रमेश पाटील हे स्वतःच्या वाहनाने फिरतात. घटस्फोटांच्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी लेवा पंचायतीला नाममात्र शुल्क मिळते. पैशांचा कोणताही मोठा व्यवहार नसताना कुटुंबनायकासह सर्वच दोषारोपाचे धनी झाले. हे सारे चित्र न्या. कोळसे पाटील यांच्या लेखातील राजकारण्यांचा संदर्भ स्पष्ट करते.
हा वाद कोणत्या स्तराला जाणार ? या विषयी शंका असताना श्री. नंदकुमार बेंडाळे यांनी अत्यंत सामंजस्याची भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात डॉ. पाटील यांनीही इतर कोणते नवे मुद्दे उकरून काढले नाहीत. वादाचा वाफरा हवेतच विरण्याची चिन्हे दिसली. श्री. बेंडाळे यांनी लागोपाठ दोन दिवस लेवा पंचायतीतील मान्यवरांशी चर्चा केली. अनेक तास बैठकी झाल्या. अखेर, वादाचे विषय निवडून त्यावर निर्णय झाले. लेवा पंचायतीचे काम नव्या जोमाने करण्याचा विधायक आणि अनेकांच्या मनांतील ठराव झाला. हे अपेक्षित होतेच. लेवा पंचायतीचा कारभार आता श्री. बेंडाळे यांच्या नेतृत्वात सुरू होण्याची शक्यता आहे. सोबत श्री. रमेश पाटील असतीलच. काही नवे लोक जोडावे लागतील. त्यात तरुणांचा सहभागही असावा. वादात अडकलेल्यांना खड्यासारखे आधीच बाजूला ठेवावे. देशदूत परिवाराच्या शुभेच्छा आहेत. आम्हीही सोबत आहोत.
समाजातील तक्रारी अनेकांच्या
आहेत - डॉ. उल्हास पाटील
मी लेवा पंचायत संदर्भात कुठल्याही सभेत दुकानदारी शब्द वापरलेला नाही. समाजात घटस्फोटांचे प्रमाण लक्षणिय आहे, ते शून्यावर आले पाहिजे हेच माझे म्हणणे आहे. याशिवाय मी इतर कोणताही आरोप केलेला नाही. उलट काही जणांनी माझ्या तोंडी कथित वक्तव्य टाकून समाजात माझ्याविषयी विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माझी ईच्छा नसताना समाजातील पिडीत लोक माझ्याकडे येवून तक्रारी करु लागले. अशा लोकांना मी हाकलून देवू शकत नाही. प्रत्येकाचे मला ऐकावे लागते. याचा अर्थ मी लेवा पंचायतीच्या विरोधात काम करतो आहे असे होत नाही. समाजातील अडचणीच्या बाबीही समजून घेतल्या पाहिजेत. मी स्वतः पक्षाचा किंवा राजकिय विचारांचा दुराग्रह धरत समाजाच्या कार्यात सहभागी होत नाही. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कोणतेही पद नसताना मी काम उभे करतोय. मला कोणताही संस्था आयती किंवा वारसा हक्कामुळे मिळालेली नाही. त्यामुळे एखादी संस्था उभी करायला काय करावे लागते ? कशा अडचणी येतात ? लोक कशा अडचणी उभ्या करतात ? हे मला माहित आहे. गोदावरी वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातून सेवा देताना मी कधीही हा आपला तो परका असे करीत नाही. लेवा पंचायतीच्या कामावर माझा रोषही नाही आणि आक्षेपही नाही.
पंचायतीचे काम जोमाने
करणार - नंदकुमार बेंडाळे
लेवा पंचायतीला पावणे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. समाजातील अनेक वाद- विवाद, कौटुंबिक कलह निवारणारी ही एक विश्वासार्ह यंत्रणा आहे. समाजातील अनेक जुन्या जाणत्या लोकांनी पंचायतीचा मान- सन्मान राखला. तेथील काम कोणत्याही नेत्याच्या मर्जीप्रमाणे चालत नाही किंवा तेथे इतर कोणत्याही शक्तीचा प्रभाव नाही. हुडाबंदीच्या विरोधात याच पंचायतीच्या माध्यमातून समाजातील तरुणांनी प्रबोधन केले. आज समाज इतरांच्या तुलनेत उच्च शिक्षीत आहे. प्रश्न प्रत्येक समाजात असतात आणि समाजाच्या पदाधिकार्यांशी मतभेद अनेकांचे असतात. याचा अर्थ एखादी संस्थाच मोडीत काढण्याचा प्रयत्न कोणी करावा हे गैर आहे. आम्ही त्याचा गांभिर्याने विचार केला आहे. काही गोष्टी आमच्या समोर आल्या. त्यावर आम्ही सर्व जुने- नवे पंच एकत्र बसून तोडगा काढत आहोत. लेवा पंचायतीचे काम सुरूच राहील. उलट ते समाजाशी जास्त कसे जोडले जाईल याचा आम्ही विचार करु. मी स्वतः यात पुढाकार घेतला आहे. सर्व पदाधिकारी माझे ऐकतील असे वाटते. दोन दिवस लागोपाठ चर्चा केली आहे. काही विषय बाजूला टाकले. काहींवर तोडगा काढला. हे सारे सन्मानाने होते आहे. इतरांनीही यात सहभाग द्यावा अशी अपेक्षा आहे. पंचायतीचे काम नव्या जोमाने करणार आहोत.
कुटुंबनायक म्हणून मला
ऐकणे भागच - रमेश पाटील
मी लेवा पंचायतीचा वारसा हक्काने कुटुंबप्रमुख आहे. पर्यायाने समाजाचाकुटुंब प्रमुखच. त्यामुळे माझ्यावर किंवा लेवा पंचायतवर होणारे आरोप मला ऐकणे भागच आहे. आरोप करणारे माझे नातेवाईकच आहेत. त्यांना काय बोलणार ? गेली 35- 40 वर्षे मी लेवा पंचयातीचे काम करीत आहे. तेथे कोणताही पैसा मिळत नाही. उपभोग घेता येईल अशी संस्थेची कोणतीही मालमत्ता नाही. मी माझ्या गाडीने फिरतो. मुलाने कर्ज काढून ती घेवून दिली आहे. कोणत्याही पक्षीय राजकारणात माझा उघड किंवा छुपा सहभाग नाही. आम्ही दोनचार जण समाजातील अडचणी जमेल त्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करतो. पंचायतीचे काम समोरासमोर चर्चा करुन निर्णय देण्याचे असते. दोघांनी मानला तर निर्णय होतो नाहीतर जातात कोर्टात. येथे काही बळजोरीचा मामला नाही. उलटपक्षी, जेव्हा समाजाचे काम करण्याची वेळ आली तेव्हा समाजतल्या मोठ्या नेत्यांना मी खडेबोल सुनावले आहे. माझ्या युवावस्थेत हुंडाबंदीविरोधात आम्ही काम केले. अनेक अनिष्ट परंपरा बदलण्याचा प्रयत्न केला. समाजाने केले तरच परिवर्तन होते. धाक- दडपशाहीने नाही. आम्ही आमच्या कुवतीने प्रयत्न करतो. त्यात कधी यश तर कधी अपयश आहे. लोकांचे मनासारखे जमले तर ते पंचायतीचे नाव घेतात. बिनसले की बदनामी. मला सवय आहे.
लेवा समाजाची पंचायत
हवीच - ना. एकनाथ खडसे
लेवा समाजातील कोणालाही स्वतःहून किंवा दुसर्या मार्फत उपद्रव न देणारी लेवा पंचायत हवीच. उलट ती अधिकारांनी सक्षम झाली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या वाद- विवादात आज न्यायालयातून न्याय मिळायला विलंब होतो. तेथे खर्चही येतो. अनेकांना खेट्या घालाव्या लागतात. जात पंचायतीच्या माध्यमातून लवकर आणि सर्वमान्य न्याय मिळण्याची सोय आहे. घटस्फोटासारखी प्रकरणे न्यायालयात वर्षानुवर्षे चालतात. निकाल लागत नाहीत. जात पंचायत लवकर निर्णय देते आणि दोघांचे मार्ग मोकळे होतात. समाजात इतरही भांडण- तंटे आम्हाला नेते म्हणून मिटवावे लागतात. कधी पोलिसांची भीती, कधी प्रेमाने तर कधी दरडावून योग्य निर्णय द्यावा लागतो. लेवा पंचायतीचे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. तेथे निधी मिळत नाही. घरचे खावून समाजाचे काम करायचे आहे. वर्षानुवर्षे तेथे लोक काम करीत आहेत. माझा त्यांच्याशी संबंध नव्हता. फैजपूरच्या सभेत त्यांनी बोलावले आणि तेथे आला. लेवा पंचायतीचे काम त्यांच्या पद्धतीने सुरू आहे. त्यावर कोणीही आतापर्यंत आक्षेप घेतलेला नाही. कोणाची तक्रार नाही. आताही हा मुद्दा काही जणांच्या दुराग्रहामुळे आला असावा. येथे कोणाची बाजू घेण्याचे, राजकिय पक्षाचे काम नाही. ज्याला वाटते त्याने काम करावे. ही पंचायत समाजासाठी आवश्यक आहेच.
(लेखावर प्रतिक्रीया देण्यासाठी संपर्क क्रमांक 9552585088)
-----------------------

Saturday, April 28, 2012
जळगावच्या गुन्हेपटावर दुसर्या पिढीचा रक्तसंघर्ष
गेल्या 20- 25 वर्षांत जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्यांची सशस्त्र दहशत पोलीसांच्या कणखर कारवाईमुळे संपुष्टात आली आहे. टोळ्यांच्या म्होरक्यांनीही स्थानिक स्वराज्य, सहकारी, शिक्षण आणि काही क्रीडा संघटनांमध्ये कारभारीपदे मिळविल्यामुळे त्यांचे लोकदर्शन सभ्यतेचा मुखवटा घालून होत आहे. असे पांढरपोषाखी पुढारी पोलीसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईला घाबरतांना दिसतात. हा धाक निश्चितच कायद्याचाच आहे. मात्र, एप्रिल 2012 मध्ये एकमेकांवर सशस्त्र हल्ल्याच्या घडलेल्या काही घटना पाहता गुन्हेगारीपटावर दुसर्या पिढीचा रक्तसंघर्ष सुरू झाला की काय? अशी शंका येते. नव्या गुंडाराजचा हा बाका प्रसंग ओळखून पोलीसांनीही दंडाराज अस्तित्वात आहे, हे दाखवून द्यायलाच हवे...
सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्माने मुंबईतील गुन्हेगारी विश्र्वातील वास्तव ‘सत्या’ या गुन्हेगारीपटातून प्रत्ययकारी पद्धतीने मांडले आहे. या चित्रपटातील लक्षात राहणारे एक दृश्य आहे. गुंड भीकू म्हात्रे समुद्र किनार्यावरील उंच इमारतींच्या पार्श्र्वभूमीवर उभा राहून सहकार्याला विचारतो, ‘मुंबईका किंग कौन’...आणि जोरात हसत स्वतःच म्हणतो...भीकू म्हात्रे.
जळगाव महानगरात आज कोणताही कधीकाळी नामचिन म्होरक्या स्वतःला भीकू म्हात्रे समजून, जळगावचा किंग कौन? असे विचारेल तर...उत्तर देण्याची हिंमतही त्याचा पंटर करू शकणार नाही. कारणच तसे आहे.
1980 पासून गेल्या 30- 31 वर्षांत जळगावमधील अनेक टोळ्यांच्या म्होरक्यांनी राजाश्रय घेऊन स्वतःचे उखळ शब्दशः पोषाखे आणि अर्थकारणातून पांढरे करून घेतले आहे. कधीकाळी दारू गाळणारे, रेल्वेच्या वॅगनमधून कोळसा चोरणारे, रेल्वेचे भंगार पळवणारे, सट्टा- मटका चालविणारे, वैश्यांकडे मौजमजेसाठी येणार्या शौकीनांना लुबाडणारे असे सारेच्या सारे टोळीप्रमुख आज राजकिय झूल पांघरून दादा, भाई, नाना, आबा, तात्या, काका, बाबा झाले आहेत. यातील काही जणांची हातात पाटी घेतलेली छायाचित्रे त्यावेळी शहर, जिल्हा, शनिपेठ पोलीस ठाण्यांमधील दर्शनी फलकांवर होती.
या टोळीप्रमुखांना विविध राजकीय पक्षांनी पद आणि प्रतिष्ठा दिली. कोणताही नेता किंवा पक्ष त्याला डावा- उजवा अपवाद नाही. जळगावच्या स्थानिक राजकारणात सत्तेचे आणि पैसा कमावण्याचे साधन झालेल्या पूर्वीच्या नगरपालिका आणि आताच्या महानगर पालिकेत स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून जवळपास सर्वच टोळीप्रमुखांचे दलबदल, निष्ठाबदलाचे अनेक अध्याय पूर्ण झाले आहेत. एकमेकांच्या गटात आणि गोटात येणार्या- जाणार्या प्रत्येकाचे पायघड्या घालून स्वागतच मान्यवर नेत्यांनी केले आहे.
गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळवून देणार्या इतिहासाची पाने चाळली तर अनेकांच्या रक्ताळलेल्या हातांचे चारित्र्य समोर येते. असे म्हणतात, वाईट इतिहास फार उगाळू नये. मात्र, वर्तमानाच्या पानांवर भविष्यातील चुकांचे काही डाग पुन्हा नजरेस पडत असतील तर परखड लेखणीच्या प्रहाराने ते कृत्य रोखण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा. हाच हेतू या लेखनामागे आहे. कोणत्याही मान्यवराचा मानभंग करण्याचा हा प्रयत्न नव्हे किंबहुना तसे कोणाला वाटले तर आडनावातील साधर्म्यमुळे निर्माण झालेला तो केवळ योगायोग समजावा.
जळगावच्या गुन्हेगारी पटावर रक्ताळलेल्या कहाण्यांमध्ये प्यादे नेहमी लेवापाटील, कोळी, मेहतर, परिट (धोबी), मुस्लिम समाजाचे राहिले आहेत. यात काहींचा संघर्ष हा दुसर्या समाजातील म्होरक्यांशी झाला आहे, तसेच स्वतःच्या समाजातूनही त्यांना आव्हान मिळाले आहे. या सार्या कहाण्या तिहेरी संघर्षांच्या आहेत. तिसरा संघर्ष हा पोलीसांशी झाला आहे.
1980 च्या आसपास जळगावमध्ये काही भागात ठराविक म्होरक्यांची दादागिरी होती. एम. जे. कॉलेज परिसर हाही एक भाग होता. तेथे खडके- कोल्हे यांचे नाव घेतले जायचे. या म्होरक्यांना विधायक विरोध ऍड. बबन बाहेती करायचे. कबड्डीच्या मैदानातूनही या म्होरक्यांचा संघर्ष रंगायचा. काट्याफईल भागात मलिक यांचे नाव चालायचे. शनिपेठेत ढंढोरे होते. गांजा- भांग विक्रीत काळे तसेच सट्टा- बेटींग व गावठी दारूच्या विक्रीतही काळे होते. यापैकी काही मंडळी रेल्वेतील मालाची उचलेगिरी करीत. काही मौजमस्ती करणार्यांना लुबाडत. कोणाच्या लॉजवर जुगाराचे खेळ चालत. काहीजण अक्षरशः 10- 20 रुपयांसाठी भांडत. जिल्हा रुग्णालय आणि सिंधी कॉलनी भागाकडे शिरसाळे, चांगरे, सोनवणे, सपकाळे, पांचाळ यांच्या नावांची चलती होती.
एकमेकांचा भाग सोडून कोणीही दुसर्या ठिकाणी दादागिरी करीत नसत. बहुधा ते अलिखीत सामंजस्य होते.
याच काळात एम. जे. कॉलेजमधील बलात्कार प्रकरण गाजले. मोर्चे, सभा आदी आंदोलनांच्या माध्यमातून आलेल्या नागरी दबावामुळे पोलीसांनी गुन्हेगारांना गजाआड केले. जळगावच्या गुन्हेगारी इतिहासातील हा पहिला काळा अध्याय ठरतो.
यात आरोपी असलेल्या संशयितांनी नंतर बाहेती यांच्यावरही हल्ला केला. त्यात जगदीश जोशीचा बळी गेला. कालांतराने कोल्हे- बाहेती हे एकमेकांच्या जवळही आले. आज दोघेही पडद्याआड गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या दुसर्या पिढीचा कोणताही संघर्ष नाही.
नंतरच्या काळात शनिपेठेतील वर्चस्वातून मेहतर समाजातील ढंढोरे - चांगरे यांचे संघर्षाचे बीज पेरले गेले. आजही ही धुसफूस आहेच. ढंढोरे यांनी रेल्वेस्थानकाजवळ मानसिंग यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर आजपर्यंत दोघांचाही एकमेकांवर विश्वास नाही. ढंढोरे यांना गृहकलहला सामोरे जावे लागले. ढंढोरे आणि चांगरे मंडळीही काही काळ राजकारणातून बाहेर फेकली गेली.
त्यानंतरच्या काळात शिरसाळे, पांचाळ, सपके आणि सोनवणे यांच्यातील वैमनस्याचा अध्याय लिहीला गेला. या टोळ्यांनी एकमेकांना संपविण्याचा चंगच बांधला. शिरसाळे - पांचाळ यांच्या समर्थकांवर सोनवणे मंडळींनी हल्ले केले. त्यानंतर नव्या भिकमचंद जैन व्यापारी संकुलाजवळच्या दर्गाशेजारी शिरसाळे- पांचाळ व सपके यांच्या टोळीने तत्कालिन नगरसेवक शालिक सोनवणे यांचा अत्यंत निर्दयपणे खून केला. या घटनेनंतर जळगावच्या गुन्हेगारी संघर्षांची कथा राज्यस्तरीय वृत्तपत्रातूनही रंगली होती.
जळगावच्या गुन्हेगारी विश्र्वात शिरसाळे विरोधात सोनवणे, सोनवणे विरोधात ढंढोरे, सोनवणे विरोधात सोनवणे, भोईटे विरोधात सोनवणे अशा संघर्षांची अनेक प्रकरणे आहेत.
सोनवणे टोळीने एका दवाखान्यात घुसून शिरसाळे गटाच्या सुनील पाटील याचा निर्दयप़णे खून केला होता. यावेळी सोनव़णेे गटाच्या एका म्होरक्याने स्वतःजवळच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. नंतर या मंडळींनी गुन्हेगारी विश्वातून स्वतःला अलगद बाजूला करीत कार्यक्षेत्र बदलून घेतले.
क्रिकेटच्या भांडणातून (चर्चेतील कारण) डॉन सोनवणे कंपनीने ढंढोरे टोळीचा युुवा म्होरक्या बापू याचा मध्यप्रदेशातील शिरवेलजवळ अक्षरशः मुडदा पाडला. हे प्रकरण त्यावेळी संपूर्ण राज्यभर गाजले. बापूच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी झाली होती. त्यावेळचे अनेक गावगन्ना पुढारी या अंत्ययात्रेत सहभागी होते. बापू हा समाजसेवक नव्हता. जळगावमधील एम. जे. कॉलेज, बांभोरी महाविद्यालयसह सेंट्रल फुले मार्केट ही त्याच्या गुन्हेगारीची व हप्तावसुलीची ठिकाणे होती. मित्र आणि शत्रूसोबत क्रूरपणे वर्तवणुकीच्या त्याच्या कहाण्या आजही अंगावर शहारे आणतात.
सिंधी कॉलनी लगतच्या वार्डातील राजकीय वैमनस्यातून चांगरे- शिरसाळे गटात सतत धुम्मस सुरू असायची. यातून राजकीय पराभवाचा वचपा काढण्यासाठी चांगरे टोळीने शिरसाळे गटाचा मोहरा बापू बाविस्कर याला खोटेनगर जवळच्या एका हॉटेलजवळ हल्ला करून संपविले. त्यानंतर शिरसाळे कंपनीही थंडावली. आणि नंतर राजकारणातून बाहेर फेकली गेली. म्होरक्यासह पत्नीलाही पराभूत व्हावे लागले.
पालिका निवडणूक वादातून सोनवणे टोळीने रणजित भोईटे यांचा प्रेमनगर रेल्वेगेटजवळ निर्घृणपणे खून केला. भोईटे यांच्या पत्नीने सोनवणे यांच्या आईचा पराभव केल्याच्या रागातून सोनवणेंच्या दुसर्या पिढीतील युवा म्होरक्याने ही कामगिरी बजावली.
निवडणुुकीच्या वादातूनच सोनवणे टोळीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी रमेश सोनवणे यांचा बळी घेतला. येथेही सोनवणे यांच्या दुसर्या पिढीतील युवा म्होरक्यानेच सुपारी तडीला नेली.
वरील सर्व ठळक घटना इतिहासाच्या पानातून गुन्हेगारी प्रवासाचे वास्तव सांगत असताना एक बाब आणखी ठळकपणे जाणवते. ती म्हणजे, 1980 नंतर जळगावमधील अनेक म्होरक्यांनी पालिकेच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या निवडून येण्याच्या मेरिटवरून त्यांना राजकीय नेत्यांनी उमेदवारी दिल्यात. अनेक जण निवडून आलेत. कालांतराने महिला आरक्षण आल्यानंतर काही म्होरक्यांनी पत्नीसह राजकारणात श्रीगणेशा केला. जळगावच्या मतदारांनी या मंडळींना येन केन प्रकारे स्विकारले, हेही वास्तव इतिहासाच्या पानातून दिसते.
जळगावच्या राजकारणात गल्लीतला पराभव पाहण्याचा इतिहासही आमदार सुरेशदादा जैन यांच्या नावावर लिहीला गेला. खोटेनगर, जिल्हा दूध संघाचा भाग असलेल्या भागातून दादांना 400 मतांनी पराभूत व्हावे लागले.
गुन्हेगारी पटावरील अनेक म्होरक्यांचे राजकारणात पुनर्वसन केल्याचा आरोपही आ. दादांवर होतो. अर्थात, याला दुसरीही बाजू आहे. ती म्हणजे, आ. दादांनी गुन्हेगारांना राजकारणात आणल्यामुळे काही वर्षे जळगावातील गुन्हेगारी थांबली असेही म्हटले जाते. जळगावात सर्व सामान्यांच्या पोरीबाळी सुरक्षित फिरू शकल्या यामागे आ. दादांचीच रणनिती यशस्वी झाल्याचा उल्लेख केला जातो.
जळगाव पालिकेच्या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी अनेक म्होरके छुटपूट गुन्हे करून खंडणीच्या माध्यमातून पैसा मिळवित. मात्र, नगरपालिकेच्या आणि त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून गटारी, रस्ते, स्वच्छता, डेली वसुली आदी विकास कामांचे ठेके घेऊन म्होरक्या मंडळींची आर्थिक स्थितीही उत्तम होत गेली. कालांतराने ही मंडळी बिल्डर झाली. काहींनी मध्यप्रदेशात जाऊन व्यवसाय वाढविला. कधीकाळी गल्लीबोळात छोट्या खोल्यांमध्ये राहणारे म्होरक्यांचे कुटूंब मध्यवस्तीत अभेद्य सुरक्षेच्या बंगल्यांमध्ये राहायला आले. काहींनी भीतीपोटी मोहल्ले आणि बंगले बदलले.
मध्यंतरी महापालिका आणि जिल्हा बँकेतील व्यक्तीगत संघर्षांतून वाळू लिलावाच्या आर्थिक सुबत्तेकडे सभ्य पुढार्यांचे लक्ष गेले. खरे तर वाळू लिलावाचे ठेके हे टोळ्यांचे ठराविक म्होरकेच घेत असत. मात्र, एकमेकांना संपविण्याच्या इर्षेतून कोणी शेअर बाजारातील पैसा, तर कोणी सोने व्यवसायातील पैसा यात लावला. वाळूच्या सुबत्तेत अनेक वाटेकरी उभे राहिले. गुन्हे विषयक वर्चस्वाला हे नवे क्षेत्र मिळाले.
राजकारणाच्या या उंबरठ्यावर जैनांनी सोनवणेंशी, सोनवणेंनी खडसेंशी, काळेंनी जैन नंतर पुन्हा खडसेंशी, सोनवणे यांनी पुन्हा सोनवणे यांच्याशी जमवून घेतले. एकमेकांना राजकारणात प्रतिष्ठा देण्यासाठी सहकार्यही केले.
गुन्हेगारी क्षेत्रातील ही मंडळी सभ्यतेचा मुखवटा घालायला लागल्या पासून काहीजण समाजिक काम करायला लागले. काही नियमित हजला जायला लागले. काही शिर्डीच्या साईंचे भक्त झालेत. मंदिराच्या भंडार्यासाठी देणग्या देऊ लागले. महिला- परितक्त्यांना आर्थिक मदत देऊ लागले. समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळाली. काहींनी सामूहिक विवाहात पुढाकार घेतला. काहींनी शिक्षण संस्था काढल्या. काही क्रीडा क्षेत्राचे तारणहार बनले.
जळगावच्या गुन्हेगारी क्षेत्राचे गेल्या 20- 30 वर्षांत शांततेने पुनर्वसन झाल्याचे वाटत असताना एप्रिल 2012 मध्ये पुन्हा गुन्हेगारीविषयक घटनांनी उचल खाल्ली. टोळ्यांच्या म्होरक्यांची युवा पिढी सक्रिय झाल्याचे अनेक घटनांमधून दिसले. कोल्हे कुटूंबातील ललित, ढेकळे कुटूंबातील मधुकर, सपकाळे कुटूंबातील राजेश (बाबू), मलिक कुटूंबातील सईद आणि नंतर नईम, सोनवणे कुटूंबातील अक्षय, हटकर कुटूंबातील कैलास यांची नावे आज विविध घटनांमध्ये चर्चेत आहेत किंवा सं़शयित म्हणून आहेत.
दुसर्या पिढीतील ही मंडळी वाड- वडिलांनी प्रयत्नपूर्वक सोडलेल्या दहशतीच्या व टोळी युद्धाच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना वेळीच पोलीसांनी रोखायला हवे.
गेल्या 20- 25 वर्षांत जळगाव शहरात पोलीस अधीक्षक म्हणून काम करणार्या पी. डी. भाल, अरूण पटनायक, दीपक जोग, दिलीप श्रीराव, रश्मी शुक्ला, भूषणकुमार उपाध्याय, कुलवंत कुमार, संतोष रस्तोगी, सुनील फुलारी, प्रवीण साळुंखे, दिलीप सावंत, सारंग आव्हाड, कैसर खालिद आदींनी आपल्या निस्पृह कामाचा ठसा उमटवून गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांना पायबंद घातला. यात, पोलिसींग कार्यपद्धतीही गुन्हेगारांवर वरचढ ठरली. आज त्याच कार्यशैलीची पुन्हा गरज निर्माण झाल्याचे दिसत आहे. ही शैली पुन्हा जळगावातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळू शकेल.
दादानिर्मूलन कायदा प्रभावीपणे राबवावा...
झोपडपट्टीदादा निर्मूलन कायद्याची (एमपीडीए) प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याचे उदाहरण जळगाव शहरातले आहे. शिक्षण क्षेत्राला वेठीस धरू पाहणार्या काही मंडळींना या कायद्याने सळो की पळो करून सोडले आहे. याच कायद्याचा धाक दाखवून राजकीय पक्षाचा म्होरक्या मालपुरे, माजी महापौर सपकाळे यांच्यावरही कारवाई सुरू झाल्याची चर्चा आहे.
(लेखक हे देशदूत - जळगाव आवृत्तीचे सहाय्यक संपादक आहेत.)

Friday, September 17, 2010
प्रधान सचिवांना दंड

कोणत्याही गुन्हेगारावर काय आरोप ठेवण्यात आला आहे व तो का? त्या गुन्ह्याची शिक्षा काय आहे? हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. त्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणार्या शासकीय यंत्रणेवरसुद्धा कारवाई होऊ शकते. पण महाराष्ट्र शसन दिवसेंदिवस अधिक संवेदनशून्य होत आहे. त्या संवेदनशून्यतेच्या परिणामाला राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिव मेधा गाडगीळ यांना सामोरे जावे लागले. मुंबई हायकोर्टात दाखल झालेल्या एका याचिकेचा निकाल देताना त्यांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका व्यक्तीला स्थानबद्ध केले गेले. ती कारवाई का केली, अशी विचारणा संबंधिताने नियमानुसार अर्ज करून केली होती. अर्जाला उत्तरच मिळाले नाही म्हणून हायकोर्टात याचिका दाखल झाली. संबंधित विभागाचे प्रशासनप्रमुख म्हणून थेट प्रधान सचिवांना कोर्टाने जबाबदार धरले. ठोठावलेला दंड व्यक्तिगत स्वरुपात भरण्याचाही आदेश दिला. प्रधान सचिव मेधा गाडगीळ यांच्या घराण्याला तीन पिढ्यांचा राजकीय वारसा आहे. कारभारात सध्या वाढलेल्या बेशिस्तीला नोकरशाहीइतकेच राजकीय नेतेसुद्धा जबाबदार आहेत, असा जनतेचा समज आहे. तो कितपत योग्य आहे, याचे खरे उत्तर कुणीच देऊ इच्छित नाही. बेजबाबदारपणाची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याकडेच संबंधितांचा कल असतो. तथापि कारभारातील बेपर्वाईचे चटके मात्र सामान्य जनतेलाच बसत असतात. ‘मुकी बिचारी कुणी हाका’ या त्यांच्या अवस्थेत दिवसेंदिवस भरच पडत आहे, हे वास्तव कसे नाकारणार? प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निकाल स्वागतार्ह खरा; पण गोमेचा एक पाय मोडल्याने गोम पांगळी होत नाही म्हणतात तशी आपल्या राज्याच्या प्रशासन यंत्रणेची परिस्थिती आहे. अगदी तालुकापताळीवरील कोणत्याही कार्यालयाची झाडाझडती घेतली तर अकारण अडवून व अनुत्तरित ठेवलेली हजारो प्रकरणे उघडकीस येतील. प्रत्येक गुन्ह्यात या प्रकारे दंड ठोठावला तर राज्याच्या पंचवार्षिक योजनेसाठी कुठल्याही कराची तरतूद लागणार नाही. हा दंड भरला जाईल किंवा त्याविरुद्ध अपील दाखल होऊन अनेक वर्षे प्रकरण प्रलंबित राहील. कधीकाळी उत्कृष्ट प्रशासनासाठी नावाजलेल्या महाराष्ट्राच्या या दुर्गतीची कुणाला चाड आहे?
Friday, September 3, 2010
गोदावरी प्रदूषणाचे गुन्हेगार कोण?

(सविस्तर वाचा पिपल्स पॉलिटीक्स च्या सप्टेंबर 2010 च्या अंकात)
दर एक तपानंतर गोदावरी काठावर होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे देव तथा संतभूमी त्र्यंबकेश्वर आणि मंदिरांची पवित्र भूमी नाशिक हे जगप्रसिद्ध झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे गोदावरीचे अस्तित्त्व आकुंचित होत असून, विविध कारणांमुळे प्रदूषित होणारे पाणी हे वापराच्या लायकसुद्धा नाही. माशांचा मृत्यू आणि पात्रात फोफावणार्या पाणवेलींच्या समस्येमुळे गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेच्या ऐरणीवर आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठीचा देखावा त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत असतात. थातूर- मातूर कारवाई आणि चिल्लर स्वरुपातील स्वच्छता मोहीम अशा पत्रकबाजीत गोदावरी प्रदूषणाचे खरे गुन्हेगार मात्र बाजूला पडत आहेत....
गरूड पुराणात सिंहस्थ कुंभमेळा आयोजनाचे महात्म्य स्पष्ट केले आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या अमृतकुंभातील अमृताचे काही थेंब धम्मगिरी पर्वतराजीच्या परिसरातून उगम पावणार्या गोदावरी काठावर वसलेल्या त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थात आणि नाशिक महानगरीतील रामकुंडात पडल्याचा उल्लेख या पुराणात आहे. या दोन्ही ठिकाणी दर 12 वर्षांनी साधू-संतांचा सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यामुळे त्र्यंबकेश्वर आणि नाशिककडे तपोभूमी म्हणून पाहिले जाते. गोदावरीच्या अस्तित्वामुळे अनेक शहरे, गावे पावन होतात. पिण्यासाठी, सिंचनासाठी पाणी, विविध प्रकारच्या रोजगार- उद्योगांची संधी यामुळे गोदावरी या भागाची जीवनदायनी ठरते. तिला दक्षिणगंगा असेही संबोधतात.
नाशिक ते त्र्यंबकेश्वरदरम्यानचे अंतर साधारणत: 28 किलोमीटर आहे. नाशिक महानगराची लोकसंख्या 18 लाखांच्या आसपास आहे. त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी गोदावरी नाशकातून किमान 18 किलोमीटर लांबीच्या पात्रातून वाहते. प्रत्येक नाशिककराचा आणि वर्षभरात येथे लाखोंच्या संख्येत येणार्या भाविक, पर्यटकांचा कधीना कधी गोदावरीशी संबंध येतोच.
नाशिकची पाणीपुरवठा व्यवस्था गोदावरीवर अवलंबून आहे. नाशिक परिसरातील शेती सिंचन, उद्योग- व्यवसायासाठी लागणारे पाणी गोदावरीतूनच मिळते. पर्यटनाचा व्यवसाय गोदावरीशी संबंधित परिसरातच फुलतो. नाशिक महानगराचे सौंदर्य गोदाघाटामुळे वाढते. पोथी-पुराणातील गोदावरी महात्म्यपेक्षा गोदावरीचे हे महत्त्व त्रिकाल अबाधित आहे.
कधीकाळी धम्मगिरीच्या पर्वतराजीतून अवखळपणे वाहत येणारी गोदावरी सोमेश्वरपासून शांत- शीतल होत जाते. नाशिक महानगर परिसरात ती अगदी स्थितप्रज्ञ झाल्यासारखी असते. गोदावरी कधीही क्रौर्याने कोपत नाही. पावसाळ्यात संतापली तरी तिचा पूर हा पात्राच्या आवाक्यात असतो. लवकर नियंत्रितही होतो.
गेल्या काही वर्षांत गोदावरीला आकुंचित आणि प्रदूषित करण्याचा अप्रत्यक्ष अपराध विविध प्रकारच्या समाज व शासकीय घटकांकडून होत आहे. काही ठिकाणी ते अनावधानाने घडते आहे तर काही ठिकाणी जाणूनबुजून केले जात आहे. ज्यांनी हे रोखायला हवे त्या संस्था (त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक महानगरपिलिका) आणि यंत्रणा (प्रदूषण नियंत्रण महामंडळ) डोळ्यांवर झापडे पांघरून गप्प आहेत.
केंद्र शासनाच्या मध्यवर्ती प्रदूषण नियंत्रण मंडळाचा महाराष्ट्रातील नद्यांच्या प्रदूषणाविषयीचा एक अहवाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला आहे. त्यात सर्वाधिक प्रदूषित आढळलेल्या नद्यांच्या यादीत गोदावरीचे नाव तिसरे आहे. याशिवाय भीमा, पवना, पंचगंगा, पाताळगंगा, इंद्रायणी, कोयना, कुंडलिका, तापी, गिरणा, वैतरणा, निरा, कृष्णा, पूर्णा, चंद्रभागा, वेण्णा, रंगावली आणि भातसा या नद्या प्रदूषित झाल्याचे सुस्पष्ट मत नोंदविले आहे.
काठावरील कारखाने, साखर कारखाने, सांडपाणी यामुळेे या सर्व नद्यांचे स्रोत प्रदूषित झाल्याचा सविस्तर उल्लेख अहवालात आहे. हा एकमेव अहवाल म्हणजे गोदावरीच्या प्रदूषणाचा दस्तावेज नाही. यापूर्वी किमान 50 वेगवगेळ्या प्रकारच्या अभ्यास गटांनी गोदावरीचे प्रदूषण या विषयावर स्वतंत्रपणे अहवाल तयार केले आहेत. प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनाही सांगितल्या आहेत, मात्र प्रदूषित गोदावरी हे नाशिक शहरासाठी कोट्यवधींचा निधी मिळविण्याचे एक लेखाशीर्ष तयार झाल्यामुळे महानगरपालिकेसाठी गोदावरी ही पैशांची दुभती गाय झालेली आहे. गोदावरी पात्राशी संबंधित अनेक कामांचे ठेके घेण्यामुळे ठाराविक नगरसेवकांची आणि ठेकेदारांचीे पिढीजात पैसा कमावण्याची सोय झाली आहे. गोदावरीची संभाव्य पूररेषा हासुद्धा सर्वसामान्य लोकांना धमकावण्याचा आणि पूररेषेतून घर, जमीन, भूखंड वगळण्याचा नवा धंदा महापालिका अधिकारी तथा पदाधिकार्यांना मिळाला आहे.
गोदावरीच्या प्रदूषणाचा विषय त्र्यंबकेश्वर आणि नाशिक महानगर अशा दोन्ही ठिकाणी चर्चेत आहे. यापैकी त्र्यंबक हे तिच्या उगमाचे स्थान. तेथे गोदावरी गावातूनच वाहते. त्यामुळे तिच्या प्रवाहावर ढापे टाकण्यात आले आहेत. उगमाचे ठिकाण छोटे असल्यामुळे गावातील सांडपाणी आणि मलनिस्सारण व्यवस्थाही गोदावरी पात्रात सोडण्यात आली आहे. अशा स्थितीत उगमाच्या ठिकाणीच गोदावरीचा श्वास कोंडलेला दिसतो.
त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थ असून, तेथेच धार्मिक विधी केले जातात. या कुंडाजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने जलशुद्धीकरण यंत्रणा तयार केली होती. कुंभमेळ्यानिमित्त मिळालेल्या सव्वाशे कोटी रुपयांच्या निधीत हे काम झाले होते. सध्या ही यंत्रणा बंद आहे. त्र्यंबकची अर्थव्यवस्था पूर्णत: गोदावरीवरच अवलंबून आहे. बाराही महिने तेथे भाविकांची रीघ असते. तेथील नगरपालिकेच्या खर्चाच्या काही मर्यादा आहेत. शिवाय तेथील पुरोहित संघही फार काही करू शकत नाही. गोदावरीच्या महात्म्यामुळे येणारा भाविकांचा व पर्यटकांचा पैसा सर्वांना हवा आहे, मात्र गोदावरीच्या संवर्धन किंवा संरक्षणासाठी कोणीही पदरचे पैसे खर्च करण्यास तयार नाही, असे चित्र आहे. जे काही द्यायचे ते शासनानेच द्यावे, असे प्रत्येकाला वाटते.
त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या गोदावरीचे अस्तित्व सांडपाणी, मलयुक्त पाणी, कचरायुक्त पाणी असेच आहे. पितरांच्या मुक्तीसाठी गोदावरीच्या पवित्र प्रवाहात पिंडदान करण्याच्या अपेक्षेन येणार्या भाविकांचा त्यामुळेे हिरमोडच होतो.
गोदावरीच्या प्रदूषणाची नाशिक परिसरातील कहाणी यापेक्षा वेगळी नाही. पावसाळ्यापूर्वी गोदावरी विविध कारणांमुळे प्रदूषित असते. तर पावसाळ्यात पाणवेलींच्या वाढीमुळे अदृश्य झालेली असते.

----
Thursday, September 2, 2010
माहिती आयुक्त की कारकून ?

माहितीच्या अधिकारात माहिती देण्याचे नाकारणार्या, विलंब करणार्या किंवा चुकीची माहिती देऊन कालापव्यय करणार्या राज्यातल्या 347 सरकारी सेवक व अधिकार्यांना 26 लाख 57 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती राज्याचे माहिती आयुक्त सुरेश जोशी यांनी दिली. स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची या जोशीबुवांना दांडगी हौस! माहिती आयुक्त म्हणजे काय एखादा वसुली कारकून आहे? माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची व त्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने सेवानिवृत्त अधिकार्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग होईल, या कल्पनेने माहिती आयुक्तपद निर्माण केले गेले. महाराष्ट्र हे म्हणे देशातले सर्वात प्रगत राज्य! त्यांना या जबाबदारीसाठी जोशीबुवांसारखा हौशी पर्यटक चक्क सापडला! सरकारी सेवेत जनतेच्या तक्रारी आणि गार्हाण्यांबद्दल बहुतेक अधिकारी मुद्दाम बहिरेपण पत्करतात. जोशीबुवांवर त्याबाबतीत निसर्गाचीच कृपा आहे. पत्रकारांबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे. जोशीबुवा बोलतील तेच पत्रकारांनी ऐकावे आणि न ऐकणार्या जोशीबुवांच्या कार्यक्षमतेची प्रसिद्धी करीत राहावे हीच त्यांची अपेक्षा असावी. त्यांचे देश-विदेशातील पर्यटनसुद्धा संशयास्पद ठरते. माहिती अधिकाराबद्दल जनतेला शक्यतो माहिती न देणे, द्यावीच लागली तर कमीत कमी देणे किंवा नको त्या कागदपत्रांचा भडिमार करणे अशी जनतेची दिशाभूल करण्याचे हजारो किस्से जोशीबुवांच्या दप्तरी दाखल आहेत. त्याबद्दल माहिती देण्याचे हा माहिती आयुक्त कटाक्षाने टाळतो. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हटल्या जाणार्या राज्यातही माहिती कायद्याचा अंमल आणि माहिती आयुक्तांचा कारभार अत्यंत असमाधानकारक आहे. त्या कारभाराची चौकशी झाल्यास कदाचित जोशी महाशयांचे नाव माहिती न देण्याबद्दल दंड भरणार्यांच्या यादीत पहिलेही असू शकेल.
Sunday, August 29, 2010
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा

त्र्यंबकेश्वरला श्रावणातील तिसर्या सोमवारच्या ब्रह्मतगरी प्रदक्षिणेला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी एकलाखावर भाविक या खडतर प्रदक्षिणेत सहभागी होतात.
श्रावण महिन्यात दर सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्यासाठी बाविक गर्दी करतात. पुण्यदायी, मोक्षाकडे सन्मार्गाकडे नेणारी प्रदक्षिणा म्हणून बाविकांचा समज आहे. ‘भोलेहरऽऽऽ’च्या जयघोषाने त्र्यंबक परिसर दुमदुमला जातो. दरवर्षी सुमारे लाखावर भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. ही प्रदक्षिणा करण्याची परंपरा अतिप्राचीन आहे. सातशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्तीनाथ महाराज व संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्तबाई यांनी प्रदक्षिणा करून जगाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सन्मार्ग सांगितला. त्याच मार्गाने आजही जनतेची वाटचाल सुरू आहे.
या प्रदक्षिणेत वृद्धांचा मोठा सहभाग असतो. यात सहभागी होणारे 75 टक्के भाविक असले तरी 25 टक्के मंडळी सहल म्हणून प्रदक्षिणा करतात. 80 टक्के भाविक नेहमी येणारे असतात तर तर 20 टक्के भाविक दरवर्षी नव्याने येतात.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पंचलिंग पट्ट्यात पर्वतराज ब्रह्मगिरी असून या पर्वतावरुनच पवित्र गोदामाईचा उगम झाला आहे. पंचलिंग डोंगरातून पाच नद्यांचा उगम झाला आहे. यात अहिल्या, गोदावरी, त्र्यंबकेश्वरी संगम घाटात दृष्टीत पडतात तर बाणगंगा वैतरणा यांचा संगम धाडोशीनजीक गणपती मंदिराजवळ दृष्टीस पडतो. येथे स्नान करून प्रदक्षिणार्थी पुढची वाटचाल करतात.
गोदावरीने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केले. पंचनद्यांनी इगतपुरी पट्टा हरित केला. वैतरणा नदी, धरण मुंबईकरांसाठी जीवनदायी ठरली. गोहत्येचे पातक नष्ट करण्यासाठी महर्षी गौतमांनी येथे प्रदीर्घ तपश्चर्या केली व गंगेला शिवशंकराच्या जटेतून भूलोकी आणलेे. अशा रितीने गोदावरीचा उगम झाला. श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई हे चौघे भावंड प्रदक्षिणा करीत असतांना वाटेत त्यांच्या पाठीमागे वाघ लागल्याने जंगलात या भावंडांची ताटातूट झाली. संत निवृत्तीनाथ बचाव करण्यासाठी गुरू गहिनीनाथांच्या गुहेत शिरले. तिथेच संत निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दिक्षा गहिनीनाथांनी दिली. धर्माचे (आजच्या भागवत व वारकरी संप्रदाय) जनकल्याणाचे कार्य संत निवृत्तीनाथांनी केले. या पौराणिक कथेनुसार ब्रह्मगिरी प्रदक्षिणा निराकार भावनेतून करावी. परमेश्वर व निसर्गाशी एकरुप व्हावे. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, सर्व समाजाने एकत्र येऊन धार्मिक वृत्ती जोपासून देशचे कल्याण करावे. ही उदात्त शिकवणही प्रदक्षिणा देते. ‘त्र्यंबक महात्म्य व त्र्यंबकराज निवृत्ती विजय’ या ग्रंथात प्रदक्षिणेचे महत्त्व वर्णिलेले आहे. पेशवे काळात गुन्हेगारांना शिक्षा म्हणून उपप्रदक्षिणा घालण्यास सांगितले जात असे.
कुशावर्तावरून प्रदक्षिणेला ब्रह्ममुहूर्तावर प्रारंभ करावा. प्रयागतीर्थ, पहिणे बारी, भिलमाळ, कोजुर्ण धाडोशी गांवावरुन तेथे उजव्या हाताने वळण गौतमाचा धस (गौतमाचे मंदिर) तळेगांव धरणाजवळून नमस्कार, सापगांव शिवार, गणपत बारी, पुन्हा त्र्यंबकेश्वर असा छोट्या प्रदक्षिणेचा मार्ग आहे. ब्रह्मगिरी, गंगाद्वार, नीलपर्वत, पंचलिंंग डोंगर, गौतम धस, लग्नस्तंभ डोंगर, दुर्गा भांडार, मेटघेर किला अशा डोंगरांनाही प्रदक्षिणा होते. रामतीर्थ, बहुतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, भागिरथी तीर्थ, अंकुर तीर्थ, भुजंग तीर्थ, नरसिंहतीर्थ इ. तीर्थ मंदिरे प्रदक्षिणा मार्गात लागतात व हे अंतर 24 कोसाचे आहे. धाडोशीच्या नवीन पुलावरुन अथवा सामुंडी गावावरुन मासळी घाट, हर्षेवाडी डोंगर, यात हरीहर डोंगर किल्ला यात नागमोडी रडकुंडी यामार्गावर मोठी प्रदक्षिणा केली जाते.
हरीहर पायथ्यानजीक मोठे सरोवर आहे. पुढे लेकुरवाळी देवीपर्यंत यावे लागते. या प्रदक्षिणा मार्गात विविध 108 तीर्थ लागतात. शेवाळावरुन चालणे, नितळ थंड पाण्यात स्नान करणे, धुक्यात वाटचाल तर नागमोडी व रडकुंडी येथे विषववृत्तीय जंगलाची अनुभूती, सूर्यदर्शन जवळपास नाही, अशा अवर्णनीय वातावरणात मोठी प्रदक्षिणा करण्यात येते. यासाठी गाईड अथवा जाणकार सोबत हवा. निसर्ग फेरी करा, निसर्गाशी एकरुप व्हा व ईश्वराचे लाभ स्मरण करून जीवन समृद्ध करा अशी शिकवण या प्रदक्षिणेतून मिळते. हर हर गंगे ऽऽऽ असा गगनभेदी जयघोष मोठ्या प्रदक्षिणेत केला जातो. ही प्रदक्षिणा करताना तुमच्या सादाला निसर्ग प्रतिसाद देतो याचा अनुभव येईल.

Wednesday, August 25, 2010
काश्मिरातील उलटे वारे !

काश्मिरात फुटीरतावाद्यांनी उच्छाद मांडला आहे. पाकिस्तानच्या अप्रत्यक्ष चितावणी व पैशांच्या पुरवठ्यावर या मंडळींनी काश्मिरी जनतेला वेठीस धरले आहे. रोज हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, बंद यामुळे तेथील सर्वसामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. कोणत्याही अन्यायकारक दडपशाहीचा चिमटा जेव्हा सामान्य लोकांच्या पोटाला पीळ टाकतोे तेव्हा तेथे बंडखोरीची ठिणगी पेट घेते. काश्मिरमध्ये आता हे घडू लागले असून सर्वसामान्यांच्या मनांत बंडखोरीची ठिणगी पेटली आहे. गेल्या दोन- तीन महिन्यांपासून फुटीरतावाद्यांनी लादलेल्या अन्यायाच्याविरोधात तेथील स्थानिक लोक फुटीरतावाद्यांवर दगडफेक करु लागले असून त्यांच्या समर्थकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्यादही दाखल होवू लागल्या आहेत. काश्मिरमधील हे वारे उलटे वाहू लागले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या गेल्या 63 वर्षांमध्ये काश्मिरीजनतेची सातत्याने होरपळ होते आहे. आम्ही काश्मिरी, आम्ही भारतीय, आम्ही पाकिस्तानचे समर्थक, आम्ही स्वायत्त की आम्ही कोणीच नाही असे स्वत्त्वाविषयीचे अनेक प्रश्न काश्मिरी जनतेला भेडसावत आहेत. आतापर्यंत पाकिस्तानच्या चिथावणीवर फुटीरतावाद्यांनी काश्मिरची राखरांगोळी करण्यातच धन्यता मांडली. कुठे हल्ला, कुठे घुसखोरी, कुठे गोळीबार, कुठे स्फोट असा प्रकारांनी काश्मिरची होरपळ होतेच आहे. या सार्या प्रकाराकडे काश्मिरी जनताही तस्थपणेच पाहात राहीली. अन्यायाविरुद्ध गप्प राहणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अन्याय करणार्याचे किंवा त्याच्या विचारांचे समर्थन करणे हेही व्यावहारीक सूत्र आहे. पाकिस्तान त्याचाच लाभ घेत काश्मिरमधील मुठभर फुटीरांच्या संघर्षांला स्थानिकांचाच लढा असे म्हणत आला आहे. आंतराष्ट्रीय जन सुदायासमोरही तशी मखलाशी त्याने वारंवार केली आहे. काश्मिरीजनतेने आजपर्यंत कधीही उडपणे फुटीतरवाद्यांना विरोध केला नाही किंवा त्यांच्या मागण्यांना समर्थनही दिलेले नाही. काश्मिरीजनतेला स्वायत्तताही हवी की नको हा विषय गुलदस्त्यात आहे. अर्थात या मागे भारत सरकारचे काश्मिरबाबत धरसोड धोरण हेही कारणीभूत आहे. मंगळवारी काश्मिरात घडलेल्या काही घटनांनी मात्र यिोग्य प्रकारे योग्य प्रकारे फुटीरतावाद्यांना खोर्यातून पिटाळून लावण्याचा निर्धार केलेला दिसत आहे. काश्मिर खोरे बंद करण्याचा प्रकत्न करणार्या फुटीरतावाद्यांवर तेथील दुकानदार व सामान्य जनतेने दगडफेक केली. एवढेच नव्हेतर काही फुटीरतावाद्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदविला. काश्मिरीजनतेच्या या बदलत्या मानसिकतेला विधायक सहकार्याची जोड तेथील राज्य प्रशासन, सुरक्षा दल आणि केंंद्रीय प्रशासनाने द्यायला हवी. यापूर्वीही काश्मिरातील धाडसी महिलांनी घरात घुसलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेले आहे. अशा बाबींचा योग्य प्रकारे लाभ उठवीत भारताच्या नंदनवनात शांतता व सुव्यस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काश्मिरीजनतेचा पाठींबा हवा असेल तर आता तेथे फुटीरतावाद्यांच्या विरोधातील हातांना केंद्र सरकारच्या मदतीचा हात मिळायला हवा.
Tuesday, August 24, 2010
मंगळागौरीचे व्रत

श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.असे करतात मंगळागौरीचे व्रत:- आता मंगळागौरीच्या व्रताविषयी माहिती घेऊ. नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं. लग्न झाल्यापासून पुढील पाच वर्षे ही पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी माहेरी आणि सासरी एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते. ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई, जुई, मोगरा, गुलाब अशा फुलझाडांच्या पत्रीही वाहिल्या जातात. अत्तर अन् काजळही लावले जाते. नंतर दागिने घातले जातात. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते धातूचे अथवा मण्यांचे नसतात. कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून दागिने तयार केले जातात. या दागिन्यांद्वारे देवीला शृंगारण्यात येते. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यासाठी सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरली जातात. त्यानंतर या देवीचे जागरण केले जाते. त्यासाठी आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. जागरणाची धमाल:- फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.

Subscribe to:
Posts (Atom)