
काश्मिरात फुटीरतावाद्यांनी उच्छाद मांडला आहे. पाकिस्तानच्या अप्रत्यक्ष चितावणी व पैशांच्या पुरवठ्यावर या मंडळींनी काश्मिरी जनतेला वेठीस धरले आहे. रोज हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, बंद यामुळे तेथील सर्वसामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. कोणत्याही अन्यायकारक दडपशाहीचा चिमटा जेव्हा सामान्य लोकांच्या पोटाला पीळ टाकतोे तेव्हा तेथे बंडखोरीची ठिणगी पेट घेते. काश्मिरमध्ये आता हे घडू लागले असून सर्वसामान्यांच्या मनांत बंडखोरीची ठिणगी पेटली आहे. गेल्या दोन- तीन महिन्यांपासून फुटीरतावाद्यांनी लादलेल्या अन्यायाच्याविरोधात तेथील स्थानिक लोक फुटीरतावाद्यांवर दगडफेक करु लागले असून त्यांच्या समर्थकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्यादही दाखल होवू लागल्या आहेत. काश्मिरमधील हे वारे उलटे वाहू लागले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या गेल्या 63 वर्षांमध्ये काश्मिरीजनतेची सातत्याने होरपळ होते आहे. आम्ही काश्मिरी, आम्ही भारतीय, आम्ही पाकिस्तानचे समर्थक, आम्ही स्वायत्त की आम्ही कोणीच नाही असे स्वत्त्वाविषयीचे अनेक प्रश्न काश्मिरी जनतेला भेडसावत आहेत. आतापर्यंत पाकिस्तानच्या चिथावणीवर फुटीरतावाद्यांनी काश्मिरची राखरांगोळी करण्यातच धन्यता मांडली. कुठे हल्ला, कुठे घुसखोरी, कुठे गोळीबार, कुठे स्फोट असा प्रकारांनी काश्मिरची होरपळ होतेच आहे. या सार्या प्रकाराकडे काश्मिरी जनताही तस्थपणेच पाहात राहीली. अन्यायाविरुद्ध गप्प राहणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अन्याय करणार्याचे किंवा त्याच्या विचारांचे समर्थन करणे हेही व्यावहारीक सूत्र आहे. पाकिस्तान त्याचाच लाभ घेत काश्मिरमधील मुठभर फुटीरांच्या संघर्षांला स्थानिकांचाच लढा असे म्हणत आला आहे. आंतराष्ट्रीय जन सुदायासमोरही तशी मखलाशी त्याने वारंवार केली आहे. काश्मिरीजनतेने आजपर्यंत कधीही उडपणे फुटीतरवाद्यांना विरोध केला नाही किंवा त्यांच्या मागण्यांना समर्थनही दिलेले नाही. काश्मिरीजनतेला स्वायत्तताही हवी की नको हा विषय गुलदस्त्यात आहे. अर्थात या मागे भारत सरकारचे काश्मिरबाबत धरसोड धोरण हेही कारणीभूत आहे. मंगळवारी काश्मिरात घडलेल्या काही घटनांनी मात्र यिोग्य प्रकारे योग्य प्रकारे फुटीरतावाद्यांना खोर्यातून पिटाळून लावण्याचा निर्धार केलेला दिसत आहे. काश्मिर खोरे बंद करण्याचा प्रकत्न करणार्या फुटीरतावाद्यांवर तेथील दुकानदार व सामान्य जनतेने दगडफेक केली. एवढेच नव्हेतर काही फुटीरतावाद्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदविला. काश्मिरीजनतेच्या या बदलत्या मानसिकतेला विधायक सहकार्याची जोड तेथील राज्य प्रशासन, सुरक्षा दल आणि केंंद्रीय प्रशासनाने द्यायला हवी. यापूर्वीही काश्मिरातील धाडसी महिलांनी घरात घुसलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेले आहे. अशा बाबींचा योग्य प्रकारे लाभ उठवीत भारताच्या नंदनवनात शांतता व सुव्यस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काश्मिरीजनतेचा पाठींबा हवा असेल तर आता तेथे फुटीरतावाद्यांच्या विरोधातील हातांना केंद्र सरकारच्या मदतीचा हात मिळायला हवा.

No comments:
Post a Comment