श्रावणाचा महिना. अधुनमधून पडणार्या सरी. मध्येच ढगाआडून डोकावणारा सूर्य. सह्याद्रीनेे लपेटलेला हिरवा शालू. पावसामुळे न्हाऊन निघालेल्या वृक्षांना आलेली नवी पालवी- तजेली. डोंगराच्या उतारावरून खळाळणारे झरे, दरीत कोेसळणारे धबधबे. अशा प्रसन्न आणि रोमांचित करणार्या वातावरणात छोटा ट्रेक आणि जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर चला त्र्यंबकेश्वरला. सध्या येथे मस्त माहौल आहे...
नाशिकची थंडी, नाशिकचा पाऊस कधीतरी अनुभवावा. इगतपुरी घोटी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचे घुमशान काय असते ? हे अनुभवता येते. धुवांधार कोसळणारा पाऊस. सात- आठ हजार फुट उंचावरील डोंगरांच्या रांगा. बाष्ष घेऊन जाणारे काळे ढग. त्यात भटकंती करतानाच ओले होणारे कपडे. हे सारे सारे वेगळ्याच विश्वात नेणारे. त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी असो की अंजेनेरीचा अंजनीगड. तेथून परतावे असे वाटतच नाही. बहुधा स्वर्ग असावा तर तो असाच...
त्र्यंबकेश्वर... ब्रह्मा- विष्णू- महेशाच्या निवासाचे स्थान. संतांची भूमी. निवृत्तीनाथ महाराजांचे समाधीस्थळ. कुंभमेळ्याचे पवित्र स्थान. विविध साधू- महंतांच्या आखाड्याचे स्थान. असे काय काय वर्णन करावे ?
नाशिकपासून अवघ्या 28 किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर आहे. (नाशिकरोड रेल्वेस्थानकापासून 38 किलोमीटरवर) येथे 12 पैकी एक असलेले त्रंबकेश्वराचे ज्योतिलिर्ंंग आहे. त्यात ब्रह्मा- विष्णू- महेशाचे रुप पाहात येते. महेशाचे हे मंदिर पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. तेथे दिवसातून 4 वेळा पूजा केली जाते.
येथे पवित्र कुशावर्त तीर्थ आहे. समुद्र मंथनाच्यानंतर निघालेल्या अमृत कुंभातील अमृताचे काही थेंब या कुंडात पडल्याच्या अख्यायिका आहेत. त्यामुळेच येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याच्या शाहीस्नान पर्वणीच्यावेळी येते भल्या पहाटे सशस्र नागा साधुंच्या मिरवणुका निघतात. पवित्र दक्षिणगंगा तथा गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर परिसरात होतो. तेथून ती नाशिककडे वाहते. येथे गोदावरी- अहिल्यानदीचा संगम आहे. तेथे कालसर्प योेगाशी संबंधित नारायण नागबळी विधी होतात.
त्र्यंबकेश्वर परिसरात भटकंतीच्या अनेक जागा आहेत. ब्रह्मगिरीचे फेरी हा स्वर्गिय आनंद देणारा प्रकार. गंगाद्वार, बिल्व तीर्थ, गौतम तीर्थ, इंद्र तीर्थ, अहिल्या संगम, नील पर्वत, निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर येथे आहेत. येथे डोंगर प्रदक्षिणेचे दोन मार्ग आहेत एक ब्रम्हगिराली प्रदक्षिणा आणि दुसरी हरिहरगिरीला प्रक्षिणा.
जाणार कसे ?
विमानाने - नाशिकचे विमानतळ (तेथून त्र्यंबकेश्वर 39 किलोमीटर)
रेल्वेने - नाशिकरोड रेल्वेस्थानक (तेथून त्र्यंबकेश्वर 38 किलोमीटर)
रस्त्याने -मुंबई- त्र्यंबकेश्वर 180 किलोमीटर, पुणे- त्र्यंबकेश्वर 200 किलेमीटर
निवास - नाशिकला मुक्कामासाठी चांगल्या हॉटेल्स आहेत. धर्मशाळांमध्येही उत्तम व्यवस्ता होते.

No comments:
Post a Comment