Friday, January 27, 2017

समांतर रस्त्यासाठी गांधी होवू या ...

आयुष्याच्या अर्ध शतकात महात्मा गांधी जाणून बुजून कधी स्वीकारावा लागला नाही. पाठ्यपुस्तकातला गांधी कधी तरी वाचला. जयंती-पुण्यतिथीला कोणाच्या तरी तोंडून ऐकला. टपाल तिकीटाच्या रुपात गांधी चिटकवला. कमवायला लागल्यावर गांधी खिशातही बाळगला. पण, गांधी मार्गावर चालण्याची वेळ कधी आली नाही. जळगावकरांना गांधीमार्च मध्ये चालण्याची संधी मिळते आहे. जळगाव फर्स्ट या बिगर राजकीय संघटनने दि. 30 जानेवारीस समांतर रस्त्यांच्या मागणीकडे सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी गांधीमार्च आयोजित केला आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येक जळगावकरने या गांधीमार्चमध्ये चालायला हवे.